ऑटोमोबाईल

शोरूममध्ये जा आणि शून्य डाऊनपेमेंट वर या 2 SUV कार घरी घेऊन या! ‘या’ तारखेपर्यंत आहे ऑफर

Published by
Ajay Patil

MG Hector SUV:- बऱ्याचदा आपल्याला दिसून येते की जेव्हा एखादे वर्ष संपते तेव्हा वाहन उत्पादक कंपन्या त्यांचा जो काही जुना स्टॉक असतो तो क्लिअर करतात व त्याकरिता ग्राहकांसाठी आकर्षक अशा ऑफर आणत असतात व त्या माध्यमातून सवलती देखील देत असतात.

अशा ऑफरच्या माध्यमातून ग्राहकांना कार खरेदी करण्याचे स्वप्न पूर्ण करता येते व त्यासोबत पैसा देखील मोठ्या प्रमाणावर वाचवता येतो. अगदी याच पद्धतीची ऑफर प्रसिद्ध असलेल्या JSW MG मोटर्स इंडियाने आणली असून या कंपनीने त्यांच्या एमजी Astor आणि हेक्टर या दोन एसयूव्हीवर मर्यादित कालावधीत शून्य डाऊनपेमेंट योजना आणली आहे.

म्हणजेच या ऑफर अंतर्गत ग्राहकांना 100% ऑन रोड किमती इतके कर्ज उपलब्ध होऊ शकणार आहे व मिळालेले कर्ज तुम्ही ईएमआय मध्ये रूपांतरित करू शकणार आहेत. म्हणजेच या दोन्हीपैकी कुठलीही एसयूव्ही तुम्ही खरेदी केली तर तुम्हाला शून्य डाऊनपेमेंट करावे लागणार आहे

व कुठल्याही प्रकारचा पैसा न देता या कार खरेदी करता येणार आहेत व ही ऑफर 31 डिसेंबर 2024 पर्यंत आहे. तसेच ऑफर अंतर्गत वाढीव वारंटी तसेच आवश्यक ॲक्सेसरीजकरिता निधी व वार्षिक मेंटेनन्स यासारखे अतिरिक्त फायदे देखील देण्यात येणार आहेत.

यासोबत प्रक्रिया शुल्कात देखील सूट मिळणार आहे. या ऑफरशी संबंधित अधिक माहिती हवी असेल तर ग्राहक कंपनीच्या जवळच्या डीलरशिपला भेट देऊ शकता.

काय आहेत MG Aster एसयूव्हीचे वैशिष्ट्ये?
ही एक हायब्रीड सेटअप असलेली कार असून या कारच्या हायब्रीड सिस्टममध्ये 1.5- लिटर ॲटकिन्सन सायकल पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे व हे इंजिन 102 पीएस पावर जनरेट करण्यास सक्षम आहे व त्यासोबत या कारमध्ये इलेक्ट्रिक मोटर देखील देण्यात आली असून ती 100kW क्षमतेची असून 136 पीएस पावर जनरेट करते. या कारचे जर एकत्रित पावर आउटपुट बघितले तर ते 196 पीएस इतके आहे.

ही हायब्रीड स्वरूपातील कार असून ही एसयूव्ही फ्रंट व्हील ड्राईव्ह सिस्टममध्ये सादर करण्यात आले असून तीन स्पीड आटोमॅटिक ट्रान्समिशनने सुसज्ज आहे. या कारला शून्य ते शंभर किमी प्रतितास वेग पकडण्याकरिता 8.7 सेकंद लागतात. तसेच इलेक्ट्रिक स्वरूपाच्या दृष्टिकोनातून बघितले तर या हायब्रीड सिस्टम असलेल्या कारमध्ये कंपनीने 1.83 kWh लिथियम आयन बॅटरी वापरलेली आहे व ही बॅटरी 350 होल्टची आहे.

या एसयूव्ही तुम्ही विशिष्ट परिस्थितीत पूर्णपणे इलेक्ट्रिक पावरवर देखील चालवू शकतात. या कारचे जर मायलेज बघितले तर वीस किलोमीटर प्रतिलिटरचे मायलेज देते. एमजी Astor हायब्रीड प्लसमध्ये स्लीक एलईडी हेडलॅम्प आणि एलईडी डीआरएल सह काळ्या आणि विशिष्ट आकारांमध्ये इयर इंटेक्स मध्ये तयार केलेली लोखंडी जाळी देण्यात आली आहे.

