ऑटोमोबाईल

फळबागांमधील कामासाठी पावरफुल आहे ‘हे’ 3 ते 3.50 लाख रुपये बजेटमधील मिनी ट्रॅक्टर! कमी खर्चात होतील शेतीकामे

Published by
Ajay Patil

Eicher 188 Mini Tractor:- फळबागांमधील अंतर मशागतीसाठी किंवा इतर अनेक कामांसाठी मोठ्या ट्रॅक्टरऐवजी मिनी ट्रॅक्टर फायद्याचे ठरतात व त्यामुळे आता शेतकरी त्यांच्या गरजेनुसार बजेटनुसार मिनी ट्रॅक्टर खरेदी करण्याला प्राधान्य देतो. भारतामध्ये अनेक प्रसिद्ध अशा कंपन्यांच्या माध्यमातून उत्तम असे मिनी ट्रॅक्टर सादर केले आहेत

व यामध्ये आयशर ट्रॅक्टर या कंपनीचे देखील प्रसिद्ध असे अनेक ट्रॅक्टर असून शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय आहेत. आयशर कंपनीने आतापर्यंत अनेक उच्च दर्जाचे ट्रॅक्टर उपलब्ध करून दिले असून या कंपनीचे ट्रॅक्टर त्यांचा परफॉर्मन्स तसेच कमी इंधनाचा वापर इत्यादी करिता ओळखले जातात.

जर तुमच्याकडे कमी जमीन असेल किंवा फळबागांच्या कामासाठी तुम्हाला शक्तिशाली असे मिनी ट्रॅक्टर घ्यायचे असेल तर तुमच्यासाठी आयशर 188 हे ट्रॅक्टर उत्तम पर्याय ठरू शकते.

काय आहेत आयशर 188 ट्रॅक्टरची वैशिष्ट्ये?
या ट्रॅक्टरमध्ये कंपनीने शक्तिशाली आणि इंधन कार्यक्षम असे इंजिन दिले आहे व शेतकऱ्यांना ते शेती कामासाठी उत्तम असे मदत करू शकेल त्या पद्धतीने डिझाईन केले आहे. कंपनीने या ट्रॅक्टरमध्ये 828 सीसी क्षमतेचे सिंगल सिलेंडर इंजिन दिले आहे. जे 18 एचपी पावर जनरेट करते.

त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीची कामे सहजपणे आणि लवकरात लवकर पूर्ण करण्यास मदत होते. कंपनीने या मिनी ट्रॅक्टरमध्ये 28 लिटर क्षमतेची इंधन टाकी दिली आहे व त्यामुळे एकाच वेळी लांब अंतर कापण्यासाठी याचा खूप मोठा फायदा होतो.

तसेच आयशर 188 ट्रॅक्टरची हायड्रोलिक क्षमता सातशे किलोग्रॅम आहे व ज्यामुळे शेतकऱ्यांना एकाच वेळी मोठ्या प्रमाणावर मालाची वाहतूक करता येणे सोपे होते.

या ट्रॅक्टरचे वजन 790 किलो आहे व त्याची रचना खूपच मजबूत असून त्याचा व्हिलबेस चौदाशे वीस मीमी आहे व त्याची लांबी २५७० मीमी व रुंदी 1565 मीमी आहे.

तसेच या ट्रॅक्टरची उंची 1275 मीमी आहे. हा ट्रॅक्टर लहान शेतकऱ्यांच्या शेतात आणि बागायतीसाठी योग्य असून याचा फॉरवर्ड स्पीड 22.29 किमी प्रति तास ठेवण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना जास्तीत जास्त वेगात काम करणे शक्य होते.

आयशर 188 ट्रॅक्टरची इतर वैशिष्ट्ये
या ट्रॅक्टरमध्ये अनेक प्रगत वैशिष्ट्ये देण्यात आले आहेत व त्यामुळे ते इतर ट्रॅक्टरपेक्षा वेगळे ठरते. यात आठ फॉरवर्ड आणि दोन रिवर्स गिअर्स असलेला गिअरबॉक्स देण्यात आला आहे. ज्या शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या कामांसाठी योग्य गती मिळवण्यासाठी मदत करतात.

हे ट्रॅक्टर सिंगल क्लच सिस्टमसह येतो आणि त्यात साईड शिफ्ट आंशिक स्थिर जाळी प्रकार ट्रान्समिशन देण्यात आले आहे. तसेच या ट्रॅक्टरमध्ये ड्युअल स्पीड पीटीओ प्रकारची पावर टेकऑफ प्रदान केली आहे

जी 540 आरपीएम जनरेट करते व त्यामुळे शेतीची अवजारे चालवण्यासाठी हे ट्रॅक्टर उत्तम पर्याय आहे. या ट्रॅक्टरमध्ये पावर स्टेरिंग देण्यात आली असून जी शेतकऱ्यांना नियंत्रित आणि आरामदायी ड्रायव्हिंगचा अनुभव देते.

किती आहे आयशर 188 ट्रॅक्टरची किंमत आणि वारंटी?
भारतीय व्यावसायिक वाहनांच्या बाजारपेठेत आयशर १८८ ट्रॅक्टरची एक्स शोरूम किंमत तीन लाख 8 हजार ते तीन लाख 23 हजार रुपये ठेवण्यात आली आहे.

तसेच या मिनी ट्रॅक्टर वर शंभर तास किंवा एक वर्षाची वारंटी देखील देण्यात येते. त्यामुळे हे ट्रॅक्टर शेतकऱ्यांना जास्त कालावधी करिता वापराची हमी देते.

Ajay Patil