VinFast Upcoming Car:- भारतीय कार बाजारपेठेमध्ये अनेक वेगवेगळ्या प्रमुख अशा का उत्पादक कंपन्यांनी महत्त्वाची अशी वैशिष्ट्ये असलेली आणि परवडणाऱ्या किमतीत मिळतील अशा कार लॉन्च केले असून ग्राहकांना देखील कारचे पर्याय उपलब्ध झाल्यामुळे ग्राहकांना देखील अनेक प्रकारचा फायदा होताना दिसून येत आहे.
त्यातल्या त्यात भारतीय कार बाजारपेठेमध्ये इलेक्ट्रिक स्वरूपातील कार देखील मोठ्या प्रमाणावर येत असल्याने इलेक्ट्रिक कार खरेदी करणाऱ्यांसाठी देखील आता बरेच पर्याय निर्माण झाले आहेत.
या अनुषंगाने बघितले तर व्हिएतनाम या देशाची प्रसिद्ध असलेली इलेक्ट्रिक वाहन उत्पादक कंपनी विनफास्ट आगामी येऊ घातलेल्या मोबिलिटी ग्लोबल एक्सपो 2025 मध्ये स्कूटर पासून तर बाईक व कार अशा स्वरूपाची इलेक्ट्रिक वाहने सादर करणार आहे.
यात विशेष म्हणजे ही कंपनी भारतामध्ये दोन इलेक्ट्रिक कार VF7 आणि VF9 सादर करणार आहे व या दोन्ही इलेक्ट्रिक एसयुव्ही सोबत भारतीय मार्केटमध्ये पाऊल ठेवणार आहे. त्यामुळे इलेक्ट्रिक कार घेणाऱ्यांसाठी नक्कीच एक चांगली संधी किंवा एक चांगले पर्याय यामुळे निर्माण होण्यास मदत होणार आहे.
काय असतील विनफास्टच्या या दोन्ही मॉडेलचे विशेष आणि किंमत?
1-VF7 इलेक्ट्रिक एसयूव्हीचे वैशिष्ट्ये- विनफास्टच्या या इलेक्ट्रिक एसयूव्ही 4545 मिमी लांब आणि १८९० मीमी रुंद असून तिची उंची १७३५.७५ मिमी आहे. हे पाच सीटर इलेक्ट्रिक एसयूव्ही असून तिचा व्हिलबेस 2840 मीमी इतका आहे.
जागतिक पातळीवर ही कार इको आणि प्लस या दोन ट्रिममध्ये उपलब्ध करून देण्यात येणार असून या दोन्हीमध्ये 75.3kWh बॅटरी पॅक देण्यात आला आहे.
यातील इको ट्रीम फ्रंट व्हील्स ऊर्जा देणाऱ्या सिंगल मोटर सेटअपसह येतो जी दोनशे एक बीएचपीची पावर आणि ३१० एनएमचा टॉर्क जनरेट करण्यास सक्षम असून ही कार एका चार्जवर 450 किलोमीटरची रेंज देते.
3-VF7 प्लस इलेक्ट्रिक एसयूव्हीचे वैशिष्ट्ये- ही कार चारही चाकांना एनर्जी देणाऱ्या ड्युअल मोटर सेटअपसह येते व एका चार्जवर 431 km ची रेंज देण्याचा दावा या कंपनीच्या माध्यमातून करण्यात आला आहे.
या एसयूव्हीचे जर पावर ट्रेन बघितले तर 348 बीएचपीचे पीक आउटपुट आणि पाचशे एनएमचा टॉर्क जनरेट करण्यास सक्षम असून इतर फीचर्स जर बघितले तर या कारमध्ये 12.9 इंच इको किंवा OTA अपडेटसह 15 इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, लेव्हल दोन ऍडव्हान्स ड्रायव्हर असिस्टंट सिस्टम देण्यात आले आहेत.
3-VF9 इलेक्ट्रिक कार- ही विनफास्ट या कंपनीची फ्लॅगशिप इलेक्ट्रिक एसयूव्ही असून जी सहा आणि सात सीट कॅबिन लेआउटसह येते. आता ही कार कॅप्टन सीट्ससह येणार असून तिची लांबी 5119 मीमी आणि रुंदी 2000 मिमी व उंची 1694 मिमी आहे.
तसेच व्हिल बेस बघितला तर तो 3148 मिमी आहे. ज्याप्रमाणे व्हीएफ सात इको आणि प्लस या दोन ट्रिममध्ये उपलब्ध असणार आहे तर अगदी त्याचप्रमाणे व्हीएफ नऊ देखील जागतिक स्तरावर या दोन ट्रिममध्ये दिसून येणार आहे.
या दोन्ही प्रकारांमध्ये 123kWh बॅटरी पॅक देण्यात आला आहे जो ड्युअल मोटर ऑल व्हील ड्राईव्ह सेटअपला चालना देतो. जी 402 बीएचपी व 620 एनएमचा पीक टॉर्क जनरेट करते. यामध्ये व्हीएफ 900 किलोमीटर पर हवरचा स्पीड देखील गाठू शकते.
VF9 नऊ मध्ये असणारी वैशिष्ट्ये
या कारमध्ये एलईडी हेडलाईट, टेल लाईट तसेच ऑटो अड्जस्टेबल व हीटेड ORVM, मसाज फंक्शन व त्यासोबत हवेशीर हीटेड फ्रंट रियल सीट्स, थ्री झोन क्लायमेट कंट्रोल, हेड अप डिस्प्ले,
15.6 इंच टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट डिस्प्ले, ऑटो डीमिंग IRVM असे बरेच काही समाविष्ट असणार आहे. इतकेच नाही तर यामध्ये 11 एअरबॅग्स, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम सारखी सुरक्षिततेचे वैशिष्ट्ये देखील देण्यात आले आहेत.