ऑटोमोबाईल

गाडीची बॅटरी बदलण्यासाठी कशाला जाता मेकॅनिककडे! वापरा ‘या’ स्टेप आणि स्वतः बदलावा गाडीची बॅटरी

Published by
Ajay Patil

जेव्हा आपण दुचाकी असो किंवा चार चाकी वाहन असो त्याचा वापर जेव्हा रस्त्यावर करतो तेव्हा कालांतराने मेंटेनन्सच्या दृष्टिकोनातून आपल्याला बऱ्याच गोष्टींची काळजी घ्यावी लागते. वाहनामध्ये कुठल्याही प्रकारचे छोटे-मोठ्या समस्या उद्भवल्या तरी आपल्याला मेकॅनिक कडे जाण्याच्या पर्याय राहत नाही व मेकॅनिककडे गेल्यावर मात्र खिशाला झळ बसतेच.

त्यामुळे वाहनाच्या बाबतीत जर काही छोट्या-मोठ्या समस्या उद्भवल्या तर त्या आपल्याला घरीच स्वतः रिपेअर करता येणे खूप गरजेचे असते. वाहनामध्ये अशी अनेक छोटी उपकरणे किंवा छोटे समस्या निर्माण होतात जे आपल्याला घरीच दुरुस्त करता येणे देखील शक्य असते.

परंतु कधी आपण याबाबत प्रयत्न करत नाही व छोट्या मोठ्या गोष्टींसाठी देखील मेकॅनिक कडे जाऊन पैसा खर्च करतो. या सगळ्या समस्यांमध्ये जर आपण पाहिले तर वाहनातील बॅटरी ही महत्त्वाची असते. वाहन सुरू होण्यापासून वाहनाची हेडलाईट आणि गाडी सुरू होण्यासाठी बॅटरी महत्वाची असते व त्यामुळे ती उत्तम स्थितीत ठेवणे खूप गरजेचे असते.

परंतु दीर्घ कालावधीसाठी बॅटरीचा वापर झाला तर कालांतराने ती बदलण्याची वेळ आपल्यावर येते. याकरिता आपण सहज मेकॅनिक कडे जातो व बॅटरी बदलतो. परंतु हे आपल्याला अवघड काम वाटत असले तरी देखील फक्त सहा स्टेप्स वापरून तुम्ही घरच्या घरी देखील बॅटरी बदलू शकतात. त्याबद्दलचीच माहिती आपण या लेखात बघू.

 या स्टेप्स वापरा आणि गाडीतील बॅटरी बदलावा

1- अगोदर बॅटरी कुठे आहे त्याचा शोध घेणे?- अगोदर गाडी सपाट भागावर पार्क करून घ्यावी व नंतर गाडी बंद करून इंजिन थोडे थंड होऊ द्यावे. इंजिन थंड झाल्यानंतर गाडीचा पुढचा भाग उघडावा. बऱ्याच गाड्यांमध्ये बॅटरी ही इंजिन कंपार्टमेंटमध्ये मध्यभागी किंवा चालकाच्या समोरच्या भागाकडे बोनेट खाली असते. परंतु काही वेळेस बॅटरी गाडीच्या मागच्या भागाकडे देखील बसवलेली असू शकते.

2- बॅटरी टर्मिनलचा शोध घ्यावा आणि डिस्कनेक्ट करावे बॅटरीचा शोध लागल्यानंतर बॅटरी टर्मिनलचा शोध घ्यावा. यामध्ये लाल( पॉझिटिव्ह ) आणि काळा( निगेटिव्ह ) रंग असलेले हे टर्मिनस केबल कनेक्टर सह जोडलेले असतात. त्यासाठी पान्याचा वापर करून प्रथम काळा म्हणजेच निगेटिव्ह टर्मिनसला डिलीट करावे व ते डिस्कनेक्ट करावे. नंतर पॉझिटिव्ह टर्मिनल चे केबल काढून डिस्कनेक्ट करावे. हे काम करताना मात्र सुरक्षिततेचा उपाय म्हणून आवश्यक हातमोजे आणि डोळ्यांच्या संरक्षणाकरिता गॉगल घालणे गरजेचे आहे.

3- बॅटरी बाहेर काढणे गाडीची बॅटरी या सामान्यपणे होल्ड डाऊन क्लॅम्प सह सुरक्षित केल्या जातात. याकरिता प्रथम त्यावरील नट्स सैल करावे व काळजीपूर्वक  बॅटरी तिच्या जागेतून बाहेर काढून घ्यावी. बॅटरीवर कॉस्टिक लिक्विड असते व त्यामुळे ती बाहेर काढताना सरळ स्थितीत राहील याची काळजी घ्यावी.

4- बॅटरी आणि टर्मिनल केबल स्वच्छ करून घेणे जुनी बॅटरी काढल्यानंतर वायर ब्रशवर टर्मिनल क्लीनिंग टूलचा वापर करून बॅटरी ट्रे आणि टर्मिनल कनेक्टर स्वच्छ करून घ्यावेत. त्यामध्ये जर गंज लागला असेल तर तो व्यवस्थित साफ करून घ्यावा व करिता तुम्ही बेकिंग सोड्याचा देखील वापर करू शकतात. असेच कनेक्टरसह आवश्यक केबल खराब झाले नाहीत ना याची खात्री करून घ्यावी.

5- नवीन बॅटरी बसवून घ्यावी वरील प्रक्रिया झाल्यानंतर ही शेवटची स्टेप व महत्त्वाची स्टेप असून यामध्ये नवीन बॅटरी गाडीत बसवणे ही प्रक्रिया आहे. याकरिता नवीन बॅटरी ट्रे मध्ये ठेवावी आणि गाडीतील टर्मिनल, बॅटरीच्या टर्मिनलसह योग्य पद्धतीने बसले असल्याचे खात्री करावी. तसेच बॅटरी माउंटिंग शेल्फवर सुरक्षितपणे ठेवा आणि पुन्हा होल्ड डाऊन क्लॅम्प जोडून घ्या व नट बोल्ट घट्ट बसवून घ्यावा.

त्यानंतर टर्मिनल जोडताना प्रथम पॉझिटिव्ह आणि नंतर निगेटिव्ह म्हणजेच काळा रंगाचे टर्मिनल बॅटरीला जोडावे. शक्य असल्यास किंवा हवे असल्यास दोन्ही टर्मिनल्स वर बॅटरी अँटी कोरोसिव्ह प्रोटेक्शन जेल किंवा प्रोटेक्टिव्ह फिल्डवर लावून घ्यावे. सगळी बॅटरी बदलण्याची प्रक्रिया झाल्यानंतर गाडी सुरू करून पहावी.

Ajay Patil