ऑटोमोबाईल

Cars With Sunroof: ‘या’ आहेत 10 लाख रुपयापेक्षा कमी किमतीतल्या सनरूफ असलेल्या कार! वाचा या आकर्षक कारच्या किमती आणि वैशिष्ट्ये

Published by
Ajay Patil

Cars With Sunroof:- आता पावसाळा सुरू झाला असून काही दिवसांमध्ये सगळीकडे हिरवाईने नटलेल्या रस्त्याच्या आजूबाजूचा परिसर आणि डोंगरमाथे आपल्याला दिसून यायला लागतील व अशा पावसाळ्यामध्ये जेव्हा आपण प्रवास करतो तेव्हा कार किंवा वाहनातून प्रवास करताना छान हिरव्यागार झाडांचे दृश्य अनुभवत उगवलेले छान असे हिरवेगार गवत पहात पहात प्रवास करण्याची मजा खूप महत्त्वाची असते.

त्यातल्या त्यात जर सनरूफ असणारी कार असेल तर मात्र हा आनंद द्विगुणीत होतो. सनरूफ हे वैशिष्ट्ये आतापर्यंत लक्झरी गाड्यांमध्ये देण्यात आलेले होते परंतु आता अनेक एसयुव्ही तसेच हॅचबॅक गाड्यांमध्ये देखील आता सनरूफ समाविष्ट करण्यात आलेले आहे. तसेच बरेच नागरिक कार खरेदी करताना अनेक वेगवेगळे वैशिष्ट्ये पाहतात व यामध्ये आता सनरूफ असणाऱ्या कार विकत घेण्याकडे कल आपल्याला दिसून येतो.

तुम्हाला देखील अशाच पद्धतीने परवडणाऱ्या किमतीमध्ये सनरुफ कार खरेदी करायची असेल तर या लेखामध्ये आपण अशाच काही दहा लाख रुपयापेक्षा कमी किमतीत मिळतील अशा कारची माहिती घेणार आहोत. ज्या तुम्हाला तुमच्या आर्थिक बजेटमध्ये देखील विकत घेता येतील व सनरुफ सारखे अनेक वैशिष्ट्ये देखील मिळतील.

 या आहेत सनरूफ असलेल्या कार

1- ह्युंदाई एक्स्टर ही कार ८२ बीएचपी आणि 1.2 लिटर पेट्रोल इंजिनचा उपलब्ध असून तिची किंमत सहा लाख 12 हजार रुपयांपासून सुरू होते. या कारमध्ये ग्राहकांना सीएनजी पर्याय देखील मिळतो. तुम्हाला जर ह्युंदाई एक्स्टरचे सनरूफ असलेले मॉडेल घ्यायचे असेल तर त्याची किंमत आठ लाख 23 हजार रुपयांपर्यंत आहे. तसे पाहायला गेले तर टाटा पंचच्या या गाडीचे फीचर्स सारखे आहेत परंतु ही टाटा पंच पेक्षा 11 हजार रुपयांनी स्वस्त आहे.

2- ह्युंदाई i20 sprtz o- ह्युंदाई कंपनीच्या प्रसिद्ध आणि बहुचर्चित पर्यायांपैकी हे व्हेरियंट एक असून या व्हेरियंटमध्ये सनरूफ पर्याय मिळतो. या कारची किंमत आठ लाख 72 हजार रुपयांपासून सुरू होते. या कारमध्ये 82 बीएचपी 1.2 लिटर पेट्रोल इंजन किंवा 87 बीएचपी युनिट पर्याय उपलब्ध आहेत.

3- टाटा अल्ट्रोझ ही भारतातील सनरूफ असलेली सर्वात परवडणारी हॅचबॅक आहे. टाटा मोटरची हे कार असून टाटाच्या आतापर्यंतच्या  कार पैकी सगळ्यात चांगली दिसणारी हॅचबॅक पैकी एक आहे. या कारची किंमत सहा लाख 64 हजार रुपयांपासून सुरू होते. या कारमध्ये 87 बीएचपी 1.2 लिटर पेट्रोल इंजिन किंवा 89 बीएचपी 1.5 लिटर डिझेल इंजन हे पर्याय उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे या गाडीमध्ये सीएनजी पर्याय देखील उपलब्ध आहे.

4- महिंद्रा XUV 3XO- नुकतीच लॉन्च झालेली महिंद्राची महिंद्रा XUV 3XO ही कार XUV300 ची सुधारित एडिशन असून या कारची किंमत सात लाख 49 हजार पासून सुरु होते व यामधील सनरूफ असलेले व्हेरियंटची किंमत 8.99 लाख रुपयांपासून सुरू होते.

5- टाटा पंच टाटा पंच ही टाटा मोटरची सर्वाधिक घेतली जाणारी गाडी असून या एसयूव्हीची किंमत 6.12 लाख आहे व त्यामध्ये असलेल्या सनरूफ व्हेरियंटची किंमत 8.34 लाख रुपये आहे. टाटा पंच ही पेट्रोल तसेच सीएनजी आणि इलेक्ट्रिक पर्यायामध्ये उपलब्ध आहे.

Ajay Patil