ऑटोमोबाईल

टीव्हीएसमुळे इतर कंपन्यांच्या स्कूटरचे मार्केट होणार कमी! टीव्हीएसची ‘ही’ स्कूटर देशामध्ये करणार धमाल; वाचा काय असणार किंमत?

Published by
Ajay Patil

सध्या मोठ्या प्रमाणावर बाईकच्या तुलनेमध्ये आता स्कूटरची मागणी देखील मोठ्या प्रमाणावर वाढत असून अनेक वाहन उत्पादक कंपन्यांनी आता वेगवेगळ्या वैशिष्ट्यांसह ग्राहकांना परवडतील व ग्राहकांच्या मागणीनुसार स्कूटर बाजारात आणलेले आहेत. त्यामुळे जर तुमचा देखील स्कूटर्स विकत घ्यायचा विचार असेल तर बाजारात सध्या विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या स्कूटर पैकी कोणती घ्यावी याबद्दल फार मोठा गोंधळ होतो.

साधारणपणे होंडा तसेच सुझुकी यासारख्या कंपन्यांच्या स्कूटर्स बाजारामध्ये आघाडीवर आहेत. आता या कंपन्यांच्या स्कूटरसना तगडी टक्कर देईल अशी स्कूटर टीव्हीएस कंपनी लाँच करणार आहे. टीव्हीएस मोटर आपली लोकप्रिय असलेली जुपिटर या स्कूटरचे नवीन फेसलिफ्ट मॉडेल लाँच करण्याच्या तयारीत असून या नवीन मॉडेलमध्ये अनेक बदल आपल्याला पाहायला मिळणार आहेत.

 टीव्हीएस लॉन्च करणार ज्युपिटरचे नवीन फेसलिफ्ट मॉडेल

देशातील आघाडीची दुचाकी उत्पादक कंपनी असलेल्या टीव्हीएस मोटरच्या माध्यमातून लोकप्रिय असलेल्या ज्युपिटर चे नवीन फेसलिफ्ट मॉडेल लॉन्च केले जाणार असून या मॉडेलमध्ये अनेक नवीन बदल आपल्याला पाहायला मिळणार आहेत. सध्या आपण या स्कूटरचे वैशिष्ट्य पाहिले तर यामध्ये 110cc आणि 125cc इंजिन आहे. सध्या यामध्ये ज्युपिटर 110 अपडेट केले जात आहे.

 डिझाईनमध्ये हा असेल नवीनपणा

या नवीन जुपिटर 110 च्या डिझाइनमध्ये अनेक नवीन प्रकारचे स्वरूप आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यात फ्रंट लूकमध्ये एक नवीन एलईडी हेडलाईट दिसणार आहे तसेच मागच्या लुकमध्ये नवीन एलईडी टेललाईट देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. रायडर्स करता लांब प्रवासासाठी एक लांब आणि मऊ सीट असण्याची शक्यता आहे. तसेच या नवीन मॉडेलमध्ये एलसीडी डिस्प्ले असणार असून  ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीने सूसज्ज असणार आहे. इतकेच काहीतरी यामध्ये नेवीगेशनची सुविधा देखील ग्राहकांना मिळणार आहे.

 कसे असेल या नवीन स्कूटरचे इंजिन आणि पावर?

टीव्हीएस ज्युपिटर मध्ये 109.7 इंजिन आहे जे 7.4 बीएचपी आणि 8.4nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. या स्कूटरचे इंजिन सीव्हीटी गिअरबॉक्सने सज्ज आहे. ह्या स्कूटरमध्ये दोन मोड असणारा असून त्यातील इको आणि दुसरा पॉवर मोड असणार आहे. विशेष म्हणजे कंपनीच्या माध्यमातून या स्कूटरवर तब्बल 17 कलर चे पर्याय दिले आहेत व इंजिन देखील खूप चांगले मानले जात आहे.

 किती असू शकते नवीन ज्युपिटर 110 ची किंमत?

जर आपण जुपिटरचे सध्याचे मॉडेल पाहिले तर त्याची किंमत 73 हजार रुपयांपासून सुरू होते. परंतु आता या नवीन ज्युपिटर 110 च्या किमतीमध्ये पाच हजार रुपयेपर्यंत वाढ होण्याची शक्यता मानली जात आहे.

Ajay Patil