कार खरेदी करणार आहात ? मग पैसे तयार ठेवा ; Toyota लवकरच लाँच करणार ‘या’ 2 नवीन कार

Tejas B Shelar
Published:
Toyota Upcoming Car

Toyota Upcoming Car : तुम्हीही नजीकच्या काळात नवीन कार खरेदी करण्याच्या तयारीत आहात का? मग तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे एक लोकप्रिय ऑटो कंपनी आपल्या ग्राहकांसाठी लवकरच दोन नवीन दमदार कार लाँच करण्याच्या तयारीत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, टोयोटा कंपनी येत्या काही दिवसांनी भारतीय कार बाजारात दोन नवीन गाड्या लाँच करणार आहे.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की, सध्या स्थितीला टोयोटा कंपनीच्या इनोव्हा क्रिस्टा, इनोव्हा हायक्रॉस, अर्बन क्रूझर हॅराइडर आणि फॉर्च्युनर यासारख्या कार खूपच लोकप्रिय आहेत.

SUV सेगमेंट मध्ये टोयोटा कंपनीचा पोर्टफोलिओ चांगला आहे. दरम्यान आता टोयोटा येत्या काही दिवसांत भारतीय बाजारपेठेत 2 नवीन SUV लाँच करण्याच्या तयारीत असल्याची खात्रीलायक बातमी समोर आली आहे.

गेल्या काही वर्षांमध्ये भारतीय ग्राहकांमध्ये सातत्याने वाढणारी मागणी पाहता कंपनी आता 2 नवीन SUV कार भारतीय कार बाजारात विक्रीसाठी लाँच करणार आहे. यामुळे आता आपण टोयोटा कंपनीच्या आगामी काळात भारतीय कार बाजारात लॉन्च होणाऱ्या या दोन नवीन कारची माहिती पाहणार आहोत.

Toyota Fortuner MHEV : टोयोटा फॉर्च्युनर ही कंपनीची सर्वाधिक लोकप्रिय SUV आहे. या गाडीला भारतीय ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळतोय. ही कंपनीची एक लक्झरी एसयूव्ही आहे. या गाडीची लोकप्रियता पाहता आता टोयोटा कंपनी लवकरच याची सौम्य संकरित आवृत्ती बाजारात लाँच करणार आहे.

टोयोटा फॉर्च्युनरची सौम्य संकरित आवृत्ती आधीच अनेक जागतिक बाजारपेठेत विक्रीसाठी उपलब्ध आहे. मात्र भारतीय मार्केटमध्ये अजूनही ही लॉन्च झालेली नाही. पण लवकरच ही गाडी भारतीय मार्केटमध्येही लॉन्च होणार आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, आगामी टोयोटा फॉर्च्युनर माईल्ड हायब्रीडमध्ये 48-व्होल्ट MHEV प्रणाली प्रदान केली जाणार आहे. जी 2.8-लिटर 4-सिलेंडर डिझेल इंजिनसह उतरवली जाणार आहे.

सौम्य हायब्रीड प्रकार सादर केल्यामुळे, टोयोटा फॉर्च्युनरची इंधन कार्यक्षमता वाढणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, टोयोटा फॉर्च्युनर माईल्ड हायब्रिड पुढील वर्षी म्हणजेच 2025 मध्ये लॉन्च होणार अशी शक्यता आहे.

Toyota Electric : टोयोटा कंपनी आगामी काळात नवीन इलेक्ट्रिक कार लॉन्च करणार आहे. जर तुम्ही नवीन इलेक्ट्रिक कार घेण्याचा विचार करत असाल तर टोयोटाची आगामी एसयूव्ही तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, टोयोटाची आगामी इलेक्ट्रिक SUV बाजारात मारुती सुझुकी eVX शी स्पर्धा करणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe