ऑटोमोबाईल

यामाहाने भारतात सादर केली धमाकेदार रेंसिग Yamaha R15M बाईक! करा या सणासुदीत खरेदी, वाचा वैशिष्ट्ये आणि किंमत

Published by
Ajay Patil

भारतामध्ये सध्या अनेक बाईक उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून वेगवेगळे वैशिष्ट्ये आणि किमतींमध्ये बाईक लॉन्च केल्या जात असून सणासुदीच्या कालावधीत बाईक खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी अनेक पर्याय सध्या उपलब्ध झालेले आहेत. अगदी याचप्रमाणे तुम्ही देखील यामाहा कंपनीच्या बाईकचे प्रेमी असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी असून या यामाहा मोटर इंडियाने आपली लोकप्रिय आणि मागणी असलेली बाईक R15 भारतीय बाजारपेठेत काही बदल करून सादर केली आहे.

विशेष म्हणजे कंपनीने या बाईकमध्ये कार्बन फायबर पॅटर्न वापरला असून ही सामग्री या बाईकच्या वेगवेगळ्या भागांमध्ये वापरण्यात आलेली आहे. त्यामुळे यामाहा कंपनीच्या बाईकची आवड असणाऱ्या ग्राहकांसाठी हा एक चांगला पर्याय बाईक खरेदीसाठी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.

 यामाहा मोटर इंडियाने सादर केली नवीन बदलासह यामाहा R15M बाईक

याबाबत सविस्तर वृत्त असे की, यामाहा मोटर इंडियाच्या माध्यमातून आपली लोकप्रिय आणि मागणी असलेली बाईक यामाहा R15M नवीन बदल करून सादर केली आहे व यामध्ये आता कार्बन फायबर पॅटर्नचा वापर करण्यात आलेला असून बाईकच्या पुढील काऊल, साइड्स फेअरिंग आणि मागच्या बाजूच्या पॅनलच्या फ्लेक्स मध्ये कार्बन फायबर पॅटर्न वापरला आहे.

ज्यामुळे या बाईकचा लुक पूर्णपणे बदलून गेला असून या कार्बन फायबर पॅटर्न व्यतिरिक्त या बाईकमध्ये सर्व ब्लॅक फेन्डर्स, टॅंक वरील नवीन डेक्कल्स आणि निळ्या चाकांचा सपोर्ट देण्यात आला असून मागील आणि पुढच्या चाकांमध्ये निळा रंग देण्यात आला आहे. ज्यामुळे या बाईकचा लूक पूर्णपणे रेसिंग बाईक सारखा झाला आहे.

 या बाईकमध्ये ऍड करण्यात आली नवीन फीचर्स

यामाहा मोटर इंडियाने या बाईकमध्ये काही नवीन फीचर्स जोडले असून यामध्ये टर्न बाय टर्न नेवीगेशनचा सपोर्ट मिळणार आहे. यामुळे रायडिंगचा त्रास कमी होणार असून म्युझिक आणि व्हॉल्युम कंट्रोल देखील उपलब्ध करून देण्यात आला असून जो Y-Connect एप्लीकेशनच्या माध्यमातून वापरता येणार आहे. एवढेच नाही तर या बाईकला आता नवीन आणि अपग्रेडेड स्विच गिअर आणि नवीन एलईडी लायसन्स प्लेट देण्यात आली आहे.

 कसे आहे या बाईकचे इंजिन?

या बाईकमध्ये 155 सीसी फ्युएल इंजेक्टेड इंजिन देण्यात आले असून इंजिन 7500 आरपीएम वर 14.2 न्यूटन मीटर जास्तीत जास्त टॉर्क जनरेट करते. एवढेच नाहीतर दहा हजार आरपीएम वर 13.5 किलोवॅटची मॅक्झिमम पावर जनरेट करते.

 किती आहे यामाहा R15M बाईकची किंमत?

या बाईकच्या किमतीचा विचार केला तर या लेटेस्ट कार्बन फायबर पॅटर्न असलेल्या व्हेरियंटची एक्स शोरूम किंमत दोन लाख आठ हजार तीनशे रुपये आहे. तसेच मेटॅलिक ग्रे कलरमध्ये असलेली अपग्रेडेड  R15M बाईकची एक्स शोरूम किंमत 1 लाख 98 हजार 300 रुपये इतकी आहे.

Ajay Patil