टाटा आणि होंडाच्या कारला टक्कर देण्यासाठी भारतीय बाजारात ‘ही’ नवीन कार लाँच झाली, किंमत आणि स्पेसिफिकेशन पहा…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

New Car Launch : नवीन कार खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाचे आणि मोठे अपडेट समोर आली आहे. खरे तर या नवीन वर्षात अनेकांना नवीन कार खरेदी करायची आहे. जर तुम्हाला ही नवीन कार खरेदी करायची असेल

तर तुमच्यासाठी भारतीय बाजारात एक नवीन कार लॉन्च करण्यात आली आहे. मॉरिस गॅरेज अर्थातच एमजी ने भारतीय बाजारात एक्स्टरचे 2024 मॉडेल लाँच केले आहे. यामुळे जर तुम्हाला एमजी ची कार खरेदी करायची असेल तर तुमच्यासाठी हा ऑप्शन फायदेशीर ठरू शकतो.

मिळालेल्या माहितीनुसार कंपनीने लॉन्च केलेली ही गाडी आधीच्या मॉडेल पेक्षा अधिक दमदार आणि जबरदस्त फीचर्स सह बाजारात उतरली आहे. या गाडीमुळे टाटा आणि होंडाच्या कारला टफ कॉम्पिटिशन मिळणार आहे. नव्याने लॉन्च झालेली एक्स्टर ही कार कीया सेल्टोस,

ग्रँड विटारा, टाटा नेक्सन, होंडा एलिव्हेट या गाड्यांसोबत स्पर्धा करणार आहे. दरम्यान आज आपण नव्याने लॉन्च झालेल्या या गाडीची सविस्तर माहिती पाहणार आहोत. या गाडीचे संपूर्ण स्पेसिफिकेशन आणि किंमत आज आपण अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

कारच्या विशेषता आणि किंमत

ही कार पाच व्हेरिएंट मध्ये बाजारात उपलब्ध होणार आहे. या नव्याने लॉन्च करण्यात आलेली कार स्मार्ट 2.0 आणि 80+ कनेक्ट केलेल्या वैशिष्ट्यांसह सुसज्ज राहणार आहे. नवीन Astor मध्ये पुढील सीटसाठी वेंटिलेशन, वायरलेस चार्जर, वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि Apple CarPlay, ऑटो-डिमिंग ORVM आणि प्रगत यूजर इंटरफेससह अपडेट केलेले i-Smart 2.0 यांसारखे फीचर्स उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत.

यामुळे ही गाडी लवकरच ग्राहकांमध्ये लोकप्रिय होणार अशी आशा कंपनीला आहे. मिळालेल्या माहितीनुसार या गाडीमध्ये JIO व्हॉईस रेकग्निशन सिस्टीम आहे, जी हवामान, क्रिकेट अपडेट, कॅल्क्युलेटर, घड्याळ, तारीख, दिवसाची माहिती, कुंडली, शब्दकोश,

बातम्या आणि ज्ञान यासाठी प्रगत व्हॉइस कमांड उपलब्ध करून देण्यात आले आहे. या कारमध्ये अँटी-थेफ्ट फिचर्स आहे. हे नेटवर्क कनेक्शनशिवाय देखील कार्य करण्यास सक्षम राहणार आहे. यामुळे ही कार चोरीला जाण्याची भीती बऱ्यापैकी कमी होईल अशी आशा आहे.

ही कार आपल्या जुन्या मॉडेल पेक्षा अधिक सुरक्षित राहणार असे मत आता जाणकारांनी व्यक्त केले आहे. या गाडीला सनरुफ देखील देण्यात आला आहे. ॲडव्हान्स ड्रायव्हर असिस्टंट सारखे फीचर्स या कारमध्ये उपलब्ध आहेत. या नव्याने लॉन्च करण्यात आलेल्या कारला 1.5-लीटर, नैसर्गिकरित्या एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन (110ps/144Nm) आणि दुसरे 1.3-लिटर, टर्बो-पेट्रोल इंजिन (140ps/220Nm) उपलब्ध करून देण्यात आले आहे.

ट्रान्समिशनसाठी 6-स्पीड मॅन्युअल, 6-स्पीड ऑटोमॅटिक आणि CVT गिअरबॉक्सचा पर्याय देण्यात आला आहे. म्हणजेच ग्राहकांना आपल्या आवडीनुसार कार खरेदी करता येणार आहे. या गाडीच्या किमती बाबत बोलायचं झालं तर या गाडीच्या सुरुवातीच्या मॉडेलची एक्स शोरूम किंमत 9.98 लाख रुपये एवढी आहे. ऑन रोड प्राईस मात्र यापेक्षा अधिक राहील याची नोंद घ्यायची आहे.