Upcoming EV Cars In India : देशात लॉन्च होणार टाटा आणि मारुतीच्या स्वस्त इलेक्ट्रिक कार ! देणार 400 किमी रेंज, पहा यादी

Published by
Ahmednagarlive24 Office

Upcoming EV Cars In India : देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. अशा काळात अनेक कार उत्पादक कंपन्यांकडून पेट्रोल-डिझेल कारला पर्याय म्हणून त्यांच्या नवनवीन EV कार लॉन्च केल्या जात आहेत.

इलेक्ट्रिक कारची वाढती मागणी लक्षात घेता टाटा मोटर्सने त्यांच्या अनेक इलेक्ट्रिक कार भारतात लॉन्च केल्या आहेत. सध्या इलेक्ट्रिक कार सेगमेंटमध्ये टाटा मोटर्सचे वर्चस्व असल्याचे पाहायला मिळत आहे.

मारुती सुझुकी देशातील सर्वात मोठी कार उत्पादक आणि सर्वाधिक कार विक्री करणारी कंपनी असली तरी अद्याप एकही इलेक्ट्रिक कार लॉन्च करण्यात आलेली नाही. मात्र मारुती सुझुकी इलेक्ट्रिक कार लॉन्च करण्यासाठी सज्ज असल्याचे पाहायला मिळत आहे.

1. Tata Altroz EV

टाटा मोटर्सकडून भारतीय ऑटो मार्केटमध्ये त्यांच्या चार इलेक्ट्रिक कार भारतात लॉन्च केल्या आहेत. आता टाटा Altroz EV कार लॉन्च करण्याच्या तयारीत असल्याचे पाहायला मिळत आहे. Punch. ev ज्या प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आली आहे त्याचा प्लॅटफॉर्मवर Altroz EV लॉन्च केली जाईल.

2025 मध्ये टाटा Altroz EV लॉन्च करू शकते. Altroz EV कारमध्ये टाटाकडून 25 kWh ते 35 kWh क्षमतेचा बॅटरी पॅक दिला जाऊ शकतो. एकदा चार्ज केल्यानंतर ही कार 300-420 किमी रेंज देण्यास सक्षम असेल.

2. Renault Kwid EV

Renault कार कंपनीकडून त्यांची Kwid कार देखील EV सेगमेंटमध्ये लॉन्च केली जाणार आहे. युरोपमधील Dacia Spring EV वर आधारित Kwid EV कार असेल.

कारमध्ये 26.8 kWh बॅटरी पॅक दिला जाईल. सिंगल चार्जमध्ये ही कार 230 किमी रेंज देण्यास सक्षम असेल. Tiago.ev आणि MG Comet शी ही कार स्पर्धा करेल.

3. मारुती सुझुकी EVX

मारुती सुझुकी कार कंपनीकडून 2024 च्या शेवटी किंवा 2025 च्या सुरुवातीला त्यांची पहिली EVX इलेक्ट्रिक कार लॉन्च केली जाऊ शकते. मारुती सुझुकीकडून अद्याप एकही इलेक्ट्रिक कार भारतात लॉन्च करण्यात आलेली नाही.

मारुती सुझुकीकडून त्यांच्या पहिल्याच इलेक्ट्रिक कारमध्ये 60kWh मजबूत बॅटरी पॅक दिला जाऊ शकतो. सिंगल चार्जमध्ये ही कार 550 किमी रेंज देण्यास सक्षम असेल. कारची किंमत देखील कमी असेल.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office