Upcoming TATA Motors Car:- डिसेंबर 2024 हा या वर्षाचा शेवटचा महिना असून येत्या काही दिवसांमध्ये नवीन वर्षाचे आगमन होईल व 2025 वर्षाची सुरुवात होईल. नवीन वर्षाची सुरुवात बऱ्याच अर्थांनी महत्त्वाची असते.अगदी त्याचप्रमाणे ज्या कुणाला नवीन कार घ्यायची असेल त्यांच्यासाठी देखील महत्त्वाचे ठरणार आहे.
यामागील प्रमुख कारण म्हणजे देशातील आघाडीचे कार उत्पादक कंपनी टाटा मोटर्स नवीन वर्षामध्ये त्यांचे काही नवीन कार मॉडेल्स लॉन्च करणार आहे. विशेष म्हणजे टाटा मोटर्सच्या माध्यमातून या लॉन्च करण्यात येत असलेल्या कारमध्ये इलेक्ट्रिक आणि फेसलिफ्ट मॉडेल असणार आहेत. त्यामुळे ज्या कुणाला कार घ्यायची असेल व त्यातल्या त्यात टाटाची घ्यायची असेल तर त्यांच्यासाठी ही एक सुवर्णसंधी ठरणार आहे.
येत्या वर्षात टाटा मोटर्स लॉन्च करणार तीन उत्तम वैशिष्ट्य असलेल्या कार
1- टाटा टियागो फेसलिफ्ट- टाटा टियागो फेसलिफ्ट ही टाटाची सर्वाधिक विकली जाणारी हॅचबॅक कार असून याच कारचे अपडेटेड व्हर्जन आता टाटा मोटरच्या माध्यमातून भारतीय बाजारामध्ये लॉन्च केले जाणार आहे.
या येऊ घातलेल्या नवीन टाटा टियागो कारमध्ये नवीन हेडलॅम्प, टेललॅम्प, बंपर आणि काही नवीन फिचर सह इंटरियरमध्ये देखील बदल केला जाईल अशी एक शक्यता आहे. परंतु या कारच्या पावर ट्रेनमध्ये कुठलाही बदल होणार नाही अशी देखील एक शक्यता आहे.
2- टाटा टिगोर फेसलिफ्ट- ही एक भारतीय कार बाजारपेठेतील टाटा मोटरची लोकप्रिय आणि चांगली विक्री होणारी सेडान कार पैकी एक असून या कारचे देखील अपडेटेड वर्जन आता टाटा येणाऱ्या वर्षी म्हणजेच 2025 मध्ये भारतीय बाजारपेठेत लॉन्च करणार आहे.
मीडिया रिपोर्टमध्ये करण्यात आलेल्या दाव्यानुसार बघितले तर आताच्या कारपेक्षा या नवीन अपडेटेड टाटा टिगोर फेसलिफ्टच्या बाहेरील आणि इंटेरियर भागामध्ये काही मोठे बदल दिसण्याची शक्यता आहे. परंतु या कारच्या पावर ट्रेनमध्ये देखील कुठलाही बदल होण्याची शक्यता नाही.
3- टाटा हॅरिअर ईव्ही- ही भारतीय बाजारपेठेतील लोकप्रिय एसयूव्ही कार आहे. महत्वाचे म्हणजे आता टाटा मोटर्स येणाऱ्या वर्षात टाटा हॅरियरचे इलेक्ट्रिक व्हेरियंट लॉन्च करण्याची तयारी करत आहे.
जर आपण या कारबद्दल मीडिया रिपोर्टमध्ये करण्यात आलेल्या दाव्यानुसार पाहिले तर टाटा मोटर्सच्या माध्यमातून या टाटा हॅरियर इलेक्ट्रिक कारमध्ये 60 kWh बॅटरी देण्याची शक्यता असून जी एका चार्जवर सुमारे पाचशे किलोमीटरची रेंज देण्यास सक्षम असेल.