Yamaha Motors : ‘Ola-Ather’ला टक्कर देण्यासाठी यामाहा आणत आहे इलेक्ट्रिक स्कूटर, जाणून घ्या कधी होणार लॉन्च

Yamaha Motors : जपानी बाईक निर्माता कंपनी Yamaha Motors लवकरच भारतात आपल्या इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च करणार आहे. कंपनीने इलेक्ट्रिक स्कूटर भारतीय बाजारपेठेत लॉन्च करण्यासाठी अभ्यास सुरू केला आहे. या इलेक्ट्रिक स्कूटर भारतीय बाजारपेठेत लॉन्च झाल्या तर बाकीच्या इलेक्ट्रिक स्कूटरशी थेट स्पर्धा करतील.

यामाहाची भारतातील पहिली इलेक्ट्रिक स्कूटर कंपनी निओच्या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये वापरत असलेल्या प्लॅटफॉर्मवर आधारित असण्याची शक्यता आहे. ही ई-स्कूटर या वर्षाच्या सुरुवातीला युरोपमध्ये लॉन्च करण्यात आली होती.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

3

मिळालेल्या माहितीनुसार, कंपनी स्कूटरला भारतीय परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी पुन्हा काम करत आहे. इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत कमी ठेवण्यासाठी कंपनी स्थानिक पुरवठादारांकडून घटक वापरू शकते.

Yamaha Neo’s बद्दल बोलायचे झाले तर, यात ड्युअल बॅटरी सेटअप आहे जो काढता येण्याजोगा आहे. यात दोन राइडिंग मोड आणि हब माउंटेड इलेक्ट्रिक मोटर आहे. त्याच्या कॉम्पॅक्ट आकारामुळे, स्कूटरचे वजन फक्त 90 किलो आहे. मात्र, ही स्कूटर केवळ 68 किलोमीटरची रेंज देते. कंपनी भारतात अधिक रेंज आणि स्पीड पर्यायांमध्ये सादर करेल अशी अपेक्षा आहे. काही रिपोर्ट्सनुसार, कंपनी 2023 च्या मध्यात लॉन्च करू शकते.

1

सध्या, इलेक्ट्रिक टू-व्हीलर उद्योगात ओला इलेक्ट्रिक, ओकिनावा आणि एथर एनर्जी सारख्या नवीन प्रवेशकर्त्यांचे वर्चस्व आहे. जुन्या कंपन्यांमध्ये Hero MotoCorp, Bajaj Auto आणि TVS यांचा समावेश आहे. Hero MotoCorp ने अलीकडेच त्यांची Vida V1 इलेक्ट्रिक स्कूटर सादर केली आहे.