10 लाख रुपयांपेक्षा कमी किंमत असलेल्या सेडान कार कोणत्या ? पहा यादी…

Ahmednagarlive24 office
Published:

Cheapest Sedan Car List : अलीकडे बाजारात एसयूव्ही कारची खूप मोठी डिमांड आहे. विशेषतः नवयुवक तरुणांमध्ये एसयूव्ही कारची अधिक क्रेज पाहायला मिळत आहे. मात्र असे असले तरी आजही अनेक लोकांना सेडान कार आवडते. प्रामुख्याने शहरी भागात सेडान कारची डिमांड अधिक पाहायला मिळते.

जर तुम्हीही या नवीन वर्षात नवीन सेडान कार खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आजची बातमी अतिशय महत्त्वाची राहणार आहे. कारण की आज आपण देशातील सर्वात स्वस्त सेडान कार विषयी माहिती जाणून घेणार आहोत. दहा लाखांपेक्षा कमी किंमत असलेल्या सेडान कारची आज आपण माहिती पाहणार आहोत.

दहा लाखापेक्षा कमी किमतीच्या सेडान कार

Tata Tigor : टाटा ही देशातील एक प्रमुख कार निर्माती कंपनी आहे. कंपनीकडून अनेक सेडान कार ऑफर केल्या जात आहेत. यामध्ये टाटा टिगोरचा देखील समावेश होतो. ही कंपनीच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली जाणारी सर्वात सुरक्षित सेडान कार असल्याचा दावा कंपनीने केला आहे. ही टाटा कंपनीची लोकप्रिय कार दहा लाख रुपयांपेक्षा कमी किमतीत बाजारात उपलब्ध आहेत.

Honda City 4th Gen : होंडा देखील देशातील एक प्रमुख वाहन निर्माती कंपनी आहे. या कंपनीच्या अनेक गाड्या ग्राहकांमध्ये लोकप्रिय आहेत. Honda City 4th Gen ही देखील ग्राहकांमध्ये लोकप्रिय आहे. ही कंपनीची एक प्रमुख सेडान कार आहे. या वाहनाला सुरक्षा मानकांवर 4 स्टार ग्लोबल NCAP रेटिंग देखील मिळाले आहे. विशेष बाब म्हणजे या कारची किंमत दहा लाख रुपयांपेक्षा कमी आहे. जर तुम्ही ही दहा लाख रुपयांपेक्षा कमी किमतीची सेडान कार खरेदी करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी या कारचा ऑप्शन फायदेशीर ठरू शकतो.

होंडा अमेझ : होंडा कंपनीची ही आणखी एक लोकप्रिय सेडान कार आहे. ही कार सर्वात सुरक्षित सेडानच्या बाबतीत एक लोकप्रिय कार ठरली आहे. याला एकूण 5 पैकी 4 सुरक्षा रेटिंग देण्यात आली आहे. या कारला देण्यात आलेले इंजिन 88.50 bhp पॉवर आणि 145 Nm पीक टॉर्क निर्माण करण्यास सक्षम असल्याचा दावा कंपनीने केला आहे. या गाडीला ऑटोमॅटिक सीव्हीटी ट्रान्समिशन देण्यात आले आहे. जर तुम्ही तुमच्या बजेटमध्ये ऑटोमॅटिक सेडान कार खरेदी करू इच्छित असाल तर ही गाडी तुमच्यासाठी एक बेस्ट पर्याय राहणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe