Toyota Fortuner SUV : टोयोटा फॉर्च्युनर खरेदीचा विचार आहे? तर त्याआधी वाचा ही महत्वाची बातमी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Toyota Fortuner SUV : टोयोटाकडून भारतीय ऑटो मार्केटमध्ये त्यांच्या अनेक लक्झरी फीचर्स आलिशान कार लाँच करण्यात आल्या आहेत.

टोयोटा आणि मारुती सुझुकीच्या भागीदारीतून अनेक कार भारतीय ऑटो मार्केटमध्ये सादर करण्यात आल्या आहेत. त्यांच्या या कारला ग्राहकांचा देखील चांगला प्रतिसाद मिळत आहे.

टोयोटाच्या लक्झरी आलिशान कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला त्याआधी कारवरील प्रतीक्षा कालावधी जाणून घ्यावा लागेल. कारण टोयोटाच्या आलिशान कारला मागणी जास्त आणि उत्पादन कमी असल्याने ग्राहकांना अधिकाधिक जास्त दिवसांची प्रतीक्षा करावी लागत आहे.

टोयोटाकडून त्यांच्या सर्वच कारवरील या महिन्यात अपडेटेड प्रतीक्षा कालावधी जाहीर करण्यात आला आहे. रुमिओन, हायरायडर, फॉर्च्युनर आणि इनोव्हा क्रिस्टा कारवर ग्राहकांना सर्वाधिक प्रतीक्षा करावी लागत आहे.

तुम्हीही टोयोटाची लक्झरी एसयूव्ही फॉर्च्युनर कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर त्याआधी तुम्हाला कारवरील प्रतीक्षा कालावधी जाणून घ्यावा लागेल. कारण या कारच्या मागणीत वाढ झाल्याने प्रतीक्षा कालावधी देखील वाढला आहे.

टोयोटा फॉर्च्युनर किंमत

टोयोटाकडून सध्या मारुती सुझुकी कारवर आधारित त्यांच्या स्वस्त कार भारतात सादर केल्या जात आहेत. मात्र टोयोटाच्या इतर एसयूव्ही कार महागड्या आहेत. फॉर्च्युनर एसयूव्ही कारच्या बेस मॉडेलची एक्स शोरूम किंमत 33.43 लाख रुपयांपासून सुरु होते तर टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 51.44 लाख रुपये आहे.

Toyota Fortuner प्रतीक्षा कालावधी

नवीन टोयोटा Fortuner एसयूव्ही कार खरेदी करणार असाल तर तुम्हाला कार बुकिंग केल्यानंतर 8 आठवड्यांपर्यंत प्रतीक्षा करावी लागेल. कंपनीकडून हा प्रतीक्षा कालावधी जानेवारी महिन्यासाठी जाहीर केला आहे.

याआधी या कारचा प्रतीक्षा कालावधी 12 आठवड्यांचा होता. Fortuner एसयूव्ही कार Skoda Kodiaq आणि MG Gloster शी स्पर्धा करते.

टोयोटा फॉर्च्युनर इंजिन पॉवरट्रेन

टोयोटाकडून त्यांच्या सर्वच कारमध्ये शक्तिशाली इंजिन पर्याय दिला आहे. फॉर्च्युनर एसयूव्ही कारमध्ये कंपनीकडून 2.7-लीटर पेट्रोल इंजिन आणि 2.8-लीटर डिझेल इंजिन पर्याय देण्यात आला आहे. हे इंजिन 6-स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्सशी जोडण्यात आली आहेत. फॉर्च्युनर एसयूव्ही कार 7 रंग पर्यायामध्ये सादर करण्यात आली आहे.