ऑटोमोबाईल

सणासुदीच्या हंगामात लाँच होणार ‘या’ 3 नवीन SUV ; वाचा फिचर्स अन लाँचिंग डेट

Published by
Tejas B Shelar

Upcoming SUV : ऑगस्ट महिन्यापासून म्हणजेच श्रावण महिना सुरू झाला की देशात सणासुदीचा हंगाम सुरू होत असतो. दरवर्षी फेस्टिव सीझनमध्ये म्हणजेच सणासुदीच्या हंगामात कार विक्रीचा आलेख वाढत असतो. यामुळे अनेक दिग्गज ऑटो कंपन्या दरवर्षी फेस्टिव सीजन मध्ये नवनवीन मॉडेल लॉन्च करत असतात.

यंदा देखील सणासुदीच्या हंगामातील उत्साहाचा फायदा घेण्यासाठी Hyundai, Tata, Mahindra सारख्या प्रमुख कार निर्मात्या कंपन्या नवीन SUV लाँच करण्याच्या तयारीत असल्याची बातमी समोर आली आहे. दरम्यान, आता आपण या आघाडीच्या कार उत्पादक कंपन्या कोणत्या SUV कार्स लॉन्च करणार यासंदर्भात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

टाटा कर्व्ह ICE : देशातील आघाडीची कार उत्पादक कंपनी टाटा मोटर्स नुकत्याच काही दिवसांपूर्वी Curvv EV ही इलेक्ट्रिक SUV लॉन्च केली होती. कंपनीने पहिल्यांदाच कुठल्यातरी मॉडेलचे आयसीई मॉडेल लॉन्च करण्यापूर्वी इलेक्ट्रिक मॉडेल लॉन्च केले. दरम्यान कंपनी या मॉडेलचे ICE वर्जन आता बाजारात लॉन्च करणार आहे.

ICE Tata Curvv पुढील महिन्यात, 3 सप्टेंबरला भारतात लॉन्च होणार अशी माहिती कंपनीकडून समोर आली आहे. या गाडीबाबत बोलायचं झालं तर यामध्ये तीन इंजिन पर्याय राहणार आहेत. या गाडीत 1.2L रेव्होट्रॉन पेट्रोल, 1.2L GDI पेट्रोल आणि 1.5L डिझेल इंजिन ऑप्शन राहील. यामध्ये नुकत्याच लाँच झालेल्या Curvv EV चे सर्व फीचर्स पाहायला मिळणार आहेत.

ह्युंदाई अल्काझार फेसलिफ्ट : Hyundai ही दिग्गज ऑटो कंपनी आहे. भारतात कार विक्रीच्या बाबतीत मारुती सुझुकी नंतर याच कंपनीचा नंबर लागतो. भारतात सर्वाधिक कार विक्री करणारी ही दुसरी सर्वात मोठी कंपनी आहे.

ही कंपनी आता आपला एसयुव्ही सेगमेंट आणखी मजबूत करण्यासाठी पुढील महिन्याच्या 9 तारखेला फेसलिफ्ट Alcazar लाँच करणार अशी माहिती कंपनीने दिली आहे. या आगामी गाडीचे छायाचित्र यापूर्वीच समोर आले आहेत. ही अद्ययावत SUV नवीन जनरेशनच्या क्रेटापासून प्रेरित आहे.

या अपकमिंग एस यु व्ही मध्ये अनेक भन्नाट फीचर्स पाहायला मिळणार आहेत. या गाडीत 1.5 लिटर डिझेल आणि 1.5 लीटर टर्बो पेट्रोल इंजिन उपलब्ध राहणार आहेत, जे मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह येणार आहेत.

महिंद्रा XUV 3XO EV : भारतात गेल्या काही महिन्यांमध्ये इलेक्ट्रिक गाड्यांची मागणी वाढली आहे. सध्या भारतीय कार मार्केटमध्ये इलेक्ट्रिक सेगमेंटचा विचार केला तर टाटा कंपनी शीर्ष स्थानावर आहे. या कंपनीच्या आजूबाजूला ही कुणी भटकत नाहीये.

पण या कंपनीची ही मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी अनेक आघाडीच्या कंपन्यांनी जोरदार मोर्चे बांधणी सुरू केली आहे. महिंद्रा देखील आता टाटा कंपनीच्या मक्तेदारीला आव्हान देण्यासाठी XUV 3XO कॉम्पॅक्ट SUV चे इलेक्ट्रिक व्हेरियंट लॉन्च करणार आहे. या कॅलेंडर वर्षाच्या समाप्तीपूर्वी ही गाडी भारतीय कार मार्केटमध्ये लॉन्च होईल अशी अपेक्षा आहे.

ही गाडी XUV 400 च्या खाली लिस्ट राहील. ही गाडी टाटा पंच EV शी स्पर्धा करणार आहे. XUV 400 मधील लहान बॅटरी पॅक या गाडीतही मिळणार आहे. ही गाडी एका चार्जवर 400 किलोमीटरपर्यंत धावू शकणार आहे. म्हणजे या गाडीची ड्रायव्हिंग रेंज उत्तम राहणार आहे.

Tejas B Shelar

Based in Ahmednagar, Maharashtra, I Am a Founder Editor for Ahmednagarlive24, Covering Politics, Technology, Automobile, Finance, Investment and Share Market Related News. For News Tips, You Can Reach Me at edit.tejasbshelar@gmail.com