ऑटोमोबाईल

Electric Scooter: ‘या’ आहेत देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर; एका चार्जवर देतील 100 किमीच्या पुढे रेंज

Published by
Ajay Patil

Electric Scooter:- सध्या मोठ्या प्रमाणावर भारतात इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढताना दिसून येत असून यामध्ये इलेक्ट्रिक स्कूटर, इलेक्ट्रिक कार तसेच इलेक्ट्रिक बाइक इत्यादींचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीच्या पार्श्वभूमीवर आणि पर्यावरण रक्षणाच्या दृष्टिकोनातून इलेक्ट्रिक वाहनांचा वापर हा महत्त्वाचा ठरेल व त्याकरता केंद्र शासनाच्या माध्यमातून देखील अनुदान स्वरूपात इलेक्ट्रिक वाहन निर्मिती उद्योगांना आर्थिक मदत करण्यात येत आहे.

इलेक्ट्रिक वाहनांचे अनेक मॉडेल भारतात लॉन्च होत असून यामध्ये मोठ्या प्रमाणावर सध्या इलेक्ट्रिक स्कूटरचा वापर होताना आपल्याला दिसत आहे. कुठल्याही वाहन घेताना प्रत्येकजण कमी किमतीत चांगली वैशिष्ट्य देतील अशा वाहनाच्या शोधात असतो व हाच ट्रेंड इलेक्ट्रिक वाहनांच्या बद्दल देखील आपल्याला दिसून येतो. त्यामुळे तुम्हाला देखील इलेक्ट्रिक स्कूटर घ्यायचे असेल तर आपण या लेखात अशा काही महत्त्वाच्या स्कूटर्स पाहणार आहोत ज्या कमी किमतीत देखील मिळतात व चांगली रेंज देखील देतात.

या आहेत सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर

1- ओला S1- ओला या कंपनीची ही इलेक्ट्रिक स्कूटर पहिली हाय स्पीड इलेक्ट्रिक स्कूटर असून या स्कूटरमध्ये 2kWh बॅटरी पॅक देण्यात आलेला आहे व ही स्कूटर फुल चार्ज केल्यानंतर 95 किलोमीटर पर्यंत रेंज देण्यास सक्षम आहे. या स्कूटरमध्ये 4.3 इंच डिस्प्ले देण्यात आला असून तिचा टॉप स्पीड ८५kmph आहे व या स्कूटर ची किंमत 69 हजार 999 रुपये आहे.

2- टीव्हीएस iQube- टीव्हीएसच्या या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये 3kwh बॅटरी पॅक दिला असून ही हाय स्पीड स्कूटर 4.2 सेकंदात शून्य ते 40 किमी चा वेग वाढवते. या स्कूटरचा टॉप स्पीड 78 किलोमीटर प्रतितास इतका असून एकदा चार्ज केल्यावर शंभर किलोमीटरची रेंज देते.

या स्कूटरमध्ये अलॉय व्हील, ब्रेक आणि ड्युअल कलर पर्याय देण्यात आला असून या स्कूटरमध्ये पाच इंचाचा डिस्प्ले आणि ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी देखील देण्यात आली आहे व या स्कूटरची किंमत एक लाख वीस हजार रुपये एक्स शोरूम इतकी आहे.

3- बजाज चेतक 2901- बजाजची चेतक इलेक्ट्रिक स्कूटर एक उत्तम इलेक्ट्रिक स्कूटर असून पूर्ण चार्ज झाल्यावर ही स्कूटर 123 किलोमीटर चालते. या स्कूटरमध्ये डिजिटल कन्सोल देण्यात आला असून उत्तम अशी डिझाईन देण्यात आलेली आहे. तसेच या स्कूटरमध्ये एलईडी लाईट्स आणि डिझायनर टेल लाईट देखील देण्यात आलेले आहेत.

बजाजच्या या इलेक्ट्रिक स्कूटर मध्ये इको आणि स्पोर्ट्स असे दोन रायडिंग मोड असतील. ही स्कूटर एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर साधारणपणे 120 किलोमीटर चालते. या स्कूटरची किंमत 95 हजार 998( एक्स शोरूम ) इतकी आहे. या स्कूटरमध्ये 2.9 kwh बॅटरी पॅक देण्यात आलेला आहे व पूर्णपणे चार्ज होण्यासाठी 6 तासाचा कालावधी लागतो.

Ajay Patil