Upcoming SUV Car : तुम्हीही नजीकच्या भविष्यात कार खरेदी करण्याच्या तयारीत आहात का ? अहो मग आजची ही बातमी तुमच्यासाठी खूपच कामाची ठरणार आहे. ही बातमी ज्या लोकांना SUV गाडी खरेदी करायची असेल त्यांच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय कार बाजारात लवकरच तीन नवीन एसयूव्ही कारची एन्ट्री होणार आहे.
खरे तर गेल्या काही वर्षांमध्ये भारतात सेडान कारच्या तुलनेत एसयूव्ही कारला मोठी मागणी आली आहे. विशेषता तरुणांमध्ये एसयुव्ही कारची मोठी क्रेज पाहायला मिळत आहे. भारतात सध्या ह्युंदाई कंपनीची ह्युंदाई क्रेटा या SUV चा जलवा पाहायला मिळत आहे. ह्युंदाई कंपनीची ही सर्वाधिक विक्री होणारी गाडी आहे.
मिळालेल्या माहितीनुसार जानेवारी 2024 मध्ये लॉन्च झालेल्या ह्युंदाई क्रेटाच्या फेसलिफ्ट वर्जनला आत्तापर्यंत एक लाख बुकिंग मिळाल्या आहेत. म्हणजेच अवघ्या पाच महिन्यांच्या काळात एक लाख बुकिंग या गाडीला मिळाल्या आहेत. यावरून या SUV गाडीची भारतात किती डिमांड आहे हे स्पष्ट होते.
पण, आता ह्युंदाई क्रेटाला टक्कर देण्यासाठी बाजारात 2 नवीन एसयुव्ही लॉन्च होणार असल्याची बातमी समोर येत आहे. अशा परिस्थितीत आज आपण याच 2 अपकमिंग एसयूव्ही गाड्यांची थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
Tata Curve : टाटा ही भारतातील सर्वाधिक लोकप्रिय ऑटो कंपनी आहे. या कंपनीचा एक मोठा चाहता वर्ग पहायला मिळतो. या कंपनीच्या अनेक गाड्या ग्राहकांमध्ये लोकप्रिय आहेत. इलेक्ट्रिक सेगमेंट मध्ये तर टाटा कंपनीला जोडच नाहिये. इलेक्ट्रिक सेगमेंट मध्ये या कंपनीची एका प्रकारे मक्तेदारी पाहायला मिळत आहे.
दरम्यान हीच डाटा कंपनी नजीकच्या भविष्यात Tata Curvv ही बहुप्रतिक्षित एसयूव्हीं लॉन्च करणार असल्याचे खात्रीलायक बातमी समोर आली आहे. ही आगामी Tata Curve ICE इंजिन आणि इलेक्ट्रिक व्हर्जनमध्ये लॉन्च केली जाईल अशी माहिती समोर आली आहे.
याच्या पॉवरट्रेनबद्दल बोलायचे झाले तर, या गाडीमध्ये 1.5-लीटर डिझेल इंजिनसह नवीन 1.5-लीटर GDi टर्बो पेट्रोल इंजिन दिले जाणार आहे. याशिवाय कारच्या आतील भागात 12.3-इंच टचस्क्रीन, ADAS तंत्रज्ञान आणि सुरक्षेसाठी 360-डिग्री कॅमेरा देखील दिला जाऊ शकतो असा दावा मीडिया रिपोर्ट मध्ये करण्यात आला आहे.
Citroen Basalt : Citroen ही आघाडीची फ्रेंच कार निर्माता कंपनी आहे. या कंपनीने भारतात अनेक लोकप्रिय मॉडेल लॉन्च केले आहेत. दरम्यान ही देखील कंपनी भारतात एक नवीन SUV लाँच करण्याच्या तयारीत असल्याची माहिती मीडिया रिपोर्ट मधून समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार कंपनी लवकरच ‘Basalt’ ही SUV लाँच करणार आहे.
आगामी SUV Citroen C3 Aircross वर आधारित राहणार आहे. आगामी SUV मध्ये 10.25-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, वायरलेस स्मार्टफोन कनेक्टिव्हिटीसह डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर यांसारखें भन्नाट फिचर्स देखील दिले जाणार आहेत. या गाडीची किंमत ही 12 ते 17 लाख रुपयांच्या दरम्यान राहू शकते असा दावा केला जात आहे.