Tesla EV Cars : सध्या भारतीय सोशल मीडियावर एक प्रश्न चर्चेत आहे ज्यामुळे अनेक चर्चांना उधाण आले आहे. आम्ही तुम्हाला सांगतो इलेक्ट्रिक कार बनवणारी टेस्ला भारतात कधी येणार? हा प्रश्न सध्या मोठ्या प्रमाणत सर्च केला जात आहे.
मात्र आता समोर आलेल्या माहितीनुसार टेस्ला भारतात येण्यास बराच कालावधी जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार टेस्लाबाबत भारताची कठोर भूमिका कायम आहे. गुंतवणुकीच्या प्रस्तावाशिवाय कर सवलतीवर कोणतीही चर्चा होणार नाही, असे सरकारने स्पष्टपणे सांगितले आहे.
काय प्रकरण आहे जाणून घ्या
टेस्लाच्या अधिकाऱ्यांची गेल्या आठवड्यात पीएमओमध्ये बैठक झाली. स्थानिक उत्पादन आणि खरेदीशिवाय सवलत मिळणार नाही. आयात शुल्कात सूट देण्याबरोबरच प्रोत्साहनाची मागणीही करण्यात आली. यासोबतच भारतात नवीन कारखाना सुरू करण्याचाही प्रस्ताव देण्यात आला आहे. मात्र गुंतवणुकीचा तपशील आणि ठिकाण दिलेले नाही.थेट आयातीचा प्रस्ताव यापूर्वीच फेटाळण्यात आला आहे.
मंगळवारी एका मुलाखतीदरम्यान, मस्क यांना विचारण्यात आले की टेस्लाला नवीन कारखान्यासाठी भारतात स्वारस्य आहे का, ज्यावर त्यांनी ‘होय’ असे उत्तर दिले. गेल्या आठवड्यात, टेस्लाच्या अधिकाऱ्यांनी नवी दिल्लीत दोन दिवस भारतीय अधिकाऱ्यांची भेट घेतली, जिथे ईव्ही निर्मात्याने देशात उत्पादन प्रकल्प आणि रिसर्च आणि विकास केंद्र प्रस्तावित केले.