Under 10 Lakh 7 Seater Cars : 10 लाख रुपयांपेक्षा स्वस्तात उपलब्ध आहेत या प्रीमियम फॅमिली कार ! जाणून घ्या मायलेज आणि किंमत

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Under 10 Lakh 7 Seater Cars : देशातील ऑटो मार्केटमध्ये अनेक कार उत्पादक कंपन्यांच्या उत्तम 7 सीटर फॅमिली कार उपलब्ध आहेत. तसेच फॅमिली कारच्या मागणीत वाढ होत असल्याने अनेक कंपन्या त्यांच्या नवीन MPV कार भारतात लाँच करणार आहेत.

महागाई वाढत असल्याने कारच्या किमती देखील वाढत आहेत. मोठ्या फॅमिलीसाठी कार खरेदी करताना अनेकजण 7 सीटर कारचा पर्याय निवडत आहेत. तुम्हालाही तुमच्या फॅमिलीसाठी उत्तम 7 सीटर कार हवी असेल तर मारुती ते महिंद्राच्या कारचा पर्याय निवडू शकता.

मारुती सुझुकी एर्टिगा

मारुती सुझुकी कार उत्पादक कंपनीकडून त्यांची एर्टिगा 7 सीटर कार भारतात लाँच केली आहे. एर्टिगा देशातील सर्वाधिक विक्री होणारी 7 सीटर कार आहे. या कारच्या बेस मॉडेलची एक्स शोरूम शोरूम किंमत 8.64 लाख रुपये आहे.

या कारचे पेट्रोल मॉडेल 20.51 kmpl मायलेज देण्यास सक्षम आहे. एर्टिगा कारमध्ये पेट्रोल आणि CNG इंजिन पर्याय देण्यात आला आहे. तुमच्या मोठ्या फॅमिलीसाठी एर्टिगा ही एक उत्तम मायलेज देणारी 7 सीटर कार आहे.

मारुती Eeco

मारुती सुझुकीची Eeco देशातील सर्वात स्वस्त 7 सीटर कार आहे. कमी बजेट असणाऱ्या ग्राहकांसाठी Eeco 7 सीटर कार सर्वोत्तम पर्याय आहे. Eeco कारची एक्स शोरूम किंमत 5.56 लाख रुपये आहे.

या कारमध्ये पेट्रोल आणि CNG इंजिन पर्याय देण्यात येत आहे. Eeco कारचे पेट्रोल व्हेरियंट 16.11 kmpl मायलेज देण्यास सक्षम आहे.

महिंद्रा बोलेरो

महिंद्रा कार कंपनीकडून भारतीय ऑटो मार्केटमध्ये त्यांच्या अनेक शक्तिशाली 7 सीटर कार सादर केल्या आहेत. महिंद्राची स्वस्त शक्तिशाली 7 सीटर कार खरेदी करायची असेल तर बोलेरो कारचा उत्तम पर्याय आहे.

या कारची एक्स शोरूम किंमत 9.78 लाख रुयांपासून सुरु होते. कारमध्ये 1498 सीसी इंजिन देण्यात आले आहे. ही कार 16 Kmpl मायलेज देण्यास सक्षम आहे.

Renault Triber

Renault कार कंपनीकडून त्यांची Triber एसयूव्ही अगदी कमी बजेटमध्ये सादर करण्यात आली आहे. कारची एक्स शोरूम किंमत 6.33 लाख रुपये आहे तर टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 8.97 लाख रुपये आहे. कारमध्ये 999 सीसी इंजिन देण्यात आले आहे जे 18.2 ते 20.0 kmpl मायलेज देण्यास सक्षम आहे.