Upcoming EV Cars : महिंद्रा ते मारुती लॉन्च करणार 500 किमी रेंज देणाऱ्या इलेक्ट्रिक कार ! किंमतही असणार कमी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Upcoming EV Cars : देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्याने अनेकांना इंधनावरील कार वापरणे न परवडण्यासारखे झाले आहे. त्यामुळे अनेक कार कंपन्यांकडून त्यांच्या शानदार इलेक्ट्रिक कार सादर करण्यात आल्या आहेत. त्यांच्या या कारला बाजारात चांगली मागणी आहे.

अनेक कार कंपन्यांकडून इलेक्ट्रिक कारची वाढती मागणी लक्षात घेता त्यांच्या आगी इलेक्ट्रिक कार लॉन्च करण्याचा निर्णय घेतला आहे. टाटा, मारुती आणि महिंद्रा त्यांच्या नवीन जबरदस्त इलेक्ट्रिक कार लॉन्च करणार आहेत.

1. Tata Curvv आणि Harrier EV

टाटा मोटर्सकडून यावर्षी त्यांच्या Curvv आणि Harrier EV कार लॉन्च केल्या जाणार आहेत. Curvv EV कार नवीन पंच EV च्या प्लॅटफॉर्मवरच तयार केली जाणार आहे. एकदा चाजर केल्यानंतर Curvv EV कार 500 किमी पेक्षा जास्त रेंज देण्यास सक्षम असेल.

तसेच टाटाकडून या वर्षाच्या शेवटी हॅरियर ईव्ही कार देखील लॉन्च केली जाणार आहे. भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो 2024 मध्ये टाटाकडून हॅरियर ईव्ही कार सादर करण्यात आली आहे.

2. Hyundai Creta EV

ह्युंदाई मोटर्सकडून त्यांची आतापर्यंत एकच इलेक्ट्रिक कार भारतीय ऑटो मार्केटमध्ये लॉन्च करण्यात आली आहे. आता ह्युंदाई मोटर्स लवकरच Creta EV एसयूव्ही कार लॉन्च करणार आहे. Creta EV चाचणी दरम्यान अनेकदा दिसली आहे. 2025 च्या सुरुवातीला Creta EV कार लॉन्च केली जाऊ शकते.

3. Maruti Suzuki eVX

मारुती सुझुकी भारतीय मार्केटमध्ये त्यांची पहिली इलेक्ट्रिक कार लॉन्च करण्यासाठी सज्ज आहे. 27PL प्लॅटफॉर्मवर मारुतीची पहिली eVX इलेक्ट्रिक कार लॉन्च केली जाईल.

एकदा चार्ज केल्यानंतर 550 किमी रेंज देण्यास ही कार सक्षम असेल. 2025 च्या सुरुवातीला मारुती eVX कार लॉन्च केली जाईल. कारमध्ये 60 kWh क्षमतेचा बॅटरी पॅक दिला जाऊ शकतो

4. महिंद्रा XUV.e8

महिंद्रा कार कंपनीकडून त्यांची XUV.e8 इलेक्ट्रिक कार डिसेंबर 2024 पर्यंत लॉन्च केली जाण्याची शक्यता आहे. या कारमध्ये मजबूत बॅटरी पॅक दिला जाणार आहे. कारची चाचणी देखील महिंद्राकडून सुरु करण्यात आली आहे. INGLO प्लॅटफॉर्मवर ही कार तयार करण्यात येईल.