Toyota Urban Cruiser Taisor : टोयोटा लवकरच आपली एक नवीन कार मार्केटमध्ये लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. टोयोटाच्या वाहनांची मागणी भारतीय ऑटो मार्केटमध्ये नेहमीच टॉपवर असते. अशातच कंपनी आपल्या लाइनअपमध्ये नवीन SUV Taisorचा देखील समावेश करणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, टोयोटा कंपनी पुढील महिन्यात 3 एप्रिल रोजी नवीन SUV Taisor लाँच करण्याच्या तयारीत आहे. समोर आलेल्या माहितीनुसार या कारचे डिझाईन खूपच खास असणार आहे.
आगामी टोयोटा अर्बन क्रूझर टसरमध्ये असलेल्या वैशिष्ट्यांबद्दल सांगायचे तर, त्यात पॅडल शिफ्टर्ससह सुसज्ज 6-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचा पर्याय पाहायला मिळू शकतात. टोयोटाच्या आगामी कॉम्पॅक्ट एसयूव्ही-कूपमध्ये 1.2-लीटर के-सीरीज ड्युअल जेट, ड्युअल VVT पेट्रोल इंजिन सेटअप मिळण्याची देखील शक्यता आहे. SUV ला 1.0-लीटर, 3-सिलेंडर, टर्बो बूस्टरजेट पेट्रोल इंजिन देखील मिळेल अशी अपेक्षा आहे.
या नवीन कारमध्ये ESP, फ्लोटिंग 9-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आणि हेड-अप डिस्प्ले आहे. कॅमेरा, क्रूझ कंट्रोल यांसारख्या अनेक आधुनिक वैशिष्ट्यांचा या कारमध्ये समावेश केला जाऊ शकतो.
Toyota Urban Cruiser Taisor किंमत
आगामी Toyota Urban Cruiser Taisor (भारतातील अर्बन Cruiser Taisor Price) च्या किमतीबद्दल बोलायचे झाल्यास, कंपनीने अद्याप अधिकृतपणे खुलासा केलेला नाही. पण ही SUV भारतीय बाजारपेठेत 8 लाख रुपये (एक्स-शोरूम) किंमतीत विक्रीसाठी लॉन्च केली जाऊ शकते असा अंदाज लावला जात आहे. ही कार मार्केटमध्ये आल्यानंतर टाटा नेक्सॉन, मारुती सुझुकी ब्रेझा, महिंद्रा XUV 300 यांसारख्या वाहनांशी थेट स्पर्धा करेल.