ऑटोमोबाईल

मोठी बातमी ! भारतीय बाजारात लवकरच लाँच करणार ‘या’ कार ; वाचा डिटेल्स

Published by
Ahmednagarlive24 Office

Upcoming Car Launch : जर तुम्हीही नजीकच्या भविष्यात कार खरेदीचे स्वप्न पाहिले असेल तर तुमच्यासाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी आहे. कारण की, येत्या तीन-चार महिन्यात भारतीय कार बाजार अनेक कंपन्या नवीन कार लॉन्च करणार आहेत.

अशा परिस्थितीत, जर तुम्हीही या नवीन वर्षात नवीन कार खरेदी करण्याचे स्वप्न पाहत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी खूपच खास राहणार आहे. आज आपण येत्या तीन ते चार महिन्यात भारतीय कार बाजारात कोणत्या नवीन कार लॉन्च होणार याविषयी अगदी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

महिंद्रा XUV 300 फेसलिफ्ट : मारुती ही देशातील एक प्रमुख ऑटो कंपनी आहे. या कंपनीच्या अनेक कार भारतीय बाजारात लॉन्च झालेल्या आहेत. विशेष म्हणजे ग्राहकांनी या कंपनीच्या अनेक गाड्यांना चांगला प्रतिसादही दाखवला आहे. महिंद्रा XUV 300 ही देखील कंपनीची एक लोकप्रिय कार आहे.

आता कंपनी याच लोकप्रिय कारचे फेसलिफ्ट वर्जन बाजारात लॉन्च करणार आहे. पुढील महिन्यात ही कार लॉन्च होणार असा दावा केला जात आहे. विशेष म्हणजे बाजारात लॉन्च होणाऱ्या या फेसलिफ्ट वर्जन मध्ये कंपनीच्या माध्यमातून अनेक महत्त्वाचे बदल केले जाणार आहेत.

नवीन-जनरेशन मारुती सुझुकी स्विफ्ट : मारुती या लोकप्रिय कार मेकर कंपनीची मारुती सुझुकी स्विफ्ट या लोकप्रिय कारचे नवीन जनरेशन मॉडेल लवकरच बाजारात उतरवले जाणार आहे. नवीन-जनरेशन मारुती सुझुकी स्विफ्ट एप्रिल-मे 2024 पर्यंत भारतात लॉन्च होईल असा अंदाज देण्यात आला आहे.

टाटा कर्व : Tata ही देशातील एक प्रमुख ऑटो कंपनी आहे. या लोकप्रिय ऑटो कंपनीने बाजारात Tata Punch Ev लॉन्च केली आहे. अशातच आता Tata Curve ही कार लाँच होणार आहे. 2024 च्या उत्तरार्धात कर्व लॉन्च केली जाऊ शकते अशी अपेक्षा आहे. या नव्याने लॉन्च होणाऱ्या कारमध्ये नियमित ICE पॉवरट्रेन लाँच करण्यात येणार आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office