ऑटोमोबाईल

Best Selling Cars : ग्राहकांमध्ये पहिल्या पसंतीची ठरतेय टाटांची ‘ही’ कार, विक्रीचे सर्व रेकॉर्ड…!

Published by
Ahmednagarlive24 Office

Best Selling Cars : तुम्ही सध्या एखाद्या चांगल्या कारच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही बातमी कामाची आहे. आज आम्ही तुम्हाला अशा एका कारबद्दल सांगणार आहोत, जिने विक्रीत सर्वांना मागे टाकत नंबर एक वर आली आहे. आम्ही सध्या टाटाच्या कारबद्दल बोलत आहोत.

मागील काही काळापासून टाटा मोटर्सने देशातील स्पोर्ट्स युटिलिटी सेगमेंटमध्ये आपल्या अनेक वाहनांची यशस्वीपणे विक्री केली आहे. ज्यामध्ये टाटा मोटर्सच्या मिनी कार टाटा पंचला सर्वाधिक मागणी आहे. गेल्या महिन्याच्या विक्री अहवालानुसार या कारला मे महिन्यात सर्वाधिक विक्रीचा किताब मिळाला आहे. या एसयूव्हीला सलग तिसऱ्यांदा हे यश मिळाले आहे.

पंच संदर्भात टाटा मोटर्सच्या विक्री अहवालानुसार, मे 2023 मध्ये तिचा विक्रीचा आकडा 11,124 होता, तर मे 2024 च्या विक्री अहवालानुसार, या महिन्यात जबरदस्त यशासह एकूण 18,949 बुकिंग मिळाले आहेत. Hyundai Creta देखील भारतीय बाजारपेठेत सर्वाधिक मागणी असलेली कार असल्याचे सिद्ध झाले आहे. Hyundai Creta ने यावर्षी 14,662 विक्रीसह दुसरे स्थान मिळवले आहे. गेल्या वर्षी याच महिन्यात हा आकडा 14,449 युनिट होता.

सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारच्या यादीत मारुती ब्रेझा तिसऱ्या क्रमांकावर आहे. गेल्या महिन्यात त्याची विक्री 14,186 होती, जी मे 2023 मध्ये 13,398 वरून 6 टक्क्यांनी वाढली आहे.

महिंद्रा मोटर्सची सर्वाधिक लोकप्रिय कार असलेल्या महिंद्रा स्कॉर्पिओ रेंजच्या विक्रीतही वाढ झाली आहे. गेल्या वर्षी मे महिन्यातील 9,318 युनिट्सच्या तुलनेत 13,717 विक्रीसह या कारने यावर्षी भारतीय बाजारपेठेत चौथे स्थान मिळवले आहे.

ग्राहकांचा उदंड प्रतिसाद मिळाल्यानंतर मारुती सुझुकी फ्रॉन्क्सनेही विक्रीत यश मिळवले आहे. त्याची विक्री 29 टक्क्यांच्या वाढीसह 12,681 झाली. ही कार या वर्षी मे महिन्यात देशातील पाचवी सर्वाधिक विकली जाणारी एसयूव्ही कार आहे.

टाटाची सर्वाधिक विक्री होणारी कार टाटा नेक्सॉनचाही या यादीत समावेश आहे. बाजारातील विक्री अहवालानुसार या कारने सहावे स्थान पटकावले आहे. 2023 मध्ये, Tata Nexon ने 11,457 युनिट्सची विक्री गाठली, जे एप्रिलमध्ये विकल्या गेलेल्या 14,423 युनिट्सच्या तुलनेत 21 टक्क्यांनी घसरले.

सर्वाधिक विक्री होणाऱ्या यादीत सातव्या स्थानावर असलेली कार महिंद्रा Hyundai Exeter 7,697 विक्रीसह नवव्या स्थानावर आहे आणि Hyundai Exeter 7,697 विक्रीसह दहाव्या स्थानावर आहे.

Ahmednagarlive24 Office