Upcoming Electric Cars : भारतात पुढील महिन्यात लॉन्च होणार या लक्झरी इलेक्ट्रिक कार, सिंगल चार्जवर धावणार 600 किमी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Upcoming Electric Cars : भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमती पाहता अनेक कंपन्यांकडून त्यांची इलेक्ट्रिक वाहने लॉन्च करण्यास सुरुवात केली आहे. तसेच आता ऑगस्ट महिन्यामध्ये देखील अनेक इलेक्ट्रिक कार भारतात लॉन्च होणार आहेत.

भारतीय ऑटो क्षेत्रासाठी ऑगस्ट महिना खास ठरणार आहे. कारण या महिन्यामध्ये आणखी लक्झरी इलेक्ट्रिक कार लॉन्च होणार आहेत. त्यामुळे लक्झरी फीचर्स असलेल्या कार ग्राहकांना खरेदीसाठी उपलब्ध होणार आहेत.

भारतीय वाहन क्षेत्रामध्ये इलेक्ट्रिक वाहनांच्या मागणीमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे अनेक कंपन्या इलेक्ट्रिक वाहन निर्मितीवर अधिक भर देताना दिसत आहेत. भारतीय ऑटो बाजारात अलीकडच्या काळात MG Comet EV, Tata Tiago EV आणि Cotreon C3 EV अशा इलेक्ट्रिक कार लॉन्च झाल्या आहेत. या इलेक्ट्रिक कारला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

आता भारतात आणखी दोन लक्झरी इलेक्ट्रिक कार प्रीमियम फीचर्ससह लॉन्च होणार आहेत. ऑडी Q8 e-tron आणि Volvo C40 रिचार्ज या इलेक्ट्रिक कारचा यामध्ये समावेश आहे. चला तर या इलेक्ट्रिक कारबद्दल अधिक जाणून घेऊया…

ऑडी Q8 ई-ट्रॉन

भारतीय ऑटो क्षेत्रात ऑडी इंडियाकडून त्यांची ऑडी Q8 ई-ट्रॉन ही इलेक्ट्रिक कार 18 ऑगस्ट 2023 रोजी लॉन्च केली जाणार आहे. ही कार 95kWh आणि 114kWh बॅटरी पॅकसह दोन व्हेरियंटमध्ये लॉन्च केली जाणार आहे. या दोन्ही कारमध्ये दोन इलेक्ट्रिक मोटर्स दिल्या जाणार आहेत.

ऑडी Q8 ई-ट्रॉन ही इलेक्ट्रिक कार केवळ 5.6 सेकंदात 0-100 किमी प्रतितास वेग पकडण्यास सक्षम असल्याचा दावा करण्यात येत आहे. या कारमध्ये जबरदस्त बॅटरी पॅक देण्यात येत असल्याने सिंगल चार्जमध्ये ६०० किमीची रेंज देण्यास ही कार सक्षम आहे.

volvo c40 रिचार्ज

Volvo कंपनीच्या सर्वच कार सर्वाधिक सुरक्षित असल्याचे मानले जाते. आता Volvo कंपनी त्यांची भारतात volvo c40 रिचार्ज ही इलेक्ट्रिक कार ऑगस्टमध्ये लॉन्च करणार आहे. 14 जून 2023 रोजी या कारचे भारतात अनावरण करण्यात आले होते.

या इलेक्ट्रिक कारमध्ये 78kWh बॅटरी पॅक देण्यात येणार आहे. तसेच कारमध्ये या इलेक्ट्रिक एसयूव्हीमध्ये जास्तीत जास्त 405bhp पॉवर आउटपुट आणि 660Nm पीक टॉर्क जनरेट करण्यास ट्विन मोटर सेटअप देण्यात येणार आहे. ही इलेक्ट्रिक कार सिंगल चार्जमध्ये 530 किमीची रेंज देण्यास सक्षम असल्याचा दावा करण्यात येत आहे.