Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

Top 3 Cheapest Electric Cars: ‘ह्या’ आहे सर्वात स्वस्त टॉप 3 इलेक्ट्रिक कार ! देतात 250 किमीपर्यंत ड्रायव्हिंग रेंज ; किंमत फक्त 4.5 लाख रुपये

Top 3 Cheapest Electric Cars: भारतीय बाजारपेठेमध्ये मागच्या काही दिवसांपासून इलेक्ट्रिक कार खरेदीचा क्रेझ झपाट्याने वाढत आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

यामुळे आता या सेगमेंटमध्ये अनेक ऑटो कंपन्यांना ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ग्राहकांना परडवणाऱ्या किमतीमध्ये भन्नाट रेंजसह इलेक्ट्रिक कार्स सादर करत आहे. यातच तुम्ही देखील तुमच्यासाठी जास्त रेंजसह येणारी इलेक्ट्रिक कार खरेदीचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला या लेखात सर्वात स्वस्त टॉप 3 इलेक्ट्रिक कारबद्दल माहिती देणार आहोत.

तुम्हाला या इलेक्ट्रिक कार एका चार्जमध्ये 250 किमीपर्यंत ड्रायव्हिंग रेंज देतात. चला मग जाणून घेऊया मग सर्वात स्वस्त टॉप 3 इलेक्ट्रिक कारबद्दल संपूर्ण माहिती.

Top 3 Cheapest Electric Cars:

Strom R3

Storm R3 ही दोन सीटर इलेक्ट्रिक कार आहे जी अजून बाजारात आलेली नाही. रिपोर्ट्सनुसार कंपनी ही इलेक्ट्रिक कार लवकरच बाजारात आणणार असून त्याची सुरुवातीची किंमत 4.5 लाख रुपये आहे. कंपनीने लॉन्च होण्यापूर्वी या कारचे प्री-बुकिंग सुरू केले आहे.

Strom R3 इलेक्ट्रिक कारमध्ये, कंपनी 15 kWh क्षमतेची इलेक्ट्रिक मोटर असणार आहे ज्याला पूर्ण चार्ज केल्यावर 200 किलोमीटरची ड्रायव्हिंग रेंज असल्याचा कंपनीचा दावा आहे. ही इलेक्ट्रिक कार कीलेस एंट्री, पॉवर विंडो, डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, व्हॉईस जेश्चर कमांडसह 7-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम,क्लाइमेट कंट्रोल आणि GPS नेव्हिगेशन यांसारखी फीचर्स देईल.

PMV EaSE

या यादीतील दुसरी सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार PMV ESS-E आहे जी कंपनीने लॉन्च केली आहे आणि कंपनीच्या मते या कारला आतापर्यंत जागतिक स्तरावर 6 हजार बुकिंग मिळाले आहेत.

या कारची सुरुवातीची किंमत 4.79 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. या इलेक्ट्रिक कारमध्ये लहान आकाराचा 48 W चा लिथियम आयन बॅटरी पॅक बसवण्यात आला आहे.

कंपनीचा दावा आहे की एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर ही कार वेगवेगळ्या ड्रायव्हिंग मोडवर 120, 160 आणि 200 किमीची रेंज मिळवते. या रेंजसह, कंपनी 70 किमी प्रतितास या टॉप स्पीडचा दावा करते.

PMV EaS-E मध्ये आढळलेल्या फीचर्सबद्दल सांगायचे तर, यात ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसह इन्फोटेनमेंट सिस्टम, LCD डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, कीलेस एंट्री, स्टीयरिंग माउंटेड कंट्रोल्स, रिमोट डोअर लॉक-अनलॉक, पॉवर विंडो आणि AC सारखी फीचर्स आहेत.

MG Comet EV

MG Comet EV ही या यादीतील तिसरी सर्वात कमी-किंमत असलेली इलेक्ट्रिक कार आहे जी MG Motor ने Rs 7.98 लाख (एक्स-शोरूम) च्या सुरुवातीच्या किंमतीसह बाजारात लॉन्च केली आहे.

कंपनीने MG Comet EV मध्ये 17.3kWh क्षमतेचा बॅटरी पॅक बसवला आहे. कंपनीचा दावा आहे की एकदा पूर्ण चार्ज केल्यावर ही कार 250 किमीची रेंज देते.

ट्विन डिस्प्ले, स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी, 100 हून अधिक व्हॉईस कमांड, स्पीकर, ऑटो ट्रान्समिशन, ड्युअल टोन इंटिरियर, फ्रंट सीटवर ड्युअल एअरबॅग्ज, ईबीडीसह अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम, रिव्हर्स पार्किंग कॅमेरा, थ्री पॉइंट सीट बेल्ट यांसारखी फीचर्स कॉमेट ईव्हीमध्ये देण्यात आली आहेत.

हे पण वाचा :- धमाकेदार ऑफर! 80 हजारांचा iPhone 14 मिळत आहे अवघ्या 38 हजारात ; असा घ्या फायदा