Maruti Suzuki : मारुती सुझुकी ही भारतातील अग्रगण्य कार उत्पादक कंपनी असून आजपर्यंत मारुती सुझुकी कंपनीच्या माध्यमातून अनेक परवडणाऱ्या कार बाजारपेठेत लॉन्च करण्यात आलेले आहेत.
भारतीय बाजारपेठेमध्ये मारुती सुझुकीच्या माध्यमातून सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या कार पाहिल्या तर यामध्ये मारुती सुझुकीची स्विफ्ट ही कार प्रथम क्रमांकावर येते.
आजपर्यंत भारतीय ग्राहकांनी या कारला खूपच पसंती दिली व नुकतीच आता मारुती सुझुकीने नवीन जनरेशन स्विफ्ट लाँच केली असून एक नाहीतर तब्बल नऊ बाह्य रंगांमध्ये ती लॉन्च केली असून यामध्ये सिंगल आणि ड्युअल टोन प्रकारच्या रंगांचा समावेश आहे.
मारुती सुझुकीची नवीन जनरेशन स्विफ्ट देते 25.85 किमीचे मायलेज
मारुती सुझुकी या भारतातील अग्रगण्य कार उत्पादक कंपनीने नवीन जनरेशन स्विफ्ट लाँच केली असून ती 9 बाह्य रंगांमध्ये लॉन्च करण्यात आलेली आहे. यासोबत या नवीन कारमध्ये डिझाईन देखील स्टायलिश असून कंपनीच्या माध्यमातून लवकरच या नवीन स्विफ्टचे सीएनजी मॉडेल बाजारपेठेत येणार असल्याची माहिती देखील समोर आली आहे.
या नवीन मारुती स्विफ्ट कारचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे मारुती सुझुकीचे जे काही स्विफ्ट या कारचे जुने मॉडेल आहे त्यापेक्षा 14 टक्के अधिक मायलेज ही नवीन कार देते.
मॅन्युअल व्हेरियंटमध्ये ही कार 24.8 kmpl आणि ऑटोमॅटिक व्हेरियंटमध्ये 25.75 kmpl चे मायलेज देते. तसेच ही नवीन जनरेशन मारुती स्विफ्ट पाच प्रकारामध्ये उपलब्ध असून त्यात LXi,VXi, VXi(O), ZXi आणि ZXi+ या प्रकारांचा समावेश आहे.
नवीन जनरेशन स्विफ्टमधील इतर वैशिष्ट्ये
तसेच सुरक्षिततेच्या बाबतीत या कारमध्ये कंपनीच्या माध्यमातून सहा एअरबॅग्स मानक म्हणून दिले असून याशिवाय हिल होल्ड असिस्ट, थ्री पॉईंट सीट बेल्ट आणि नवीन सस्पेन्शन सेटअप देखील देण्यात आला आहे.
तसेच अगोदरच्या मॉडेल पेक्षा या नवीन कारमध्ये पूर्वीपेक्षा मोठी टच स्क्रीन इन्फोटेनमेंट प्रणाली देखील आहे. तसेच या कारमध्ये ऑल ब्लॅक इंटिरियर थीम देण्यात आली असून यामध्ये 40 पेक्षा जास्त कार कनेक्टेड टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आला आहे.
नवीन स्विफ्टची लांबी 3860 mm, रुंदी १७९५ मिमी आणि उंची पंधराशे मिमी इतकी आहे. म्हणजेच लांबी,रुंदी आणि उंचीच्या बाबतीत ही जुन्या मॉडेल पेक्षा सरस आहे. मात्र व्हिलबेस हा जुन्या मॉडेल सारखाच आहे.
या नवीन जनरेशन कारमध्ये इंजिन कसे आहे?
कंपनीने या नवीन झेड सिरीज मध्ये 1.2- लिटर, तीन सिलेंडर पेट्रोल इंजिन दिले असून जे ८२ एचपी पावर आणि 108 एनएम टॉर्क जनरेट करते. तसेच मॅन्युअल गिअरबॉक्स इंजिन देखील सीव्हीटी ट्रान्समिशनने सुसज्ज आहे. या नवीन स्विफ्टला पाच स्पीड मॅन्युअल आणि पाच स्पीड आटोमॅटिक असे दोन्ही गिअर बॉक्स देण्यात आले आहेत.
किती आहे या कारची किंमत?
या नवीन जनरेशन स्विफ्टची एक्स शोरूम किंमत सहा लाख 49 हजार रुपये असून टॉप व्हेरियंटची एक्स शोरूम किंमत नऊ लाख 65 हजार रुपये इतकी आहे.