गरिबांसाठी लवकरच लाँच होतेय ‘ही’ इलेक्ट्रिक बाईक, मिळेल 206 किलोमीटरची रेंज, किंमत अगदी कमी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Vinfast Evo 200 Electric Scooter : आजच्या काळात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीप्रचंडन वाढलेल्या आहेत. प्रत्येकाला या समस्येतून सुटका हवी आहे. यामुळे अनेक इलेक्ट्रिक वाहने मार्केटमध्ये आली आहेत, कारण लोकांमध्ये त्यांची मागणीही झपाट्याने वाढत आहे.

जेव्हापासून इलेक्ट्रिक वाहने बाजारात येऊ लागली, तेव्हापासून इलेक्ट्रिक स्कूटरची मागणी सर्वाधिक वाढली आहे. पण कोणत्या इलेक्ट्रिक स्कूटरची रेंज सर्वाधिक आहे, जेणे करून लांबच्या प्रवासाला ते उपयोगी पडेल हे बहुतांशी लोकांना समजत नाही.

तसेच याच्या असणाऱ्या सर्वाधिक किमती देखील अनेकांचे बजेट कमी जास्त करतात. परंतु आता एक कमी किमतीत जास्त रेंज देणारी बाईक येत आहे. चला जाणून घेऊयात –

Vinfast Evo 200 Electric Scooter

ज्यांना सिंगल चार्जवर लांबचा प्रवास करायचा आहे त्यांच्यासाठी Vinfast Evo 200 इलेक्ट्रिक स्कूटर सर्वोत्तम असेल. इलेक्ट्रिक स्कूटर अद्याप लाँच करण्यात आलेली नसली तरी बाजारात येताच लोक ती खरेदी करण्यासाठी गर्दी करतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. कारण कंपनीनं लोकांचं लक्ष वेधून घेण्यासाठी अनेक फीचर्स दिले आहेत.

Vinfast Evo 200 Electric Scooter मधील मोटर

Vinfast Evo 200 इलेक्ट्रिक स्कूटरची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे ती कोणत्याही रस्त्यावर सहज धावू शकते. कंपनीने यामध्ये 2500 वॅट्सची पॉवरफुल मोटर वापरली आहे. ही स्कूटर गाव आणि शहर अशा दोन्ही रस्त्यांवर चालवता येते, त्यामुळे ही इलेक्ट्रिक स्कूटर प्रत्येकासाठी उत्तम पर्याय मानली जात आहे.

Vinfast Evo 200 Electric Scooter ची रेंज

आज प्रत्येकाला हाय रेंज असलेली इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करायची असते. कारण वारंवार चार्जिंगच्या समस्येपासून प्रत्येकाला सुटका हवी असते. या कारणास्तव, ज्यांना लांब पल्ल्याचा प्रवास करायचा आहे त्यांच्यासाठी विनफास्ट इवो 200 इलेक्ट्रिक स्कूटर सर्वोत्तम पर्याय आहे, कारण ती 206 किलोमीटरची रेंज देते.

Vinfast Evo 200 Electric Scooter ची किंमत

Vinfast Evo 200 Electric Scooter अद्याप लाँच करण्यात आलेली नाही. पण बाजारात ती लाँच होताच लोक खरेदीसाठी तुटून पडतील. कारण या बाईकची किंमत 75 हजार रुपये असणार आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये देण्यात आलेल्या फीचर्सचा विचार करता ही किंमत खूपच कमी आहे.

ज्यांना कमी किंमतीत चांगल्या फीचर्ससह इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करायची आहे त्यांच्यासाठी विनफास्ट इवो 200 हा उत्तम पर्याय ठरू शकतो.