Tata Upcoming Electric Car : देशात गेल्या काही वर्षांपासून इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढला आहे. शासनाने देखील इलेक्ट्रिक वाहन निर्मितीला चालना दिली आहे. वाढते प्रदूषण लक्षात घेता आणि कच्चे तेल आयातीचा अतिरिक्त भार लक्षात घेता आता शासनाच्या माध्यमातून इलेक्ट्रिक वाहन वापराला प्रोत्साहित केले जात आहे.
विशेष म्हणजे लोकांना देखील इलेक्ट्रिक वाहने आवडू लागली आहेत. यामुळे देशातील अनेक नामांकित ऑटो कंपन्यांनी इलेक्ट्रिक वाहनांची निर्मिती केली आहे. यामध्ये टाटा कंपनीचा देखील समावेश होतो. टाटा मोटर्सने इलेक्ट्रिक कार बाजारात आणल्या आहेत. टाटा मोटर्स Ev ला बाजारात चांगली मागणी देखील आहे.
तथापि कंपनीने नवीन वर्षात अर्थातच 2024 मध्ये आणखी काही नवीन इलेक्ट्रिक वाहने लॉन्च करण्याचे जाहीर केले आहे. कंपनी कर्व इलेक्ट्रिक, पंच इलेक्ट्रिक आणि अल्ट्रोज इलेक्ट्रिक या गाड्यां पुढल्या वर्षी लॉन्च करणार आहे. यातील पंच इलेक्ट्रिक या गाडीची किंमत ही इतर इलेक्ट्रिक वाहनांच्या तुलनेत खूपच कमी राहणार असा दावा केला जात आहे.
इलेक्ट्रिक पंच कारची किंमत दहा लाखांच्या आसपास राहू शकते अशी माहिती मीडिया रिपोर्ट मधून समोर आली आहे. कंपनी या तीन इलेक्ट्रिक Car व्यतिरिक्त पुढल्या वर्षी हैरीयर इलेक्ट्रिक कार देखील लॉन्च करण्याच्या तयारीत असल्याची बातमी समोर आली आहे. विशेष म्हणजे हॅरिअर इलेक्ट्रिक या तीन गाड्यांच्या आधीच मार्केटमध्ये दाखल होणार असल्याचे सांगितले जात आहे.
यामुळे निश्चितच ज्या लोकांना टाटाची इलेक्ट्रिक कार घ्यायची असेल त्यांना आणखी ऑप्शन्स उपलब्ध होणार आहेत. दरम्यान आता आपण या नव्याने लॉन्च होणाऱ्या इलेक्ट्रिक कारची थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
केव्हा लाँच होणार
हैरीयर इलेक्ट्रिक गाडी मार्च 2024 मध्ये लॉन्च होण्याची दाट शक्यता आहे. या नव्याने लॉन्च होणाऱ्या इलेक्ट्रिक कारचे डिझाईन सध्या स्थितीला असलेल्या हॅरियर फेसलिफ्ट सारखीच राहणार आहे. यात समोरील बाजूस एलईडी डीआरएल आणि व्हर्टीकल एलईडी हेडलॅम्प आणि क्लोज ग्रील असणार आहे.
तसेच नवीन बंपर, अलॉय व्हीलमध्ये नवीन डिझाइन, समोरच्या दरवाजावर हॅरियर ईव्हीची बॅजिंग आणि मागील बाजूस कनेक्ट केलेले एलईडी टेललॅम्प दिले जाणार आहे. या इलेक्ट्रिक कारमध्ये 12.3-इंच टचस्क्रीन सिस्टम, 10.25-इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, 4-स्पोक स्टीयरिंग व्हील, 9-स्पीकर JLB सिस्टम आणि ADAS सारखे अद्ययावत फीचर्स राहतील अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.
एकदा चार्ज केली की 500 किलोमीटर धावणार
हॅरियर इलेक्ट्रिक टाटाची एक पॉवरफुल एसयूव्ही राहणार आहे. या गाडीत 50kWh ते 60kWh क्षमतेची बॅटरी दिली जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार ही गाडी एकदा चार्ज केल्यावर तब्बल 500 किलोमीटर पर्यंत धावू शकणार आहे. या गाडीचे एक्स शोरूम किंमत तीस लाखांपर्यंत राहील असा दावा केला जात आहे. ही गाडी महिंद्रा कंपनीच्या प्रीमियम इलेक्ट्रिक व्हेईकल सोबत स्पर्धा करणार आहे.