भारतीय बाजारात लवकरच लॉन्च होणार ‘ही’ 7 सीटर कार, फक्त 25 हजारात करता येणार बुकिंग

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

New Car : जर तुम्हीही या नवीन वर्षात नवीन कार घेण्याचा संकल्प घेतलेला असेल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची अपडेट आहे. नवीन कार घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी आता बाजारात आणखी एका कारची भर पडणार आहे. कारण की देशातील एका बड्या कार निर्माता कंपनीने नवीन सेवन सीटर कारची बुकिंग सुरू केली आहे. खरे तर भारतीय बाजार सेव्हन सीटर कारला मोठी डिमांड आहे. याचे कारण म्हणजे भारतात अजूनही एकत्रित कुटुंब पद्धती पाहायला मिळते. यामुळे मोठ्या कुटुंबासाठी लोक सेवन सीटर कार घेण्याचे स्वप्न पाहतात.

दरम्यान सेवन सीटर कार घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी आघाडीची कार उत्पादक कंपनी सिट्रॉन एक नवीन कार लॉन्च करणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार Citroen कंपनी C3 Aircross Automatic कार लॉन्च करणार आहे. यासाठी 25,000 च्या टोकन किंमतीवर बुकिंग देखील सुरू करण्यात आली आहे. हाती आलेल्या माहितीनुसार या नव्याने लॉन्च होणाऱ्या Citroen कारची विक्री पुढील आठवड्यापासून भारतात सुरू होणार आहे. मात्र काही डीलर सिट्रोएन सी 3 एअरक्रॉसची विक्री पुढील महिन्यात सुरू होईल असे सांगितले जात आहे.

यामुळे आता ही कार पुढील आठवड्यात बाजारात येणार की पुढल्या महिन्यात हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे. खरे तर कंपनीच्या माध्यमातून ही नवीन SUV 5-सीटर आणि 7-सीटर अशा दोन्ही पर्यायांमध्ये उपलब्ध करून देणार आहेत. C3 Aircross ऑटोमॅटिकची किंमत मॅन्युअल-गिअरबॉक्सपेक्षा सुमारे 1 लाख रुपये जास्त असेल. अशा परिस्थितीत आता आपण या नव्याने लॉन्च होणाऱ्या ऑटोमॅटिक कारची सर्व वैशिष्ट्ये अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया याविषयी सविस्तर अपडेट.

खरंतर सध्या बाजारात C3 एअरक्रॉस ही कार ऑटोमॅटिक वेरियंट मध्ये उपलब्ध नाहीये. दरम्यान स्वयंचलित गिअरबॉक्सच्या कमतरतेमुळे या कारला खूपच कमी प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे. आता मात्र या कारचे ऑटोमॅटिक वेरियंट बाजारात येणार असल्याने याला चांगली मागणी राहील अशी आशा आहे.

भारतीय बाजारपेठेत मारुती ग्रँड विटारा, ह्युंदाई क्रेटा, टाटा नेक्सन, होंडा एलिवेट, किया सेल्टोस यांसारख्या मॉडेल्सशी स्पर्धा करते. सध्या तरी मात्र ऑटोमॅटिक वेरियंट उपलब्ध नसल्याने ही कार या मॉडेलशी स्पर्धा करत नाहीये. या कारमध्ये असणाऱ्या फीचर्स बाबत बोलायचं झालं तर यात ड्युअल फ्रंट एअरबॅग, रिव्हर्स पार्किंग कॅमेरा आणि ABS तंत्रज्ञानासह सेन्सर, मॅन्युअली अॅडजस्टेबल ड्रायव्हर सीट, हॅलोजन हेडलाइट्स, LED DRLs आणि 17-इंच डायमंड कट अलॉय व्हील असे फीचर्स समाविष्ट करण्यात आले आहेत.

मीडिया रिपोर्ट नुसार ही नव्याने लॉन्च होणारी Citroen C3 Aircross Automatic कार देखील मॅन्युअल प्रकाराप्रमाणेच 1.2-लीटर टर्बो-पेट्रोल इंजिनसह सुसज्ज राहणार आहे. म्हणजेच नव्याने लॉन्च होणाऱ्या कारच्या इंजिन मध्ये बदल केला जाणार नाही. दरम्यान ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचा पर्याय या कारच्या टॉप-2 प्रकारांमध्ये उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे. Citroen C3 Aircross ची सुरुवातीची (एक्स-शोरूम) किंमत 9.99 लाख रुपये आहे. पण आता ऑटोमॅटिक व्हर्जन ची किंमत किती राहणार हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.