Upcoming Cars In India : आज भारतीय बाजारपेठेत एकापेक्षा एक दमदार कार उपलब्ध आहे जे ग्राहकांना कमी किमतीमध्ये जास्त मायलेजसह भन्नाट फीचर्स ऑफर करतात. यामुळे तुम्ही देखील नवीन कार खरेदीचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला सांगतो भारतीय ऑटो बाजारात पुढच्या महिन्यात ( एप्रिल 2023) एकापेक्षा एक कार्स लाँच होणार ज्याचा तुम्ही नवीन कार खरेदी करताना विचार करू शकतात.
मिळालेल्या माहितीनुसार भारतीय ऑटो बाजारात एप्रिल 2023 मध्ये MG Comet EV, Maruti Suzuki Fronx, Mercedes AMG GT 63 S E Performance, Lamborghini Urus S सह अनेक कार्स लाँच होणार आहे. चला मग जाणून घेऊया त्यांच्याबद्दल संपूर्ण माहिती.
भारतीय बाजारपेठेत, मारुती सुझुकीने या वर्षी जानेवारीमध्ये ऑटो एक्सपो 2023 मध्ये Fronx SUV सादर केली होती. या कारने पहिल्याच नजरेत लोकांच्या पसंतीस उतरले होते. ती बलेनो हॅचबॅकसारखी दिसते. तसेच, बारकाईने पाहिल्यास ती ग्रँड विटाराचा फ्रंट फेस दिसते. ब्रेझा सब-कॉम्पॅक्ट एसयूव्हीच्या तुलनेत साइजने लहान एसयूव्ही, टाटा पंच, निसान मॅग्नाइट यासारख्या कार्सना टक्कर देईल अशी अपेक्षा आहे.
Frons साठी बुकिंग आधीच सुरु झाली आहे, आतापर्यंत 13,000 पेक्षा जास्त बुकिंग मिळाले आहेत. हे 1.0-लिटर टर्बो बूस्टरजेट इंजिनद्वारे समर्थित असेल ज्यामध्ये स्मार्ट हायब्रिड तंत्रज्ञानाचा समावेश आहे. इंजिनला पाच-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन किंवा पॅडल शिफ्टर्ससह सहा-स्पीड ऑटोमॅटिकशी जोडले जाईल. कंपनी पुढील महिन्यात लॉन्च करू शकते.
या कारसाठी कंपनी ऑटो एक्सपोमध्ये सादर करेल अशी अपेक्षा होती. पण ऑटोमेकरने ही ईव्ही लॉन्च करण्याची तयारी दुसऱ्या तिमाहीपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. हे एमजी एअर किंवा कूलिंग एअर ईव्ही नावाच्या चीनी ईव्ही मॉडेलवर आधारित आहे. आम्ही तुम्हाला सांगतो, ZS EV नंतर कार निर्मात्याचे हे दुसरे इलेक्ट्रिक वाहन असेल. सध्या बॅटरी पॅक आणि इलेक्ट्रिक मोटरची माहिती समोर आलेली नाही मात्र एका चार्जवर ती सुमारे 250-300 किमीची ड्रायव्हिंग रेंज ऑफर करेल अशी अपेक्षा आहे.
जर स्पीड आणि परफॉर्मन्स तुमची आवड असेल, तर मर्सिडीज पुढच्या महिन्यात त्याच्या S Eचे अनावरण करण्यासाठी सज्ज आहे. कार 4.0-लिटर V8 टर्बो इंजिन आणि इलेक्ट्रिक मोटरद्वारे समर्थित आहे. V8 युनिट 843 hp कमाल पॉवर आणि 1,400 Nm पीक टॉर्क जनरेट करते. ज्याला 0 ते 100 किमी प्रतितास वेग येण्यासाठी फक्त 2.9 सेकंद लागतात.
भारतीय बाजारपेठेत कंपनी Lamborghini Urus च्या जागी Lamborghini Urus S आणणार आहे. Lamborghini Urus S ला 4.0-लिटर V8 ट्विन-टर्बो इंजिन मिळेल. SUV 305 kmph च्या टॉप स्पीडसह येईल जी केवळ 3.5 सेकंदात शून्य ते 100 किमी प्रतितास धावू शकते. लॅम्बोर्गिनी भारतातील तिच्या एंट्री-लेव्हल एसयूव्हीला आगामी Urus S सह बदलण्यासाठी सज्ज आहे. हे सध्या भारतात विकल्या जाणार्या उरूसची जागा घेईल.
हे पण वाचा :- What Women Want: बंगला नाही, गाडी नाही; मुलीला तिच्या जोडीदाराकडून ‘या’ 4 गोष्टी हव्या असतात ; जाणून उडतील तुमचे होश