ऑटोमोबाईल

Top 5 Cheapest Electric Cars : किंमत 7.98 लाख रुपये आणि 320Km रेंजसह ‘या’ आहेत सर्वात जास्त विकल्या जाणाऱ्या स्वस्त इलेक्ट्रिक कार, पहा यादी

Published by
Ahmednagarlive24 Office

Top 5 Cheapest Electric Cars : देशात पेट्रोल आणि डिझेल महाग झाल्यापासून इलेक्ट्रिक कार वापरणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. तसेच सर्व कंपन्याही आपल्या इलेक्ट्रिक कार लाँच करू लागल्या आहेत. असे असताना ग्राहकांना मागणी जास्त असल्याने कार खरेदीसाठी जास्त पैसे मोजावे लागत आहेत.

जर तुम्हीही स्वस्त इलेक्ट्रिक कार शोधत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण तुम्ही आता किंमत 7.98 लाख रुपये आणि 320Km रेंजसह कार खरेदी करू शकता. सर्वात जास्त विक्री करणाऱ्या कारमध्ये तुम्हाला अनेक फीचर्स पाहायला मिळू शकतील.

Tata Nexon EV प्राइम:

Tata Nexon EV देशांतर्गत बाजारात दोन वेगवेगळ्या बॅटरी पॅकसह येत असून ही कंपनीची एक प्राइम कार आहे. या कारच्या किमतीचा विचार केला तर या कारची किंमत 14.49 लाख रुपयांपासून सुरू होऊन ती 17.19 लाख रुपयांपर्यंत जाते. यात 30.2kWh क्षमतेचा बॅटरी पॅक दिला आहे.

ही कार एका चार्जमध्ये 315 किलोमीटरपर्यंत ड्रायव्हिंग रेंज देईल असा दावा कंपनीने केला आहे. तर दुसरा प्रकार मॅक्स असून ज्याची किंमत 16.49 लाख ते 19.54 लाख रुपये इतकी आहे. तसेच यात 40.5 kWh क्षमतेचा बॅटरी पॅक देण्यात आला आहे, जो 453 किमीच्या ड्रायव्हिंग रेंजसह येतो.

इतकेच नाही तर यात सिटी, इको आणि स्पोर्ट असे तीन ड्रायव्हिंग मोड दिले आहेत. Nexon EV Max Dark मध्ये सनरूफसह समान अर्ध-डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, AQI डिस्प्लेसह एअर प्युरिफायर, क्रूझ कंट्रोल, वायरलेस स्मार्टफोन चार्जर, कूल्ड ग्लोव्ह बॉक्स, मागील एअर कंडिशनिंग व्हेंट्स, 7-इंचाचा मल्टी इन्फॉर्मेशन डिस्प्ले (MID) अशी फीचर्स दिली आहे.

तर दुसरीकडे, सुरक्षेच्या दृष्टीने यात दोन एअरबॅग, चारही चाकांवर डिस्क ब्रेक, अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम (ABS) असणार आहे.जरी या इलेक्ट्रिक आवृत्तीची क्रॅश चाचणी केली नसली तरी ग्लोबल NCAP क्रॅश चाचणीमध्ये त्याच्या ICE इंजिन मॉडेलला 5-स्टार रेटिंग दिले आहे.

टाटा टिगोर ईव्ही

टाटा मोटर्सकडून नुकतेच त्यांच्या प्रसिद्ध इलेक्ट्रिक सेडान कार टाटा टिगोर ईव्हीची नवीन अपडेटेड आवृत्ती लॉन्च करण्यात आली आहे. कंपनीने नवीन इलेक्ट्रिक सेडानमध्ये काही खास बदल केले आहे. कंपनीने या कारची ड्रायव्हिंग रेंजही वाढवली आहे असा दावा करण्यात येत आहे. या कारची किंमत 12.49 लाख रुपयांपासून ते 13.75 लाख रुपयांपर्यंत आहे.

नवीन Tigor EV मध्ये, कंपनीने 26 kWh क्षमतेचा लिक्विड-कूल्ड बॅटरी पॅक वापरला असून जी IP67-रेट असलेली लिथियम-आयन बॅटरी आहे. इलेक्ट्रिक मोटर 55 kW ची पॉवर आणि 170 Nm टॉर्क जनरेट करत असून कार एका चार्जमध्ये 315 किलोमीटरपर्यंत ड्रायव्हिंग रेंज देते.

नवीन टिगोर इलेक्ट्रिकमध्ये फीचर्समध्ये, ​​कंपनीने लेदर सीट अपहोल्स्ट्री, लेदर-रॅप्ड स्टीयरिंग व्हील, रेन-सेन्सिंग वायपर्स, ऑटोमॅटिक हेडलॅम्प्स, क्रूझ कंट्रोल यांचा समावेश केला आहे. तसेच ही कार आणखी एका नवीन रंगात मॅग्नेटिक रेडसह सादर केली जाणार आहे.

अपडेटेड इलेक्ट्रिक कॉम्पॅक्ट सेडानला सर्व प्रकारांमध्ये मल्टी-मोड रीजन, कनेक्टेड कार तंत्रज्ञान (ZConnect), स्मार्टवॉच कनेक्टिव्हिटी, ITPMS (टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम) आणि टायर पंक्चर रिपेअर किट यासारखी स्मार्ट फीचर्स दिली आहेत.