या कारची साईड प्रोफाइल जर बघितली तर ती स्पोर्टी लूक असलेली आहे. तसेच या कारमध्ये 18 इंच ड्युअल टोन अलॉय व्हिल देण्यात आले आहेत तसेच या कारच्या विंडोजवर क्रोम गार्निश व क्रोम फिनिश मध्ये छतावर रेल आणि मागच्या बाजूला त्रिकोणी एलईडी टेललॅम्प आणि ड्युअल टोन बंपर देण्यात आले आहेत.

या कारचा जर आतील भाग म्हणजेच इंटेरियर पाहिले तर यामध्ये मल्टी एअर बॅग, ऑटोमॅटिक लाईट ऑन आणि रेन सेंसर, 12.3 इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आणि सात इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देण्यात आले आहे.

तसेच यूएसबी पोर्ट, अँड्रॉइड ऑटो आणि एप्पल कार प्ले, डिजिटल रेडिओ, की लेस इंट्री आणि स्टार्ट सिस्टम, रियर व्ह्यू कॅमेरा आणि फ्रंट आणि रियर पार्किंग सेंसर यासारखी वैशिष्ट्ये देखील देण्यात आली आहेत. तसेच सेफ्टी किटमध्ये सेंट्रल लॉकिंग आणि अडॅप्टीव्ह क्रुझ कंट्रोल आणि स्पीड लिमिटरचा समावेश करण्यात आला आहे. सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून लेन कीपिंग असिस्ट,

ऍक्टिव्ह आपत्कालीन ब्रेकिंग सिस्टीम, फॉरवर्ड कॉलिजन वॉर्मिंग आणि रियर क्रॉस ट्रॅफिक अलर्ट, ब्लाइंड स्पॉट डिटेक्शन व ड्रायव्हर अटेंशन अलर्ट यासारखी अनेक महत्त्वाची वैशिष्ट्ये देखील यामध्ये मिळतात. तसेच इ कॉल इमर्जन्सी कॉल सिस्टम, इंटेलिजंट स्पीड असिस्टंट, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम आणि 360 डिग्री कॅमेरा यासारखी महत्त्वाच्या वैशिष्ट्यांचा समावेश या कारमध्ये आहे.

काय आहेत एमजी हेक्टरची वैशिष्ट्ये?
या कारमध्ये 1.5- लिटर टर्बो पेट्रोल इंजिन देण्यात आले असून ते 143 पीएस पावर आणि 250nm चा टॉर्क जनरेट करते. तसेच या कारमध्ये 2- लिटर डिझेल इंजिन देखील देण्यात आले आहे

हे डिझेल इंजिन १७० पीएस पावर आणि 350 एनएम टॉर्क जनरेट करण्यास सक्षम असून या कारमध्ये सहा स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स स्टॅंडर्डचा पर्याय देण्यात आला आहे. तसेच सोबत पेट्रोल इंजिनसह 8 स्पीड सीव्हीटी गिअरबॉक्स पर्याय देखील देण्यात आला आहे.

तसेच सात इंचाचा डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले व वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि एप्पल कारप्ले कनेक्टिव्हिटी देण्यात आली असून त्यासोबत 14 इंचाचा इन्फोटेनमेंट सिस्टीम, मल्टी कलर ॲम्बिअंट लाइटिंग, व्हेंटिलेटर फ्रंट सीट्स आणि पॅनोरमिक सनरूफ यासारखे वैशिष्ट्ये देखील देण्यात आली आहेत.

सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून बघितले तर सहा एअरबॅग्स, ADAS, EBD सह एबीएस, इलेक्ट्रॉनिक स्थिरता नियंत्रण आणि टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम सारखी वैशिष्ट्ये देखील देण्यात आले आहेत. तसेच या कारचे इंटेरियर देखील आकर्षक असून कॅबिनला ड्युअल टोन अर्गाईल ब्राऊन आणि ब्लॅक इंटिरियर,

लेदर रॅपड स्टिअरिंग व्हील आणि लेदरेट सीट अपहोलस्ट्रीसह प्रीमियम फील यामुळे मिळतो व स्मार्ट कीसह पुश बटन इंजिन स्टार्ट/ स्टॉप तसेच 17.78cm एलईडी स्क्रीनचा संपूर्ण डिजिटल क्लस्टर सारखी वैशिष्ट्ये यामध्ये मिळतात. या कारच्या सिलेक्ट प्रो आणि स्मार्ट प्रो व्हेरिएंटमध्ये पावर ड्रायव्हर सीट, पॅनोरमिक सनरूफ आणि प्रीमियम लेदररेट सीट अपहोस्ट्री क्रूझ कंट्रोल, इलेक्ट्रिक पार्किंग ब्रेक तसेच स्पीड सेन्सिंग ऑटो डोर लॉक इत्यादी वैशिष्ट्ये देखील देण्यात आली आहेत.

Ajay Patil