New Toyota Fortuner : कार घेणाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. जर तुम्हीही नवीन वर्षात कार घेण्याचे स्वप्न पाहत असाल तर तुमच्यासाठी ही अपडेट अधिक महत्त्वाचे ठरणार आहे. कारण की नवीन वर्षात बाजारात टोयोटा न्यू जनरेशन फॉर्च्यूनरसह आणखी एक गाडी बाजारात लॉन्च होणार आहे. भारतात टोयोटा फॉर्च्यूनरच्या चाहत्यांची संख्या खूपच अधिक आहे.
ही गाडी ग्राहकांमध्ये खूपच लोकप्रिय आहे. या कारने भारतीयांना अक्षरशः वेड लावले आहे. हेच कारण आहे की कंपनीने टोयोटा न्यू जनरेशन फॉर्च्यूनर लॉन्च करण्याचा निर्णय घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार सर्वप्रथम ही गाडी ग्लोबल मार्केटमध्ये लॉन्च होण्याची शक्यता आहे. पुढल्या वर्षी ही गाडी ग्लोबल मार्केटमध्ये लॉन्च होईल आणि लगेचच ही गाडी भारतीय बाजारात लॉन्च केले जाऊ शकते असा दावा मीडिया रिपोर्ट मध्ये केला जात आहे.
एवढेच नाही तर पुढील वर्षी एमजी ग्लॉस्टर या कारचे फेसलिफ्ट वर्जन देखील बाजारात लॉन्च केले जाऊ शकते. अशा परिस्थितीत आज आपण टोयोटा न्यू जनरेशन फॉर्च्यूनर आणि एमजी ग्लॉस्टर फेसलिफ्ट या अपकमिंग गाड्यांमध्ये काय नवीन फीचर्स राहू शकतात याविषयी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
टोयोटा न्यू जनरेशन फॉर्च्यूनर कार : टोयोटा कंपनीच्या भारतात अनेक गाड्या लोकप्रिय आहेत. यामध्ये फॉर्च्यूनर कारचा देखील समावेश होतो. दरम्यान नवीन वर्षात याच गाडीचे न्यू जनरेशन मॉडेल लॉन्च करण्याची तयारी कंपनीने सुरू केली आहे. म्हणजे आगामी काळात फॉर्च्युनर अपडेट होणार आहे.
ही फुलसाईज एसयूव्ही अगदी नवीन TNGA-F प्लॅटफॉर्मवर आधारित असू शकते, अशी माहिती काही प्रतिष्ठित रिपोर्ट मधून समोर आली आहे. ही कार इनोव्हा हिक्रॉस या प्लॅटफॉर्मवर आधारित राहणार आहे. अद्ययावत इनोव्हा हायक्रॉसला प्रगत ड्रायव्हर असिस्टंट सिस्टीम, 360 डिग्री पॅनोरामिक सनरूफ तसेच नवीन 2.8 लीटर 1GD-FTV डिझेल इंजिन मिळेल, जे सौम्य हायब्रिड तंत्रज्ञानासह पाहिले जाऊ शकते.
एमजी ग्लोस्टर फेसलिफ्ट : एमजी मोटर इंडियाने भारतीय बाजारात अनेक कार लॉन्च केल्या आहेत. या कंपनीला भारतीय ग्राहकांनी चांगले प्रेम दाखवले आहे. दरम्यान ही कंपनी पुढील वर्षी आपली लोकप्रिय गाडी एमजी ग्लोस्टरचे फेसलिफ्ट वर्जन लॉन्च करण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त समोर आले आहे.
पुढील वर्षी अपडेटेड ग्लोस्टर भारतीय बाजारात लॉन्च होणार आहे. यामुळे जर तुम्हीही ग्लोस्टर गाडीचे फॅन असाल तर तुमच्यासाठी ही नवीन गाडी तुमच्यासाठी एक बेस्ट ऑप्शन ठरू शकते. या फेसलिफ्ट गाडीत मात्र अनेक महत्त्वाचे बदल केले जाणार आहेत.
या कारच्या बाह्य भागासोबतच आतील भागातही अनेक बदल पाहायला मिळतील. यात नवीन हेडलाइट आणि टेल लॅम्प, अपडेटेड बंपर, नवीन फ्रंट ग्रिल, नवीन डिझाइन अलॉय व्हील यासह अनेक महत्त्वाचे आणि उत्कृष्ट फीचर्स समाविष्ट केले जाणार आहेत. यामुळे या गाडीला सुद्धा भारतात विशेष पसंत केले जाईल असा दावा कंपनीने केला आहे.