ट्रॅक्टर हे यंत्र कृषी क्षेत्रासाठी खूप महत्त्वाचे असे यंत्र असून ट्रॅक्टरच्या मदतीशिवाय आता शेतीची कामे जवळपास अशक्यच आहेत अशी परिस्थिती आहे. शेतीची पूर्व मशागती पासून तर काढणीपर्यंत महत्वाची असे अनेक कामे ट्रॅक्टर व ट्रॅक्टरचलीत यंत्रांच्या माध्यमातून पूर्ण केले जातात.
ट्रॅक्टरच्या वापरामुळे आता शेतातील अनेक कामे करणे सहज आणि सोपे झाले असून कमी खर्च व कमी वेळेत अवघड कामे करता येणे शक्य झाले आहे. त्यामुळे शेतीसाठी ट्रॅक्टरचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. त्यातल्या त्यात फळबागायतदार शेतकऱ्यांसाठी देखील ट्रॅक्टर अनेक दृष्टिकोनातून फायद्याचे ठरते. फक्त फरक एवढा आहे की फळबागेमधील अंतर मशागत किंवा इतर कामांकरिता मिनी ट्रॅक्टर महत्त्वाचे ठरतात.
त्यामुळे बरेच शेतकरी आता मोठ्या ट्रॅक्टर ऐवजी मिनी ट्रॅक्टरच्या खरेदीकडे वळल्याचे चित्र आहे. सध्या बाजारामध्ये अनेक कंपन्यांचे ट्रॅक्टर उपलब्ध असून त्यामध्ये शेतकरी कमीत कमी किमतीत व चांगली वैशिष्ट्ये, दमदार परफॉर्मन्स असलेले ट्रॅक्टर खरेदी करण्याचा विचार करत असतात. त्यामुळे या लेखात आपण अशा काही ट्रॅक्टरची माहिती घेणार आहोत जे फळबागायतदार शेतकऱ्यांसाठी खूप फायद्याचे ठरतील.
अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर
खरेदी करा हे ट्रॅक्टर1- पावरट्रेक 425 N- शेतकरी बंधूंनी जर पावरट्रॅक 425 एन हा ट्रॅक्टर खरेदी केला तर यामुळे खूप मोठा फायदा होऊ शकतो. या ट्रॅक्टरच्या मदतीने तुम्ही शेतीची कामे तर करू शकतात. परंतु इतर व्यवसायिक कामे करून देखील अधिक उत्पन्न मिळवू शकतात. या ट्रॅक्टरला मल्टी टास्कर ट्रॅक्टर असे देखील म्हटले जाते.
जर एखाद्या फळ बागायतदार शेतकऱ्याला किंवा शेतकऱ्यांना आधुनिक पद्धतीचे ट्रॅक्टर घ्यायचे असेल तर हे ट्रॅक्टर चांगला पर्याय आहे. या ट्रॅक्टरची किंमत साधारणपणे तीन लाख तीस हजार रुपये इतकी आहे. ट्रॅक्टरमध्ये 25 एचपीचे इंजिन देण्यात आले आहे.
2- मॅसी फर्ग्युसन 1030 डी महाशक्ती– हे ट्रॅक्टर फळ बागायतदार म्हणजेच फळबाग शेती करणारे शेतकऱ्यांसाठी खूप फायद्याचे ट्रॅक्टर आहे. जर तुम्हाला देखील फळबागेतल्या कामासाठी ट्रॅक्टर घ्यायची इच्छा असेल तर तुम्ही हे ट्रॅक्टर खरेदी करू शकतात.
त्या ट्रॅक्टरचा वापर तुम्ही आंब्याची बाग, द्राक्ष तसेच संत्रे आणि इतर फळबाग पिकांमध्ये करू शकतात. याशिवाय सोयाबीन, मका, कापूस आणि ऊस पिकासाठी देखील ते फायद्याचे आहे. या ट्रॅक्टरची किंमत चार लाख 50 हजार ते चार लाख 80 हजार रुपये पर्यंत आहे.
3- आयशर 242- हे ट्रॅक्टर देखील शेतकऱ्यांसाठी खूप फायद्याचे ट्रॅक्टर असून कमीत कमी बजेटमध्ये जर तुम्हाला उत्तम ट्रॅक्टर घ्यायचे असेल तर हे ट्रॅक्टर चांगला पर्याय आहे. यामध्ये तुम्हाला अनेक प्रकारच्या सुविधा मिळतात व या ट्रॅक्टरची किंमत तीन लाख 45 हजार ते चार लाख पर्यंत आहे.
अशाप्रकारे तुम्ही कमी किमतीमध्ये चांगली वैशिष्ट्य असलेले हे तीन ट्रॅक्टर पैकी निवड करू शकतात.