Tesla India Office In Pune : टेस्लाचे भारतात पहिले पाऊल, पुण्यात सुरु केले ऑफिस, देणार ‘इतके’ भाडे

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Tesla India Office In Pune : गेल्या काही दिवसांपासून टेस्ला भारतात प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगत होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिका दौऱ्यावर असताना टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क यांची भेट घेतली होती. त्यानंतर आता टेस्लाने भारतात त्यांचे पहिले ऑफिस सुरु केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना इलॉन मस्क भेटल्यानंतर त्यांनी मोदींचे भरपूर कौतुक केले होते. तेव्हापासून भारतात टेस्ला प्रवेश करणार असल्याचे संकेत मिळाले होते. त्यानंतर जगातील सर्वात मोठी इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्लाने भारतात पहिले पाऊल टाकले आहे.

टेस्ला कंपनीकडून त्यांचा भारतात व्यवसाय सुरु करण्यासाठी भारतातील पुण्यात पंचशील बिझनेस पार्क येथे पहिले कार्यालय सुरु केले आहे. कंपनीकडून पंचशील बिझनेस पार्क पुणे येथे एक कार्यालय भाड्याने घेतले आहे. या ठिकाणाहून कंपनीचे सर्व अधिकारी काम करणार आहेत. तसेच कंपनीच्या बैठका देखील याच कार्यालयात होणार आहेत.

टेस्लाकडून हे कार्यालय 60 महिन्यांसाठी भाडेतत्त्वावर घेतले आहे

टेस्ला कंपनीकडून त्यांचे पहिले कार्यालय पुणे येथे भाडेतत्वावर घेण्यात आले आहे. हे कार्यालय 60 महिन्यांसाठीभाड्याने घेण्यात आले आहे. तसेच हे कार्यालय खरेदी करण्यासाठी 34.95 लाख रुपये डिपॉझिट देण्यात आले आहे. तर 11.65 लाख रुपये दरमहा भाडे देण्यात आले आहे.

टेस्ला कंपनीकडून पंचशील बिझनेस पार्कमध्ये घेण्यात आलेलय ऑफिसचे भाडे 1 ऑक्टोबर 2023 पासून सुरू होणार आहे. टेस्लाचे भारतातील सर्व काम या ठिकाणाहून होणार आहे. त्यामुळे लवकरच आता भारतात टेस्ला इलेक्ट्रिक कार सादर करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

टेस्ला कार लवकरच भारताच्या रस्त्यावर धावणार आहे

टेस्ला ही जगातील सर्वत मोठी इलेक्ट्रिक कार निर्माता कंपनी आहे. कंपनीकडून भाडेतत्वावर घेण्यात आलेले ऑफिस पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळापासून तीन किलोमीटर अंतरावर आहे. टेस्लाने इलेक्ट्रिक वाहने आणि ईव्ही बॅटरी तयार करण्याच्या प्रस्तावासह भारतात उत्पादन प्रकल्प उभारण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

टेस्लाची पहिली कार 20 लाख रुपयांची असू शकते

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीनंतर इलॉन मस्क यांनी सांगितले होते की, भारतात टेस्लाची पहिली कार सादर करण्यास आम्ही इच्छुक आहोत तसेच भारत हा एक जगातील सर्वात मोठ्या देशांपैकी एक मोठा देश आहे. भारतातील पहिली इलेक्ट्रिक कारची किंमत 20 लाख रुपये असू शकते.