ऑटोमोबाईल

लवकरच भारतीय बाजारपेठेत धुमाकूळ घालायला येणार टोयोटाची पहिली इलेक्ट्रिक कार! पूर्ण चार्जिंगवर देईल 550 किमीची रेंज

Published by
Ajay Patil

Toyota Urban Cruiser EV:- सध्या इलेक्ट्रिक वाहनांचे उत्पादन आणि वापर मोठ्या प्रमाणावर होत असून यामध्ये इलेक्ट्रिक स्कूटर ते इलेक्ट्रिक बाइक व वेगवेगळ्या कंपन्यांच्या माध्यमातून इलेक्ट्रिक कार लॉन्च करण्यात येत आहेत.पेट्रोल आणि डिझेल यांच्या वाढत्या किमतींच्या पार्श्वभूमीवर इलेक्ट्रिक वाहनांचा वापर हा फायद्याचा आहेच.

परंतु पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टिकोनातून देखील इलेक्ट्रिक वाहने हे फायद्याचे ठरणार असल्याने सरकारच्या माध्यमातून देखील इलेक्ट्रिक वाहनांच्या उत्पादनासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. त्यामुळे येणाऱ्या काही वर्षात भारतीय रस्त्यांवर इतर वाहनांपेक्षा इलेक्ट्रिक वाहने जास्त दिसतील यात शंका नाही.

या सगळ्या पार्श्वभूमीवर अनेक वाहन उत्पादक कंपन्यांकडून इलेक्ट्रिक वाहने मार्केटमध्ये आणली जात आहेत व आता इलेक्ट्रिक वाहन बाजारपेठेमध्ये टोयोटा या कार उत्पादक कंपनीने देखील पाऊल ठेवले असून टोयोटाची पहिली इलेक्ट्रिक कार अर्बन क्रुझर EV या नावाने लवकरच भारतीय बाजारात येणार आहे.

टोयोटाने 12 डिसेंबर रोजी जागतिक बाजारपेठेत इलेक्ट्रिक एसयूव्हीचे उत्पादन एडिशन रिव्हील केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार 2025 च्या तिसऱ्या तिमाहीत युनायटेड किंगडममध्ये ही इलेक्ट्रिक कार लाँच करण्यात येणार आहे व भारतामध्ये 2025 या वर्षाच्या अखेरीस ती लॉन्च होऊ शकते अशी शक्यता आहे.

एका पूर्ण चार्जवर मिळू शकते 550 किलोमीटरची रेंज
सध्या युरोपियन बाजारपेठेमध्ये टोयोटा अर्बन क्रुझर ईव्ही ही दोन बॅटरी पॅक पर्यायामध्ये सादर करण्यात आली आहे व यामध्ये 49kWh आणि 61kWh क्षमतेच्या बॅटरी पॅकचा समावेश करण्यात आला आहे. अजून पर्यंत कंपनीने कारची प्रमाणीत श्रेणी उघड केलेली नाही.

परंतु मिळालेल्या माहितीनुसार ही कार पूर्ण चार्ज झाल्यावर तिची श्रेणी 550 किमीपर्यंत असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच या इलेक्ट्रिक कारला दोन व्हील ड्राईव्ह आणि चार व्हील ड्राईव्हचा पर्याय देखील देण्यात आला आहे.

बाहेरून कशी असेल ही कार?
जर आपण या कारचे एकूण बाहेरील बॉडी स्ट्रक्चर बघितले तर साधारणपणे ई विटारा सारखे दिसून येते. यामध्ये एक विस्तृत अशी क्रोमपट्टी आहे जी दोन्ही एलईडी हेडलॅम्पला जोडते व संपूर्ण सेटअप एका काळ्या केसिंगमध्ये बंद आहे. तसेच दोन्ही बाजूला बारा लहान गोल एलईडी डीआरएल देण्यात आले आहेत.

तळाशी एक जाड बंपर आहे व दोन्ही बाजूंना उभ्या एअर व्हेंट्स देण्यात आले आहेत. तसेच या कारला साईडने पाहिले तर टोयोटाची ईव्ही मारुती ईव्हीएक्स (eVX) सारखीच दिसते. चाकांवरची कमान ही चौकोनी असून दरवाजांवर रुंद शरीराचे आवरण आणि सी पिलर माउंट केलेल्या मागील दरवाजाचा हँडलसह ई विटाराप्रमाणे 16 इंच अलॉय व्हील देण्यात आले आहेत.

परंतु डिझाईन मात्र वेगळे आहे. तसेच एक छोटा बंपर तसेच छतावर इंटिग्रेटेड बॉयलर आणि मध्यभागी परावर्तित घटकासह एंड टू एन्ड कनेक्टेड टेललॅम्प सेटअप देण्यात आला आहे.

टोयोटाची ही इलेक्ट्रिक कार आतून कशी असेल?
टोयोटा अर्बन क्रुझर ईव्हीमध्ये स्तरित डॅशबोर्ड तसेच अर्ध लेदरट अपहोलस्ट्री, स्क्वेरिश व्हेट्स, ब्रश केलेल्या अल्युमिनियम आणि ग्लास ब्लॅक एलिमेंट्स देण्यात आले आहेत. तसेच दोन स्पोक फ्लॅट बॉटम स्टेरिंग व्हील देण्यात आले आहे व केबिनमध्ये इंटिग्रेटेड फ्लोटिंग स्क्रीन सेटअप असून ज्यामध्ये एक इन्फोटेनमेंट आहे व दुसरा ड्रायव्हर डिस्प्ले आहे.

तसेच 10.25- इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम तसेच 10.1 इंचाचा डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, फिक्स्ड ग्लासरूफ, जेबीएल साऊंड सिस्टम आणि पावर ड्रायव्हर सीट इत्यादींचा समावेश करण्यात आला आहे. याशिवाय वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि एप्पल कार प्ले व स्वयंचलित हवामान नियंत्रण देखील यामध्ये असणार आहे.

सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून काय आहेत या कारमधील वैशिष्ट्ये
सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून जर आपण टोयोटा अर्बन क्रुझर ईव्ही बघितली तर यामध्ये प्रगत ड्रायव्हर असिस्टंट सिस्टम म्हणजेच एडीएएस मिळेल. याशिवाय लेन कीप असिस्ट,

अडॅप्टीव्ह क्रूझ कंट्रोल आणि ऑटोनॉमस इमर्जन्सी ब्रेकिंग इत्यादी वैशिष्ट्ये दिली आहेत. तसेच 360 डिग्री कॅमेरा, इलेक्ट्रॉनिक स्थिरता नियंत्रण, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम आणि एकापेक्षा जास्त एअरबॅग समाविष्ट असणार आहेत.

किती असू शकते या कारची किंमत?
भारतामध्ये 2025 च्या अखेरीस ही कार लॉन्च होण्याची शक्यता आहे व तिची एक्स शोरूम किंमत 23 लाख रुपये पर्यंत असू शकते.

Ajay Patil