WagonR Vs Celerio : मारुती सुझुकी कार उत्पादक कंपनीकडून त्यांच्या एकापेक्षा एक शानदार कार भारतीय ऑटो मार्केटमध्ये सादर करण्यात आल्या आहेत.
या कारला ग्राहकांचा देखील चांगला प्रतिसाद मिळत आहे. मारुतीच्या कार स्वस्त असल्याने लाखो ग्राहकांची मारुतीच्या कारला उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
तुम्हीही मारुती सुझुकीची WagonR किंवा Celerio कार खरेदी करणार असाल तर त्याआधी तुमच्यासाठी कोणती कार उत्तम पर्याय आहे ते जाणून घ्या. या दोन्ही कारमध्ये कंपनीकडून CNG आणि पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे.
WagonR आणि Celerio इंजिन
मारुती सुझुकी वॅगनआर कारमध्ये 1.0 लीटर के-सीरीज इंजिन आणि 1.2-लिटर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. 1.0-लिटर इंजिन पर्यायामध्ये CNG पर्याय देण्यात येत आहे.
कारचे 1.2 लीटर पेट्रोल इंजिन 88.5 bhp पॉवर आणि 113 Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. कारचे CNG मॉडेल 34.05 Kmpl मायलेज देण्यास सक्षम आहे. तर पेट्रोल व्हेरियंट 24.35 Kmpl मायलेज देते.
Celerio हॅचबॅक कारमध्ये 1.0 लीटर पेट्रोल इंजिन देण्यात येत आहे. हे इंजिन 67 bhp पॉवर आणि 89 Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. हे इंजिन 5-स्पीड मॅन्युअल आणि 5-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्सशी जोडण्यात आले आहे. कारचे CNG मॉडेल 34.43 Kmpl मायलेज देते तर पेट्रोल व्हेरियंट 25.24 Kmpl मायलेज देण्यास सक्षम आहे.
WagonR आणि Celerio वैशिष्ट्ये
WagonR कारमध्ये 7-इंच टचस्क्रीन डिस्प्ले, 4-स्पीकर म्युझिक सिस्टम आणि स्टीयरिंग-माउंट ऑडिओ नियंत्रणे आणि स्मार्टफोन नेव्हिगेशन अशी वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. तर प्रवाशांच्या सुरक्षेसाठी ड्युअल फ्रंट एअरबॅग्ज, EBD सह ABS, मागील पार्किंग सेन्सर्स आणि हिल-होल्ड असिस्ट असे फीचर्स देण्यात येत आहेत.
Celerio हॅचबॅक कारमध्ये 7-इंच टचस्क्रीन, पुश-बटण स्टार्ट/स्टॉप, कीलेस एंट्री आणि मॅन्युअल एसी, ड्युअल फ्रंट एअरबॅग्ज, हिल-होल्ड असिस्ट, EBD सह ABS आणि मागील पार्किंग सेन्सर्स अशी वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत.
WagonR आणि Celerio किंमत
मारुती सुझुकी WagonR कारच्या बेस मॉडेलची एक्स शोरूम किंमत 5.54 लाख रुपये आहे तर टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 7.42 लाख रुपये आहे. Celerio कारच्या बेस मॉडेलची एक्स शोरूम किंमत 5.37 लाख रुपये आहे तर टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 7.15 लाख रुपये आहे.