मोठ्या फॅमिलीसाठी सेव्हन सीटर एसयूव्ही घ्यायचीय ? Citroen C3 Aircross आहे उत्तम, भारी फीचर्स व भरपूर मायलेज

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Citroen C3 Aircross : सध्या मार्केटमध्ये फाईव्ह सीटर, सेव्हन सीटर एसयूव्हींची प्रचंड क्रेझ आहे. मोठी फॅमिली असेल तर सेव्हन सीटर एसयूव्हींना पसंती दिली जाते. परंतु बऱ्याचदा सेव्हन सीटर एसयूव्ही या महाग असल्याने त्या अनेकांच्या बजेटबाहेर असतात.

परंतु जर तुम्हाला सेव्हन सीटर एसयूव्ही घ्यायचा विचार असेल व तुम्हाला कमी बजेटमध्ये परंतु सर्व अत्याधुनिक फीचर्स असणारी भारी गाडी हवी असेल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची आहे.

सध्या मार्केटमध्ये Citroen C3 Aircross ही सेव्हन सीटर एसयूव्ही आहे कि जी कमी किमतीत जबरदस्त फीचर्स देते. या कारला 18.5 किमी प्रति लीटरचे मायलेज आहे. तसेच यात 444 लीटरची मोठी बूट स्पेस देखील देण्यात आली आहे. चला सर्व जाणून घेऊयात डिटेल्स –

कारमध्ये रियर पार्किंग सेन्सरसह भारी फीचर्स

कारमध्ये रियर पार्किंग सेन्सर आणि 7 इंचाचा डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले देण्यात आला आहे. या कारमध्ये हिल-होल्ड असिस्टचे फीचर देण्यात आले आहे, जेणेकरून टेकडी, डोंगरावर सुरक्षा राहील.

यात स्टीअरिंग माउंट ऑडिओ कंट्रोल आणि मॅन्युअल एसी देण्यात आला आहे. कारमध्ये ड्युअल फ्रंट एअरबॅग आणि टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टिम (टीपीएमएस) देण्यात आली आहे.

दमदार इंजिन

या कारमध्ये जबरदस्त इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन तब्बल 1199 cc चे आहे. ही कार सध्या पेट्रोल ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे. या कारच्या टॉप मॉडेलची एक्स-शोरूम किंमत 12.54 लाख रुपये आहे. विशेष म्हणजे या कार मध्ये सहा कलर ऑप्शन उपलब्ध आहेत.

यात 10.2 इंचाची मोठी इन्फोटेनमेंट सिस्टिम देण्यात आली आहे. या एसयूव्ही कारमध्ये 110 PS ची पॉवर असून कारची ग्राउंड क्लिअरन्स 200 मिमी आहे. यामुळे खराब रस्त्यांवर देखील प्रवास करण्यास अडचण येत नाही.

कारमध्ये अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टिम देण्यात आली आहे. त्यामुळे सेन्सरच्या माध्यमातून चारही चाकांवर कंट्रोल मिळतो.

अॅपल कारप्ले कनेक्टिविटी आणि अँड्रॉइड ऑटो सिस्टीम

या कारमध्ये 6 स्पीड गिअरबॉक्स देण्यात आला आहे. या कारमध्ये अँड्रॉइड ऑटो आणि अॅपल कारप्ले कनेक्टिव्हिटीसारखे अॅडव्हान्स फीचर्स देण्यात आले आहेत.