Hyundai Exter Knight Edition : दक्षिण कोरियाची कार उत्पादक ह्युंदाईने आज अधिकृतपणे भारतीय बाजारपेठेत विक्रीसाठी तिच्या सर्वात स्वस्त SUV Hyundai EXTER ची नवीन Knight एडिशन लाँच केली आहे. यापूर्वी कंपनीने या एसयूव्हीचे काही टीझर रिलीज केले होते. आकर्षक लूक आणि पॉवरफुल इंजिनने सुसज्ज असलेल्या या एसयूव्हीची सुरुवातीची किंमत 8.38 लाख रुपये (एक्स-शोरूम) ठेवण्यात आली आहे. तर त्याच्या टॉप मॉडेलची किंमत 10.43 लाख रुपये आहे. कपंनीची ही एक बजेट फ्रेंडली एसयूव्ही आहे.
कंपनीची ही नवीन नाईट एडिशन EXTER च्या नियमित मॉडेल SX आणि SX (O) वर आधारित आहे. Hyundai ने Exeter च्या Night Edition ला पूर्णपणे नवीन लुक आणि डिझाइन दिले आहेत. त्यात काही कॉस्मेटिक बदल देखील करण्यात आले आहेत जे नेहमीच्या मॉडेलपेक्षा तिला वेगळे करतात. याची केबिन कशी असेल पाहूया…
एसयूव्हीची केबिन वेगळी बनवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात आले आहेत. सर्व-काळ्या थीमने सुशोभित केलेले, केबिन लाल ॲक्सेंटसह पूर्ण केले आहे. हा लाल ॲक्सेंट फ्लोअर मॅट, एअर कंडिशन व्हेंट्स आणि स्टीयरिंग व्हीलवर दिसतो. याशिवाय, बाकीची डिझाईन बहुतेक मानक मॉडेलसारखीच आहेत. यामध्ये सीटवर नाईट एडिशन बॅजिंग देण्यात आले आहेत.
इंजिन
कंपनीने इंजिनमध्ये कोणताही बदल केलेला नाही. यात 1.2 लिटर क्षमतेचे नैसर्गिकरित्या एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन आहे जे 5-स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससह जोडलेले आहे. हे इंजिन 81bhp पॉवर आणि 113Nm टॉर्क जनरेट करते.