फोरव्हीलर घ्यायचा विचार आहे? Honda City व Amaze वर मिळतोय हजारो रुपयांचा डिस्काउंट

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सध्या दिवाळीचा हंगाम सुरु आहे. या काळामध्ये खरेदीचे प्रमाण जास्त प्रमाणात वाढते. अनेक लोक या काळात प्रचंड खरेदी करत असतात. याचा फायदा घेण्यासाठी अनेक कंपन्या विविध ऑफर देत असतात. याच पार्श्वभूमीवर आता Honda ने देखील जबरदस्त डिस्काउंट ऑफर आणली आहे. आपल्या Honda City व Amaze वर बम्पर डिस्काउंट तुम्हाला मिळणार आहे.

तुम्ही जर New City 5th Gen घेतली तर त्यावर तुम्हाला 88600 हजार रुपयांपर्यंत डिस्काउंट मिळेल. Amaze वर 67000 हजार रुपयांपर्यंत डिस्काउंट मिळेल. New City 5th Gen ची शोरूम किंमत 11.62 लाख रुपये तर अमेजची एक्स शोरूम किंमत 7.09 लाख रुपये आहे.

तुम्हाला या दोन्ही कारवर जो डिस्काउंट मिळत आहे त्यामध्ये कॅश डिस्काउंट, एक्सचेंज बोनस, स्पेशल एडिशन बेनिफिट, कॉर्पोरेट डिस्काउंट आणि लॉयल्टी बोनस आदींचा समावेश आहे. आता आपण याठिकाणी या दोन्ही कारच्या फीचर्सबद्दल माहिती जाणून घेऊयात –

आधी जाणून घेऊयात होंडा सिटीचे फिचर्स
या कारमधील पेट्रोल इंजिन बाबत पाहिलं तर यात 1.5 लीटर पेट्रोल इंजिन देण्यात आलेले असून याचे टॉप मॉडेल 16.11 लाख रुपयांपर्यंत जाते. या कारमध्ये 506 लिटरची बूट स्पेस देण्यात आली आहे. ही शानदार कार तब्बल एसव्ही, व्ही, व्हीएक्स आणि झेडएक्स या चार व्हेरियंटमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे.

या कारमध्ये ८ इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टिम देण्यात आली असून ही कार तुम्हाला सहा मोनोटोन कलरमध्ये उपलब्ध होईल. ही कार पॉवरच्या बाबतीतही भारी आहे. ही जवळपास 121 PS पॉवर आणि 145 Nm टॉर्क जनरेट करते. ही कार 6-स्पीड मॅन्युअल आणि सीव्हीटी ट्रान्समिशनमध्ये उपलब्ध आहे. कारमध्ये इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल आहे.

आता जाणून घेऊयात होंडा अमेजचे फिचर्स
होंडाची ही कार देखील प्रसिद्ध आहे. या कार वर देखील मोठा डिस्काउंट मिळत आहे. या कारमध्ये 420 लीटरचा बूट स्पेस आहे. ही कार ई, एस आणि व्हीएक्स या तीन व्हेरियंट मिळत आहे. कार मधील पेट्रोल इंजिनबाबत पाहिले तर यात 1.2 लीटर पेट्रोल इंजिन कंपनीने दिले आहे.

या कारचे टॉप मॉडेल 9.86 लाख रुपयांपर्यंत जाते. कलर म्हणाल तर यात पाच मोनोटोन कलर ऑप्शन दिले गेले आहेत. ही कार 90 पीएस पॉवर आणि 110 एनएम टॉर्क जनरेट करते. सेफ्टीसाठी या कारमध्ये एअरबॅग दिलेल्या आहेत. या कार मध्ये ५ स्पीड गिअरबॉक्स असून रियर पार्किंग सेन्सर आणि रियर व्ह्यू कॅमेरा देखील देण्यात आला आहे.