सिट्रोएन eC3

Citroen ने नुकतीच आपली नवीन इलेक्ट्रिक हॅचबॅक कार Citroen eC3 भारतीय बाजारपेठेत लॉन्च केली असून जर किमतीचा विचार केला तर या कारची सुरुवातीची किंमत 11.50 लाख रुपये ठेवली आहे. यात कंपनीने 29.2kWh बॅटरी पॅक वापरला असून जो फ्रंट एक्सल-माउंट इलेक्ट्रिक मोटरला शक्ती देतो. तसेच त्याची इलेक्ट्रिक मोटर 57hp पॉवर आणि 143nm पीक टॉर्क जनरेट करते.

नवीन इलेक्ट्रिक कार EC3 फक्त 6.8 सेकंदात 0-60 किमी प्रतितास वेग घेते आणि तिचा टॉप स्पीड 107 किमी प्रतितास असल्याचा दावा कंपनीने केला आहे. या कारमध्ये रीजनरेटिव्ह ब्रेकिंग सिस्टीमसह, दोन ड्रायव्हिंग मोड दिले आहेत, ज्यात इको आणि स्टँडर्डचा समावेश आहे.

ही कार एका चार्जमध्ये 320 किलोमीटर (ARAI) च्या ड्रायव्हिंग रेंजसह येते. कंपनीकडून या कारसाठी दोन चार्जिंग पर्याय देण्यात आले आहेत. डीसी फास्ट चार्जरच्या मदतीने या कारची बॅटरी केवळ 57 मिनिटांत 10% ते 80% पर्यंत चार्ज होते तसेच यात 3.3kW ऑनबोर्ड AC चार्जर देखील आहे, जो CCS2 जलद चार्जिंगला देखील सपोर्ट करतो. तसेच या चार्जरसह, त्याची बॅटरी पूर्णपणे चार्ज होण्यासाठी सुमारे 10.5 तास लागतात.

Tata Tiago EV

Tata Tiago इलेक्ट्रिक एकूण दोन बॅटरी पॅक पर्यायांसह येत असून ज्यात 19.2kWh क्षमतेचा बॅटरी पॅक उपलब्ध आहे तसेच दुसरा पर्याय म्हणून 24kWh बॅटरी पॅक दिला आहे. जो अनुक्रमे 250 किमी आणि 315 किमी पर्यंत ड्रायव्हिंग रेंज देत आहेत. या कारच्या छोट्या रेंज मॉडेलची इलेक्ट्रिक मोटर 60bhp पॉवर आणि 105Nm टॉर्क जनरेट करते, तर उच्च श्रेणी 74bhp पॉवर आणि 114Nm टॉर्क जनरेट करते. कारची किंमत 8.69 लाख ते 12.04 लाख रुपये आहे.

जी कंपनीच्या Ziptron हाय-व्होल्टेज इलेक्ट्रिकल आर्किटेक्चरवर आधारित असून 50kW DC फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. 50kW DC फास्ट चार्जरशी कनेक्ट केल्यास, Tiago EV ची बॅटरी केवळ 57 मिनिटांत 10 ते 80 टक्के चार्ज होते. ही कार दोन ऑनबोर्ड चार्जिंग सुविधांसह सादर करण्यात आली आहे, तिच्या 19.2kWh बॅटरी आवृत्तीमध्ये थोडा कमी शक्तिशाली 3.3kW चार्जर दिला आहे. तसेच मोठ्या पॅकसह, 7.2 किलोवॅट क्षमतेच्या जलद चार्जिंगचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे, ज्यामुळे कारची बॅटरी अवघ्या 3.5 तासांमध्ये पूर्णपणे चार्ज होते.

MG Comet

मागील वर्षी म्हणजे एप्रिलमध्ये कंपनीने आपली सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार MG Comet भारतीय बाजारपेठेत सादर केली आहे. भारतीय बाजारपेठेत सादर होणारी ही कंपनीची दुसरी इलेक्ट्रिक कार असून ज्यापूर्वी MG eZS सादर केली होती. या कारमध्ये 17.3kWh बॅटरी पॅक असून त्याची इलेक्ट्रिक मोटर 41bhp पॉवर आणि 110Nm टॉर्क जनरेट करते.

कार एका चार्जमध्ये 230 किलोमीटरपर्यंत प्रवास करू शकते असा कंपनीने दावा केला आहे. त्याची बॅटरी 3.3kW चार्जरने चार्ज होण्यासाठी सुमारे 7 तास घेते, तर त्याची बॅटरी केवळ 5 तासांत 80% पर्यंत चार्ज होते. किमतीचा विचार केला तर कारची किंमत ७.९८ लाख ते ९.९८ लाख रुपये आहे.

तसेच कंपनीचा असा दावा आहे की या कारची चार्जिंग किंमत खूपच कमी असून संपूर्ण महिन्यासाठी ती चार्ज करण्यासाठी, केवळ 519 रुपये खर्च करावे लागणार आहेत. या कारमध्ये 55 पेक्षा जास्त कनेक्टेड कार फीचर्स, वायरलेस अँड्रॉइड आणि अॅपल कार प्ले, फ्लोटिंग ट्विन डिस्प्ले, 100 हून अधिक व्हॉईस कमांड आणि डिजिटल की यांसारखी जबरदस्त फीचर्स उपलब्ध आहेत.

त्याचे व्हॉइस कमांड सक्रिय करण्यासाठी, तुम्हाला फक्त ‘हॅलो एमजी’ म्हणायचे आहे.डिजिटल की चा फायदा असा आहे की तुम्हाला फिजिकल की ची गरज पडणार नाही, तुम्ही ती डिजिटल की ने ऑपरेट करू शकता. ही डिजिटल की तुम्हाला तुमच्या मित्रांसोबत शेअरही करता येईल.

Ahmednagarlive24 Office