Cheapest Electric Car In India:- भारतामध्ये आता इलेक्ट्रिक वाहनांचे युग अवतरत असून येणाऱ्या काही दिवसांमध्ये किंवा वर्षांमध्ये आपल्याला रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रिक वाहने धावताना दिसून येतील व यामध्ये इलेक्ट्रिक स्कूटर, इलेक्ट्रिक बाइक्स आणि कार्स यांचा मोठ्या प्रमाणावर समावेश असेल.
कारण भारतीय बाजारपेठेमध्ये आता इलेक्ट्रिक वाहन उत्पादक कंपन्यांनी अनेक बाइक्स, स्कूटर्स आणि कार्स लॉन्च केलेले आहेत व ग्राहकांच्या माध्यमातून देखील आता मोठी मागणी आपल्याला या वाहनांना दिसून येत आहे.
हळूहळू आता इलेक्ट्रिक कार घेण्याकडे देखील ग्राहकांचा कल वाढत असल्यामुळे सध्या भारतीय बाजारपेठेत अनेक चांगले आणि कमी किमतीतल्या इलेक्ट्रिक कार्स उपलब्ध आहेत व काही येणाऱ्या दिवसात लॉन्च देखील करण्यात येणार आहे.
अगदी याच पद्धतीने तुम्हाला देखील जर इलेक्ट्रिक कार घ्यायची असेल व ती देखील स्वस्तात तर या लेखामध्ये दिलेल्या काही कारची माहिती आपल्याला नक्कीच उपयोगी पडेल.
या आहेत भारतातील सर्वात स्वस्त आणि मस्त इलेक्ट्रिक कार
1- टाटा टियागो ईव्ही- टाटा मोटर्स या प्रसिद्ध वाहन उत्पादक कंपनीची ही कार असून भारतातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कारपैकी एक आहे. ही कार 19.2 kWh आणि 24 kWh च्या बॅटरी पॅकसह येते. यातील 19.2kWh बॅटरी पॅक 61 पीएस पावर आणि 110 एनएमचा टॉर्क जनरेट करण्यासाठी सक्षम आहे.
तर 24 kWh चा बॅटरी पॅक 75 पीएस पावर आणि 114 एनएमचा टॉर्क जनरेट करते. यामध्ये जर बघितले तर 19.2 kWh च्या बॅटरी पॅकची रेंज अंदाजे 250 किमी आणि 24 kWh च्या बॅटरी पॅकची रेंज अंदाजे 315 किमी इतकी आहे. या कारची किंमत पाच लाखांपासून सुरू होते.
2- एमजी कॉमेट ईव्ही- भारतातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार म्हणून एमजी कॉमेट ईव्ही प्रसिद्ध असून ही कार तीन दरवाजासह येते. ही मायक्रो इलेक्ट्रिक हॅचबॅक कार असून यामध्ये 17.3 kWh क्षमतेचा बॅटरी पॅक आहे जे एका चार्जवर 230 किमी पर्यंत रेंज देते.
यामध्ये असलेले बॅटरी पॅक 42 पीएसची पावर आणि 110 nm चा टॉर्क जनरेट करण्यासाठी सक्षम आहे. या कारमध्ये वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि एप्पल कारप्ले सह 10.25 इंच टच स्क्रीन इन्फोटेन्मेट सिस्टम,10.25 इंच डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, कनेक्टेड कार तंत्रज्ञान तसेच 12V पावर आऊटलेट, यूएसबी चार्जिंग पोर्ट आणि किलेस एंट्री यासारखे फीचर्स दिले आहेत. या कारची एक्स शोरूम किंमत चार लाख 99 हजार रुपये आहे.
3- पीएमव्ही EaS-E- ही देखील भारतातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार असून मुंबई येथील पर्सनल मोबिलिटी व्हेईकलने ही कार लॉन्च केली आहे. या कारची एक्स शोरूम किंमत चार ते पाच लाख रुपयांच्या दरम्यान आहे.
ही छोटी म्हणजेच मायक्रो इलेक्ट्रिक कार असून यामध्ये फक्त दोनच लोक बसू शकतात. या कारच्या रेंज बद्दल कंपनीचा दावा आहे की ही कार एका चार्जमध्ये 160 किलोमीटरची रेंज येते व या कारला चार्ज होण्याकरिता किमान चार तासाचा कालावधी लागतो.