ऑटोमोबाईल

Toyota Cars Prices Hike : एप्रिल महिन्यापसून महागणार टोयोटा कपंनीच्या गाड्या, वाचा कारण…

Published by
Ahmednagarlive24 Office

Toyota Cars Prices Hike : एप्रिल महिन्यापासून काही ऑटो कंपन्या आपल्या गाड्यांच्या किंमती वाढवण्याच्या तयारीत आहेत. यामध्ये Toyota कार्सचा देखील समावेश असणार आहे.

नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, कंपनी 1 एप्रिलपासून त्यांच्या निवडक मॉडेल्सच्या किमतीत वाढ करणार आहे. वाहनांच्या उत्पादनामध्ये सातत्याने वाढणारा इनपुट खर्च आणि वाढत्या परिचालन खर्चामुळे कपंनीने हा निर्णय घेतला आहे.

कंपनीच्या म्हणण्यानुसार किमतीत अंदाजे एक टक्का वाढ केली जाईल. कंपनीने यामागे वाढत्या इनपुट खर्च आणि ऑपरेटिंग खर्चाचे कारण सांगितले आहे. टोयोटा हॅचबॅक ग्लान्झा ते प्रीमियम एसयूव्ही फॉर्च्युनरपर्यंत विविध वाहनांची विक्री करते, ज्यांच्या किमती 6.86 लाख रुपये ते 51.44 लाख दरम्यान आहेत. त्याचवेळी, Kia India ने आपल्या संपूर्ण उत्पादन श्रेणीच्या किमतीत वाढ करण्याची घोषणा केली आहे. Kia नुसार, त्यांच्या कारच्या किमती तीन टक्क्यांपर्यंत वाढवल्या जातील.

दरम्यान, टोयोटा कंपनी एप्रिल महिन्यात एक शानदार कार लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. कंपनी 3 एप्रिल रोजी नवीन टोयोटा अर्बन क्रूझर टायझर भारतीय बाजारात लॉन्च करणार आहे. जर आपण टोयोटाच्या आगामी एसयूव्ही कार अर्बन क्रूझर टायझरमध्ये समाविष्ट असलेल्या वैशिष्ट्यांबद्दल बोललो तर आतापर्यंत सर्व SUV पेक्षा ही कार खास असणार आहे. या कारमध्ये अनेक अपडेट फीचर्स पाहायला मिळतील तसेच याची डिझाईन देखील आकर्षक असणार आहे.

Ahmednagarlive24 Office