ऑटोमोबाईल

Diesel Engine: मोटरसायकलमध्ये डिझेल इंजिनचा वापर का केला जात नाही? काय आहेत यामागील कारणे? वाचा महत्वाची माहिती

Published by
Ajay Patil

Diesel Engine:- वाहनांचे अनेक प्रकार असून यामध्ये दुचाकी तसेच चारचाकी वाहनांचा समावेश मोठ्या प्रमाणावर होतो. त्यातील काही वाहने हे पेट्रोलवर कार्यान्वित होतात तर काही डिझेलवर कार्यान्वित होतात. म्हणजेच काही वाहनांचे इंजिन हे पेट्रोल इंजिन असते तर काही वाहनांचे इंजिन डिझेल इंजिन असते.

परंतु यामध्ये आपण दुचाकी म्हणजेच मोटरसायकलचा विचार केला तर प्रत्येक मोटरसायकलमध्ये डिझेल इंजिनचा वापर करण्याऐवजी पेट्रोल इंजिनचा वापर केलेला असतो. म्हणजेच मोटरसायकल या पेट्रोलवर चालतात.

त्यामुळे आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या मनामध्ये विचार येत असेल की मोटरसायकलसाठी डिझेलचा वापर का केला जात नाही? कारण पेट्रोलच्या तुलनेमध्ये डिझेल हे स्वस्त मिळते.

अशा प्रकारचे प्रश्न बऱ्याचदा उपस्थित केला जातो व आता देखील सोशल मीडियावर हा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता व त्याला एका तज्ञाने सविस्तरपणे उत्तर दिलेले आहे.

 मोटार सायकलमध्ये डिझेल इंजनचा वापर का केला जात नाही?

जर आपण यामध्ये असलेले तज्ञ रेबेका विल्यम्स यांनी दिलेली माहिती बघितली तर त्यांच्या मते डिझेल इंजिन जरी फायदेशीर  असले तरी ते कमी कार्बन उत्सर्जित करतात आणि उच्च टॉर्क देतात व हे कोणत्याही इंजिनसाठी उत्तम असे वैशिष्ट्य आहे.

परंतु तरी देखील मोटरसायकलमध्ये त्याचा वापर केला जात नाही. ऐवजी मोटरसायकलमध्ये पेट्रोल किंवा इलेक्ट्रिक इंजिनचा वापर केला जातो व त्यामागील प्रमुख कारणे म्हणजे..

1- वेगात फरक डिझेल इंजिन पेट्रोल किंवा इलेक्ट्रिक इंजिन पेक्षा जड असते. कारण त्यामध्ये जास्त भाग असतात. कारण त्यांना अधिक थंड करणे आवश्यक असते

व हे अतिरिक्त वजन मोटर सायकलला जड आणि वेगात हळू बनवते. कारण मोटरसायकल या सामान्यपणे अधिक वेगासाठी तयार केल्या जातात व त्यामुळे डिझेल इंजिन याकरिता अयोग्य ठरते.

2- डिझेल इंजिन बनवण्याची किंमत तसेच दुसरे महत्त्वाचे कारण जर बघितले तर डिझेल इंजिनची किंमत पेट्रोल किंवा इलेक्ट्रिक इंजिनपेक्षा जास्त असते. कारण डिझेल इंजन बनवण्याकरिता जास्त साहित्य आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान आवश्यक आहे.

तसेच त्याची जास्त प्रमाणामध्ये देखभाल व दुरुस्ती देखील आवश्यक असते. अशावेळी जर मोटरसायकलमध्ये डिझेल इंजिनचा वापर केला तर मोटरसायकलची किंमत देखील वाढू शकते.

3- आवाजाचे प्रमाण तसेच डिझेल इंजिन हे पेट्रोल किंवा इलेक्ट्रिक इंजिनपेक्षा जास्त प्रमाणामध्ये आवाज करतात. कारण डिझेल इंजिन अधिक प्रमाणामध्ये कंपन आणि ज्वलन व आवाज निर्माण करतात. अशावेळी जर मोटरसायकलमध्ये डिझेल इंजिनचा वापर केला

तर ते दुचाकीस्वाराला आणि जवळच्या जाणाऱ्या येणाऱ्या पादचाऱ्यांना त्रासदाय ठरू शकते. बऱ्याच ठिकाणी ध्वनी प्रदूषणाची समस्या जास्त प्रमाणात आहे. मोटर सायकल या साधारणपणे शांतपणे व कमी आवाजात चालवण्यासाठीच बनवल्या जातात.

4- कमी ऊर्जेची निर्मिती तसेच डिझेल इंजिन हे पेट्रोल आणि इलेक्ट्रिक इंजिन पेक्षा तुलनेने कमी ऊर्जा निर्माण करतात व या कारणामुळे त्यांच्यामध्ये कमीत कमी आरपीएम मिळतो. या समस्या येऊ नयेत याकरिता  मोटरसायकल तयार करणाऱ्या कंपन्या मोटरसायकलमध्ये डिझेल इंजिन ऐवजी पेट्रोल किंवा इलेक्ट्रिक इंजिनचा वापर करतात.

Ajay Patil