ऑटोमोबाईल

Best Mileage Bike: ‘या’ आहेत भारतातील सर्वात जास्त मायलेज देणाऱ्या बाईक्स! दिवाळीला खरेदी करायची असेल बाईक्स तर वाचा यादी

Published by
Ajay Patil

Best Mileage Bike:- बाईक अथवा कार खरेदी करताना सगळ्यात अगोदर आपला बजेट आणि त्या बजेटमध्ये म्हणजेच परवडणाऱ्या किमतीत उत्तम अशी वैशिष्ट्ये आणि मायलेज असणारी बाईक किंवा कार निवडली जाते. यामध्ये जर आपण बघितले तर मायलेज हे सगळ्यात महत्त्वाची बाब असून वाहनाचे म्हणजेच कार किंवा बाईकचे मायलेज जर उत्तम असेल तर मोठ्या प्रमाणावर पैशांची बचत देखील होते.

त्यामुळे मायलेज ही संकल्पना वाहन खरेदीमध्ये खूप महत्त्वाची असते.सध्या बाईक्स च्या दृष्टिकोनातून बघितले तर बजाजची फ्रीडम 125 ही सीएनजी बाईक  जगातील पहिली सीएनजी मोटरसायकल असण्यासोबतच भारतातील सर्वाधिक मायलेज देणारी बाईक बनली आहे.

बजाजची ही सीएनजी बाईक 330km ची ड्रायव्हिंग रेंज देईल असा कंपनीचा दावा आहे. परंतु या व्यतिरिक्त भारतातील सर्वाधिक मायलेज देणाऱ्या बाईक्स देखील महत्त्वाच्या असून त्यामध्ये अनेक दिग्गज कंपन्यांच्या बाईकचा समावेश होतो.

 या आहेत भारतातील सर्वात टॉप मायलेज देणाऱ्या बाईक्स

1- होंडा लिव्हो ड्रम होंडा कंपनीच्या या बाईक मध्ये १०९.५१ सीसी इंजिन देण्यात आले असून जे 8.79 पीएस पावर आणि 9.30 एनएम टॉर्क जनरेट करते व या बाईकच्या मायलेज बद्दल विचार केला तर कंपनी दावा करते की ती 74 किलोमीटरचे मायलेज देते. या बाईकची एक्स शोरूम किंमत 78 हजार पाचशे रुपये आहे.

2- बजाज प्लेटिना 100- बजाज ऑटोची ही एक अतिशय लोकप्रिय बाईक असून मायलेजच्या बाबतीत ही बाईक खूप उत्कृष्ट आहे. एक लिटर पेट्रोलमध्ये ही बाईक 72 किलोमीटरचे मायलेज देते.

या बाईक्समध्ये 102 cc इंजिन देण्यात आले असून जे 7.79 बीएचपी पावर आणि 8.34nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. बजाज प्लेटिना 100 ची एक्स शोरूम किंमत 67 हजार आठशे आठ रुपये आहे.

3- हिरो स्प्लेंडर प्लस हिरो मोटो कॉर्पची ही बाईक भारतात खूपच लोकप्रिय असून आजही रस्त्यांवर धावणाऱ्या बाईक्समध्ये या बाईक्सची संख्या मोठी आहे.

या बाईकची एक्स शोरूम किंमत 75 हजार 141 रुपये असून तिच्यामध्ये 97.2 सीसी क्षमतेचे इंजिन देण्यात आले आहे. जे 8.02 पीएस पावर आणि ८.०५ एनएम टॉर्क जनरेट करते. ही बाईक एक लिटर पेट्रोलमध्ये 73 किलोमीटरचे मायलेज देते.

4- टीव्हीएस स्पोर्ट टीव्हीएस कंपनीची मोटर बाईक दोन मॉडेल्स मध्ये येते. यामध्ये एका मॉडेलची एक्स शोरूम किंमत 59881 रुपये आणि दुसऱ्याची किंमत 71 हजार 223 रुपये आहे.

या बाईकमध्ये 190.7 सीसी क्षमतेचे इंजिन देण्यात आले असून जे 8.19 बीएचपी पावर आणि 8.7 एनएम टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. ही बाईक एक लिटर पेट्रोलमध्ये 70 किलोमीटरचे मायलेज देते.

5- होंडा शाईन 100- होंडा कंपनीची ही बाईक चांगलीच लोकप्रिय असून या बाईक मध्ये 98.98 सीसी क्षमतेचे इंजिन देण्यात आले असून जे 7.38 बीएचपी पावर आणि 8.05 एनएम टॉर्क जनरेट करते व ही बाईक एक लिटर पेट्रोलमध्ये 65 किलोमीटर पर्यंत मायलेज देते. या बाईकची एक्स शोरूम किंमत 64 हजार 900 रुपये आहे.

Ajay Patil