सप्टेंबरमध्ये सर्वाधिक विकल्या गेल्या ‘या’ 5 एसयूव्ही, पहा यादी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

5 SUV : एसयूव्ही सेगमेंट भारतात खूप लोकप्रिय झाला आहे. तरुणांमध्ये याची चांगली क्रेझ पाहायला मिळत आहे. यामुळे आता कार उत्पादक कंपन्या आपली सध्याची लाइनअप अपडेट करत आहेत. मायक्रो, सब-कॉम्पॅक्ट आणि फुल साइज एसयूव्ही बाजारात लाँच करत आहेत.

जर आपण दिवाळी दसरा या आगामी सणासुदीच्या काळात नवीन एसयूव्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची ठरणार आहे. याठिकाणी आपण सप्टेंबर 2023 मध्ये सर्वाधिक विक्री होणाऱ्या टॉप 5 SUV बाबत जाणून घेऊयात –

टाटा नेक्सॉन

भारतातील विक्रीच्या बाबतीत एसयूव्ही सेगमेंटमधील सर्व वाहनांमध्ये टाटा नेक्सॉन सर्वोत्तम ठरली आहे. पेट्रोलव्यतिरिक्त कंपनीने या एसयूव्हीचे डिझेल आणि ऑल-इलेक्ट्रिक व्हेरियंटही सादर केले आहेत. नेक्सॉनच्या डिझाइन आणि स्पेसिफिकेशन्समध्ये नुकतेच एक मोठे अपडेट पाहायला मिळाले आहे, ज्यामुळे एसयूव्ही अधिक प्रीमियम आणि स्पोर्टी दिसते. सप्टेंबर 2023 मध्ये टाटाने नेक्सॉनच्या 15,352 वाहनांची विक्री केली होती.

Maruti Suzuki Brezza

मारुती सुझुकी ब्रेझा सप्टेंबर 2023 मध्ये सर्वाधिक विकली जाणारी दुसरी एसयूव्ही आहे, कंपनीने सप्टेंबर 2022 मध्ये 15,445 युनिट्स विकले होते. तर यंदा 15,001 युनिट्सची विक्री केली. मारुती सुझुकी ब्रेझाच्या विक्रीत तीन टक्क्यांनी घट झाली असली, तरी पुन्हा दुसरे स्थान मिळविण्यात यश आले आहे. ब्रेझामध्ये जुलै 2022 मध्ये एक अपडेट केलं होते, ज्यात नवीन डिझाइन आणि अनेक टेक्निकल फीचर्स इनबिल्ट केली होती.

Tata Punch

सप्टेंबरमधील सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या टॉप 5 एसयूव्हीमध्ये टाटा पंच तिसऱ्या स्थानावर असून ही कार कंपनीची भारतातील एंट्री लेव्हल एसयूव्ही आणि ग्लोबल एनसीएपीची सर्वात स्वस्त 5 स्टार सेफ्टी रेटेड कार आहे. गेल्या महिन्यात टाटा मोटर्सने पंचच्या 13,036 युनिट्सची विक्री केली.

Hyundai Creta

ह्युंदाई क्रेटा ही सप्टेंबर 2023 मध्ये चौथ्या क्रमांकाची सर्वाधिक विकली जाणारी एसयूव्ही ठरली आहे. सप्टेंबर 2023 मध्ये Hyundai Creta चे 12,717 युनिट्स विकले गेले होते. ह्युंदाईने गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये क्रेटाच्या 12866 युनिट्सची विक्री केली होती, जी मागील महिन्याच्या तुलनेत 1 टक्क्यांनी कमी आहे. ह्युंदाई क्रेटामध्ये लवकरच नवीन लवकरच अपडेट येईल. आणि त्यात ADAS ची सुविधा देखील मिळेल.

Hyundai Venue

ह्युंदाई व्हेन्यू च्या विक्रीमध्ये सप्टेंबर 2023 मध्ये 11 टक्क्यांनी वाढ झाली. याने सप्टेंबर मध्ये 12,204 युनिट्सची विक्री केली. ह्युंदाई व्हेन्यू ही कार ह्युंदाई कंपनीची दुसरी सर्वाधिक विकली जाणारी एसयूव्ही आहे. तिच्यात नुकतेच नवीन अपडेट करण्यात आले आहे. त्यामुळे ती टाटा नेक्सॉनला टक्कर देत आहे.