Maruti Suzuki Swift : भारतातील आघाडीची कार निर्माता कंपनी मारुती सुझुकीने आपल्या लोकप्रिय हॅचबॅक मॉडेल स्विफ्टच्या किमतीत वाढ करण्याची घोषणा केली आहे. कपंनीने विविध प्रकारांवरच्या गाड्यांवर ही वाढ लागू केली आहे. अशातच आता ग्राहकांना ही लोकप्रिय कार खरेदी करणे महागात पडणार आहे.
कपंनीने किंमतींमध्ये 15,000 ते 39,000 रुपयांपर्यंत वाढ केली आहे. एकीककडे जेव्हा लोकप्रिय मारुती सुझुकी स्विफ्ट हॅचबॅकच्या किंमतीतील वाढ होताना दिसत आहे तर दुसरीकडे या कराच्या पुढच्या पिढीच्या मारुती सुझुकी स्विफ्ट हॅचबॅकच्या लॉन्चची लोक आतुरतेने वाट पाहत आहेत, जी मे 2024 च्या मध्यात लॉन्च होणार आहे.
यावेळी स्विफ्टच्या ZXi प्रकारात सर्वात मोठी वाढ दिसून आली आहे, मॅन्युअल व्हेरियंटची किंमत 39,000 रुपयांनी वाढली आहे. तर, VXi, VXi AMT आणि VXi CNG सह इतर प्रकारांमध्ये 15,000 रुपयांची किंचित वाढ झाली आहे. चला सर्व प्रकारांची किंमत पाहूया.
मॉडेल नवीन किंमत जुनी किंमत किंमतीत वाढ
-LXI 6.24 लाख रुपये 5.99 लाख रुपये 25,000 रुपये
-VXI 7.15 लाख रुपये 7 लाख रुपये 15,000 रुपये
-VXI AMT 7.65 लाख रुपये 7.50 लाख रुपये 15,000 रुपये
-ZXI 7.93 लाख रुपये 7.68 लाख रुपये 25,000 रुपये
-ZXI AMT 8.43 लाख रुपये 8.18 लाख रुपये 25,000 रुपये
-ZXI+ 8.78 लाख रुपये 8.39 लाख रुपये 39,000 रुपये
-ZXI+ AMT 9.14 लाख रुपये 8.89 लाख रुपये 25,000 रुपये
-VXI CNG 8.05 लाख रुपये 7.90 लाख रुपये 15,000 रुपये
-ZXI CNG 8.83 लाख रुपये 8.58 लाख रुपये 25,000 रुपये
किमतीत बदल करून किंवा किमती वाढवूनही मारुती स्विफ्टच्या लूकमध्ये किंवा इंजिनमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. हे 1.2-लिटर, चार-सिलेंडर पेट्रोल इंजिनसह उपलब्ध राहील. हे इंजिन 5-स्पीड मॅन्युअल किंवा 5-स्पीड AMT गिअरबॉक्ससह उपलब्ध असेल.