ऑटोमोबाईल

शेती कामासाठी उत्तम आहे ‘हे’ पावरफुल इलेक्ट्रिक ट्रॅक्टर! मिळते स्वस्तात आणि आहे पाच वर्षाची वारंटी

Published by
Ajay Patil

Sonalika Tiger Electric Tractor:- सध्या भारतामध्ये इलेक्ट्रिक वाहनांची मागणी सातत्याने वाढताना दिसून येत असून पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून इलेक्ट्रिक वाहनांचा वापर हा खूप फायद्याचा ठरणार आहे. तसेच पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीच्या पार्श्वभूमीवर इलेक्ट्रिक वाहनांचा वापर हा नक्कीच फायद्याचा ठरेल.

इलेक्ट्रिक स्कूटर तसेच इलेक्ट्रिक बाइक व कार याप्रमाणे आता इलेक्ट्रिक ट्रॅक्टर देखील भारतीय वाहन बाजारपेठेमध्ये लॉन्च करण्यात आले असून तुम्हाला देखील शेती कामासाठी पावरफुल असे इलेक्ट्रिक ट्रॅक्टर घ्यायचा असेल

तर तुमच्याकरिता सोनालिका टायगर इलेक्ट्रिक ट्रॅक्टर फायद्याचे ठरेल.हे इलेक्ट्रिक ट्रॅक्टर 15 अश्‍वशक्ती निर्माण करणाऱ्या शक्तिशाली मोटरसह येतो. याच इलेक्ट्रिक ट्रॅक्टरची माहिती या लेखात बघू.

सोनालीका टायगर इलेक्ट्रिक ट्रॅक्टरची वैशिष्ट्ये
सोनालिका इलेक्ट्रिक ट्रॅक्टरमध्ये तुम्हाला 25.5 किलोवॅट क्षमतेची पावरफूल अशी इको फ्रेंडली ई ट्रॅक मोटर पाहायला मिळते व ही मोटर 15 अश्वशक्ति निर्माण करते व यामुळे डिझेल इंजिन ट्रॅक्टरच्या तुलनेत 75 टक्के ऑपरेटिंग खर्च वाचतो. या ट्रॅक्टरचा पीटीओ 9.46 इतका आहे व ज्यामुळे जवळपास सर्व ट्रॅक्टरचलित कृषी उपकरणे चालवण्यासाठी हे ट्रॅक्टर सक्षम आहे.

एका चार्जवर बऱ्याच काळापर्यंत शेतीची कामे करण्यासाठी सोनालिका कंपनीने हा इलेक्ट्रिक ट्रॅक्टर तयार केला असून या ट्रॅक्टरचा फॉरवर्ड स्पीड 24.93 किलोमीटर प्रतितास इतका ठेवण्यात आला आहे.

या ट्रॅक्टरची हायड्रोलिक क्षमता 500 किलो इतकी ठेवण्यात आली असून एकावेळी अधिक पिकांची वाहतूक करण्यास हा ट्रॅक्टर सक्षम आहे. या ट्रॅक्टरचे एकूण वजन 820 किलो असून ते 1420 मीमी व्हिलबेस मध्ये तयार केले आहे.

सोनालिका टायगर इलेक्ट्रिक ट्रॅक्टरची इतर वैशिष्ट्ये?
या इलेक्ट्रिक ट्रॅक्टरमध्ये कंपनीने मेकॅनिकल स्टेरिंग दिली असून त्यामुळे शेतातच नाही तर खडबडीत रस्त्यावर देखील चालवण्यासाठी उपयुक्त ठरते.

सोनालिका कंपनीचा हा ट्रॅक्टर 6 फॉरवर्ड + दोन रिव्हर्स गिअरसह गिअरबॉक्ससह येतो. हा सोनालिकाचा इलेक्ट्रिक ट्रॅक्टर दहा तास( सामान्य चार्जिंग) आणि चार तास( फास्ट चार्जिंग) ने चार्ज केला जाऊ शकतो.

कंपनीने या ट्रॅक्टरमध्ये ऑइल इमरस्ड ब्रेक्स दिले आहेत जे निसरड्या पृष्ठभागावर टायर्सवर मजबूत पकड ठेवण्यास सक्षम आहे. हा ट्रॅक्टर चार व्हील ड्राईव्हमध्ये येतो.

किती आहे सोनालीका टायगर इलेक्ट्रिक ट्रॅक्टरची किंमत आणि वारंटी?
भारतीय व्यावसायिक बाजारपेठेमध्ये सोनालीका टायगर इलेक्ट्रिक ट्रॅक्टरची एक्स शोरूम किंमत सहा लाख 14 हजार ते सहा लाख 53 हजार रुपये ठेवण्यात आली आहे.

कंपनीने या इलेक्ट्रिक ट्रॅक्टरला पाच वर्षापर्यंतची वारंटी दिली असून आरटीओ नोंदणी आणि रोड टॅक्स यामुळे या इलेक्ट्रिक ट्रॅक्टरची ऑन रोड किंमत काही राज्यांमध्ये बदलू शकते.

Ajay Patil