कार बाजारपेठेचा विचार केला तर गेल्या कित्येक वर्षापासून भारतीय कार बाजारपेठेमध्ये मारुती सुझुकी कंपनीच्या कार सर्वाधिक प्रमाणात विकल्या जातात व ग्राहकांची त्यांना मोठ्या प्रमाणावर पसंती असल्याचे आपल्याला दिसून येते. कोणताही ग्राहक कार खरेदी करण्याचा विचार करतो तेव्हा सगळ्यात अगोदर आपल्या बजेटमध्ये चांगल्या मायलेजची कार मिळेल या पद्धतीने तो प्लॅनिंग करत असतो व या प्लॅनिंगमध्ये मारुती सुझुकी कंपनीचे अनेक कार्स ग्राहकांच्या पसंतीच्या ठरतात.
तसेच मारुती सुझुकी कंपनी बद्दल बोलायचे झाले तर ही कार उत्पादक कंपनी प्रत्येक वर्षाला जास्तीत जास्त गाड्यांची विक्री करते. कारण या कंपनीच्या कार परवडणाऱ्या किमतींमध्ये असतातच परंतु त्यासोबत अनेक वैशिष्ट्ये, आकर्षक लूक आणि डिझाईन इत्यादी सह अनेक फीचर्स यामध्ये येतात.
अगदी याचप्रमाणे जर आपण मारुती सुझुकीच्या मारुती वॅगन आर हॅचबॅकचा विचार केला तर ही मारुती सुझुकी कंपनीची जी काही लाईनअप आहे त्यामध्ये सर्वात जास्त विकली जाणारी कार आहे. प्रत्येक महिन्याला ही कार सर्वात जास्त प्रमाणामध्ये विकली जाते व नेहमी टॉपवर असते.
या कारचे पेट्रोल आणि सीएनजी असे दोन व्हेरियंट असून दोन्ही व्हेरियंट लोकांच्या पसंतीचे आहेत. जर आपण एप्रिल 2024 च्या आकडेवारी बघितली तर तब्बल 17850 युनिट या कारचे विकले गेले. त्यामुळे प्रचंड असणारी ही मागणी पूर्ण करण्यासाठी कारचा पुरवठा करण्याचा सर्वात मोठा भार देखील कंपनीवर आहे.
जर आपण एक माहितीचा आधार घेतला तर त्यानुसार मारुती सुझुकीकडे वॅगन आरच्या सीएनजी एडिशनचे तब्बल 11000 युनिटची ऑर्डर पेंडिंग आहे. यावरून आपल्याला दिसून येते की ग्राहकांमध्ये ही कार किती पसंतीची आहे.
काय आहे मारुती सुझुकी वॅगनारमध्ये?
सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ही कार चार ट्रिममध्ये मारुती सुझुकीने लॉन्च केलेली असून यातील Lxi हे बेस मॉडेल आहे तर दुसरे VXi, ZXi आणि ZXi प्लसचा यामध्ये समावेश आहे. मारुती वॅगन आर सीएनजी मारुतीच्या 1.0- लिटर के सिरीज पेट्रोल इंजिनसह येते व जे सीएनजी मोड मध्ये 56 बीएचपी पावर आणि ८२ एनएम टॉर्क जनरेट करते व यासोबत सीएनजी एडिशनमध्ये ही कार केवळ पाच स्पीड मॅन्युअल गिअर बॉक्ससह येते.
तसेच या कारची पेट्रोल टाकीचे कपॅसिटी 28 लिटर आहे तर सीएनजी टाकीची कॅपॅसिटी 60 लिटरची आहे. मायलेजच्या बाबतीत बोलायचे झाले तर वॅगन आर सीएनजी मध्ये प्रतिलिटर 34.05 किमीचे मायलेज देत असल्याचा दावा कंपनीच्या माध्यमातून करण्यात येत आहे.
तसेच या कारमध्ये अनेक अत्याधुनिक फीचर्स असून यामध्ये अँड्रॉइड ऑटो आणि एप्पल कार्पले कनेक्टिव्हिटी व त्यासोबत सात इंच टच स्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, स्टेरिंग माउंटेन ऑडिओ आणि कॉलिंग कंट्रोल, चार स्पीकर म्युझिक सिस्टम यासारखे वैशिष्ट्ये देण्यात आलेले आहेत.
किती आहे या कारची किंमत?
मारुती सुझुकीच्या वॅगन आर या कारची किंमत साधारणपणे पाच लाख 54 हजार रुपये इतकी आहे.