Upcoming Electric Car : जर तुम्हीही नजीकच्या भविष्यात कार खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे भारतीय कार बाजार लवकरच दोन नवीन इलेक्ट्रिक कारची एन्ट्री होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार Kia Motors लवकरच भारतीय कार बाजारात दोन नवीन इलेक्ट्रिक कार लॉन्च करणार आहे.
कंपनी पुढील वर्षी अर्थात 2025 मध्ये या दोन नवीन इलेक्ट्रिक कार ग्राहकांसाठी उपलब्ध करून देईल असा दावा मीडिया रिपोर्ट मध्ये केला जात आहे. यामुळे जर तुम्हालाही नजीकच्या भविष्यात इलेक्ट्रिक कार खरेदी करायची असेल तर तुम्हाला आता बाजारात आणखी काही विकल्प पाहायला मिळणार आहे.
खरंतर सध्या भारतात इलेक्ट्रिक सेगमेंट मध्ये टाटा कंपनीचा बोलबाला आहे. या सेगमेंट मध्ये टाटा कंपनीने अनेक मॉडेल्स लॉन्च केले आहेत. विशेष म्हणजे टाटा आपला इलेक्ट्रिक सेगमेंटचा पोर्टफोलिओ आणखी मजबूत करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत आहे.
दरम्यान आता टाटा कंपनीला विविध कंपन्यांच्या माध्यमातून या सेगमेंटमध्ये कडवी झुंज दिली जाऊ लागली आहे. किया देखील या सेगमेंटमध्ये नजीकच्या भविष्यात नवीन इलेक्ट्रिक कार लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, सध्या कंपनीकडे भारतीय बाजारात फक्त EV6 मॉडेल आहे.
ही एक प्रीमियम इलेक्ट्रिक कार आहे, ज्याची विक्री आता खूपच कमी झाली आहे. यामुळे आता कंपनीकडून लवकरच भारतात नवीन इलेक्ट्रिक गाड्या लॉन्च केल्या जाणार आहेत. पुढील वर्षी कंपनी दोन नवीन इलेक्ट्रिक कार लॉन्च करू शकते अशी माहिती समोर आली आहे. दरम्यान आता आपण या इलेक्ट्रिक कारची थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
Kia EV9 : Kia मोटर्स भारतीय कार बाजारात EV9 ही नवीन इलेक्ट्रिक कार लॉन्च करणार अशी बातमी समोर आली आहे. या मॉडेलचे कंपनीने 2023 मध्ये अनावरण केले होते. विशेष म्हणजे या गाडीची चाचणीही सुरू झाली आहे. ही आगामी इलेक्ट्रिक SUV कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये विद्यमान EV6 मॉडेलच्या वर राहणार आहे.
जागतिक स्तरावर, त्याच्या बेस स्पेक व्हेरियंटमध्ये 76.1 kWh बॅटरी पॅक आहे, जो 358Km ची रेंज ऑफर करतो. हे एक्सल-माउंटेड 215 bhp इलेक्ट्रिक मोटरसह जोडलेले आहे. दुसऱ्या वेरियंटमध्ये 99.8 kWh बॅटरी पॅक देण्यात आली आहे जी की 541Km ची रेंज देत आहे. ही गाडी पुढील वर्षी भारतात दाखल होऊ शकते अशी आशा व्यक्त होत आहे.
किआ क्लॅव्हिस (सायरोस) : Kia पुढील वर्षी आणखी एक नवीन इलेक्ट्रिक कार लॉन्च करणार आहे. Clavis SUV ही इलेक्ट्रिक कार पुढील वर्षी लॉन्च होणार असा दावा करण्यात आला आहे. याची चाचणी भारतात सुरु झाली असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे ही गाडी पुढल्या वर्षी भारतात लॉन्च होणार अशी शक्यता व्यक्त होत आहे.
निश्चितच ज्या लोकांना पुढील वर्षी इलेक्ट्रिक कार खरेदी करायची असेल त्यांच्यासाठी किया कंपनीची ही गाडी देखील फायदेशीर ठरू शकणार आहे. तथापि या गाडीच्या लॉन्चिंग बाबत अजून कंपनीकडून अधिकृत अपडेट हाती आलेले नाही. यामुळे ही गाडी पुढील वर्षी कधी लॉन्च होणार हे आत्ताच सांगता येणे कठीण आहे.