7 Seater MPV Car:- सध्या प्रत्येकाला आपली स्वतःची कार असावी हे स्वप्न असते व हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रत्येकजण धडपड करत असते. तसेच बँकेच्या माध्यमातून देखील सहजतेने कारलोन उपलब्ध होत असल्यामुळे देखील आता कार घेणे ग्राहकांसाठी सोपे झालेले आहे.
त्यासोबतच देशातील अनेक वाहन निर्मिती करणाऱ्या कंपन्यांनी वेगवेगळ्या सेगमेंट मधील वेगवेगळे वैशिष्ट्य असलेली कार निर्मिती केल्याने ग्राहकांना देखील एसयूव्ही, एमयुव्ही सेगमेंटमध्ये अनेक कार सध्या बाजारपेठेत उपलब्ध आहेत. यामध्ये एसयूव्ही कॉम्पॅक्ट ला बाजारपेठेत जास्त मागणी असल्याचे दिसून येते.
परंतु तरी देखील सात सीटर असलेल्या फॅमिली कार देखील विक्रीच्या बाबतीत पुढे असल्याचे सध्या चित्र आहे. या अनुषंगाने आपण पाहिले तर जेव्हा आपण कार घ्यायला जातो तेव्हा बऱ्याचदा आपल्याला सहा सात महिन्याची वेटिंग दिली जाते.
म्हणजे अगोदर आपल्याला फक्त कारची बुकिंग करता येते व त्यानंतर दिलेल्या वेळेमध्ये आपल्याला कारचा ताबा मिळतो. परंतु जर तुम्हाला टोयोटाची Toyota Rumion MPV खरेदी करायची असेल तर मात्र सध्या कंपनीने या कारचे बुकिंग तात्पुरत्या स्वरूपामध्ये बंद केल्याचे चित्र आहे.
मीडिया रिपोर्टनुसार पाहिले तर कंपनीच्या माध्यमातून या कारसाठी तब्बल 32 आठवडे म्हणजे सात महिन्यांची वेटिंग कालावधी देण्यात आला आहे. कंपनीच्या माध्यमातून रूमियान ही कार S, G आणि V या तीन प्रकारांमध्ये विकली जात असून या कारच्या पेट्रोल प्रकारावर सर्वाधिक वेटिंग पिरेड देण्यात आलेला असून तो 28 ते 32 आठवड्यांचा आहे.
तसेच सीएनजी व्हेरिएंट जर तुम्हाला खरेदी करायचे असेल तर मात्र कंपनीने जास्त बुकिंगमुळे तात्पुरते नवीन बुकिंग घेणे थांबवले आहे. त्यामुळे तुम्हाला प्रश्न पडला असेल की नेमके या कारमध्ये असे काय आहे की, ग्राहकांची खरेदी करता इतकी गर्दी होत आहे. त्यामुळे आपण या कारची थोडक्यात माहिती घेऊ.
Toyota Rumion MPV कारची वैशिष्ट्ये
रुमियान या कारची महत्वाची वैशिष्ट्ये पाहिले तर ही मारुती ईरटिगाची रिबॅज केलेली एडिशन म्हणजेच आवृत्ती आहे. कंपनीने या कारमध्ये 1.5 लिटर नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजन दिले असून हे इंजिन 103 बीएचपी पावर आणि 137 एनएम टॉर्क जनरेट करते.
तसेच या इंजिनला सहा स्पीड आटोमॅटिक आणि सहा स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स पर्याय देण्यात आला असून टोयोटाच्या या रुमियानमध्ये सीएनजीचा पर्याय देखील देण्यात आलेला असून सीएनजी मध्ये ही कार 88 बीएचपी पावर आणि 121.5 एनएम टॉर्क जनरेट करते.
जर या कारचे मायलेज पाहिले तर पेट्रोल मॉडेल हे 20.51 किमी प्रति लिटर मायलेज देते. तर सीएनजी प्रकाराचे मॉडेल हे 26.11 किमी प्रति किलो इतके मायलेज देते.
किती आहे या कारची किंमत?
टोयोटा रुमियान एमपीव्ही ही नुकतीच 10 लाख 29 हजार( एक्स शोरूम) इतक्या सुरवातीच्या किमतीत लॉन्च करण्यात आली व या कारच्या टॉप मॉडेलची किंमत 13 लाख 68 हजार( एक्स शोरूम )पर्यंत जाते.