ऑटोमोबाईल

Best Electric Scooter: ड्रायव्हिंग लायसन्स शिवाय ‘या’ इलेक्ट्रिक स्कूटर चालवण्याचा आनंद घ्या! भारतात आहेत खूपच लोकप्रिय

Published by
Ajay Patil

Best Electric Scooter:- जेव्हाही आपण कुठल्याही प्रकारचे वाहन रस्त्यावर चालवतो तेव्हा आपल्याला वाहतुकीचे नियम पाळणे खूप गरजेचे असते. वाहतुकीचे नियम व इतर आवश्यक गोष्टी पाळून प्रवास केला नाही तर कारवाई देखील होऊ शकते व दंड देखील आकारला जाऊ शकतो हे आपल्याला माहिती आहे.

तसेच दुसरे महत्त्वाचे म्हणजे वाहतुकीचे नियम मोडल्यामुळे अपघाताला देखील निमंत्रण मिळू शकते. त्याशिवाय कुठल्याही प्रकारचे वाहन चालवताना आपल्याला वाहन परवाना म्हणजेच ड्रायव्हिंग लायसन ची आवश्यकता भासते. मग ती दुचाकी असो किंवा चार चाकी किंवा एखाद्या अवजड वाहन रस्त्यावर चालवण्याकरिता तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स आवश्यक असतेच.

तसेच इलेक्ट्रिक वाहनां करता देखील ड्रायव्हिंग लायसन्स तुम्हाला लागते. परंतु जर आपण इलेक्ट्रिक वाहनांच्या अनुषंगाने पाहिले तर काही इलेक्ट्रिक स्कूटर अशा आहेत ज्या तुम्ही रस्त्यावर चालवाल तेव्हा त्याकरिता तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्सची गरज भासत नाही.

स्कूटर प्रतितास 25 किलोमीटर वेगाने धावणाऱ्या असतात व त्यामुळे कुठल्याही प्रकारचे ड्रायव्हिंग लायसन्स तुम्हाला लागत नाही. त्यामुळे या कोणत्या इलेक्ट्रिक स्कूटर आहेत त्या आपण या लेखात बघू.

 या इलेक्ट्रिक स्कूटर चालवण्यासाठी नाही लागत ड्रायव्हिंग लायसन्स

1-

हिरो इलेक्ट्रिक फ्लॅश ही इलेक्ट्रिक स्कूटर लहान 250W BLDC हब मोटरसह सुसज्ज असून ती तुम्हाला फक्त 25 किलोमीटर प्रतितास टॉप स्पीड देते व ही 28AH लीड एसिटेट बॅटरीसह येते व ही बॅटरी हिरो इ स्कूटरला 50 किमीची रेंज देते. या हिरो इलेक्ट्रिक फ्लॅश इलेक्ट्रिक स्कूटरची एक्स शोरूम किंमत 59 हजार 640 रुपये आहे.

2- डेल्टीक ड्रीक्स या इलेक्ट्रिक स्कूटर मध्ये तुम्हाला 1.58 kWh क्षमतेचा बॅटरी पॅक मिळतो व जो 70 किमी ते 100 किमी दरम्यानची रेंज ऑफर करतो. या इलेक्ट्रिक स्कूटरचा टॉप स्पीड हा 25 किलोमीटर प्रतितास इतका असून ही स्कूटर भारतामध्ये 58 हजार 490 ते 84 हजार 990( एक्स शोरूम ) किमतीत मिळते.

3- ओकिनावा R 30-

या इलेक्ट्रिक स्कूटर मध्ये 1.25 kWh लिथियम आयन बॅटरी मिळते व ही 60 किमीची ड्रायव्हिंग रेंज ऑफर करते. ही पूर्ण चार्ज होण्याकरिता चार ते पाच तासाचा कालावधी घेते व या इलेक्ट्रिक स्कूटरची भारतातील किंमत ही 61,998( एक्स शोरूम) इतकी आहे.

4- कायनेटिक झिंग ही इलेक्ट्रिक स्कूटर मध्ये 22AH बॅटरी मिळते व ती 100 किमीची ड्रायव्हिंग रेंज देते. या इलेक्ट्रिक स्कूटरच्या बाबतीत पाहिले तर ही स्कूटर चालवण्यासाठी हेल्मेटची आवश्यकता आहे परंतु परवाना लागत नाही. या इलेक्ट्रिक स्कूटरची भारतातील किंमत 71 हजार 990 ते 84 हजार 990( एक्स शोरूम ) इतकी आहे.

5- कोमाकी XGT KM- ही इलेक्ट्रिक स्कूटर 20-30Ah लीड एसिड बॅटरी सह येथे व एका चार्जवर 85 किमीची रेंज देते. या इलेक्ट्रिक स्कूटरची भारतातील किंमत 56 हजार 890 ते 93 हजार 45 रुपये( एक्स शोरूम) इतकी आहे.

Ajay Patil